Adulteration In Jaggery:- खाद्यपदार्थांमधील भेसळ हा एक खूप ज्वलंत असा प्रश्न असून तो थेट मानवाच्या आरोग्याची निगडित असल्याने त्याची भयानकता आणखीनच वाढते. कारण सध्याच्या कालावधीमध्ये दुधापासून तर गुळ, तूप, जिर्यासारखे मसाल्याचे पदार्थ, पनीर तसेच बऱ्याच खाद्यपदार्थांमध्ये भेसळ केली जाते.
इतकेच नाहीतर केळी तसेच टरबूज सारखे फळे देखील रसायनांचा वापर करून पिकवले जातात व अशी रसायने आरोग्याला धोकादायक असतात. त्यामुळे जर आपण असे खाद्यपदार्थ बाजारातुन विकत घेत असाल तर मात्र आपल्याला त्यांच्यातील भेसळ किंवा अशुद्धता ओळखता येणे खूप गरजेचे असते.
अगदी याच पद्धतीने आरोग्यासाठी महत्त्वाचा असलेला गूळ जर तुम्ही बाजारातून खरेदी करत असाल तर त्यामध्ये देखील भेसळ असण्याची शक्यता असते व असा भेसळयुक्त गुळ जर तुम्ही खाल्ला तर मात्र आरोग्यावर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात.
गुळामध्ये कृत्रिम रंग तसेच विविध प्रकारच्या रसायनांचा व इतर धोकादायक असे घटक मिसळलेले असू शकतात. त्यामुळे तुम्हाला गुळाची शुद्धता तपासता येणे खूप गरजेचे आहे. म्हणून या लेखामध्ये आपण अशा सोप्या गोष्टी बघणार आहोत ज्यामुळे तुम्ही पटकन भेसळयुक्त गूळ ओळखू शकतात.
या टिप्स वापरा आणि भेसळयुक्त गूळ ओळखा
1- पाण्याचा वापर करून– गुळाची शुद्धता ओळखण्यासाठीचा हा अतिशय सोपा असा उपाय आहे. हा उपाय करताना तुम्हाला एका ग्लासमध्ये स्वच्छ पाणी घ्यावे लागेल व त्यामध्ये एक छोटासा गुळाचा तुकडा टाकावा.
त्यानंतर थोडा वेळ थांबून पाण्यात टाकलेल्या गुळाचे निरीक्षण करावे. पाण्यामध्ये टाकलेला गूळ पाण्यामध्ये लगेच पूर्णपणे विरघळून गेला आणि पाणी गढूळ किंवा मळकट दिसायला लागले तर त्या गुळात भेसळ असल्याची शक्यता असू शकते.
कारण गुळ जर शुद्ध असेल तर तो पाण्यामध्ये विरघळायला वेळ घेतो व विरघळल्यानंतर पाण्याचा रंग देखील बदलत नाही व पाणी स्वच्छच राहते व ग्लासाच्या तळाशी हळूहळू गुळ बसतो.
2- गुळाच्या रंगाचे निरीक्षण करणे– गुळाचा रंग पाहून देखील तुम्ही त्याची शुद्धता ओळखू शकता. कारण गुळ जर शुद्ध असेल तर तो पिवळसर किंवा हलक्या तपकिरी रंगाचा दिसतो. गुळाचा रंग गडद किंवा कृत्रिम चमक असलेला दिसत असेल तर त्यामध्ये भेसळ असू शकते.
कारण बऱ्याचदा गुळ आकर्षक दिसावा म्हणून त्यामध्ये रसायने किंवा कृत्रिम रंगाचा वापर केलेला असतो. त्यामुळे तुम्ही खरेदी करत असलेला गुळाचा रंग जर गडद असेल तर त्याआधी विचार करावा.
3- गुळाचा वास घेणे– जर तुम्ही घरी आणलेल्या गुळाचा वास घेतला व तो वास नैसर्गिक गोडसर आला व त्यामध्ये हलका मातीसारखा गंध आला तर तो गुळ शुद्ध असतो.
कारण भेसळ केलेल्या गुळाला अनेक वेळा रसायनांचा किंवा कृत्रिम वास येतो. कधी कधी तो तिखट स्वरूपात किंवा विचित्र पद्धतीचा असू शकतो. गुळाचा वास घेतल्यानंतर तो वास जर तुम्हाला वेगळा किंवा कृत्रिम पद्धतीचा वाटत असेल तर तो गुळ भेसळयुक्त असू शकतो.
4- गुळाचा तुकडा तोडून पाहणे– शुद्ध गुळ जर असेल तर तो कडक आणि कठीण स्वरूपाचा असतो व हाताने तुटायला त्याला वेळ लागतो.
आरोग्यासाठी महत्त्वाचा असलेला गूळ जर तुम्ही बाजारातून खरेदी करत असाल तर त्यामध्ये देखील भेसळ असण्याची शक्यता असते व असा भेसळयुक्त गुळ जर तुम्ही खाल्ला तर मात्र आरोग्यावर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात.
गुळामध्ये कृत्रिम रंग तसेच विविध प्रकारच्या रसायनांचा व इतर धोकादायक असे घटक मिसळलेले असू शकतात.
परंतु तुम्ही गुळ हाताने तोडण्याचा प्रयत्न केला व तो जर पटकन तुटला तर त्यात भेसळ असू शकते. कारण शुद्ध गुळ तोडण्यासाठी बरीच ताकद लागते. त्या तुलनेत मात्र अशुद्ध गुळ लगेच तुटतो.