Education Tips:- भारतामध्ये जर आपण बघितले तर प्रत्येक वर्षाला लाखोंच्या संख्येमध्ये अभियांत्रिकी अभ्यासक्रमांना विद्यार्थी प्रवेश घेत असतात. यामध्ये बी टेक अभ्यासक्रमांना जर प्रवेश घ्यायचा असेल तर मॅथ म्हणजेच गणित विषयासह बारावी पास असणे गरजेचे असते.
अभियांत्रिकीच्या अनेक ब्रांचेस असून कुठल्याही महाविद्यालयांमध्ये याकरिता प्रवेश घेण्यापूर्वी तुम्हाला या विषयाची पूर्ण माहिती असणे गरजेचे आहे. यामध्ये जर बी टेक शाखा निवडली तर याची व्याप्ती खूप मोठी असून हा एक महत्त्वाचा असा अभ्यासक्रम आहे.

बी टेक करून तुम्हाला जर लगेच नोकरी मिळवायची असेल तर यामध्ये सर्वात लोकप्रिय शाखांना ऍडमिशन घेणे खूप गरजेचे असते. आपल्याला माहित आहे की बीटेक म्हणजेच बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी होय.
तुम्हाला जर टॉप इंजीनियरिंग कॉलेजमध्ये बी टेक करिता प्रवेश घ्यायचा असेल तर त्याकरिता JEE परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे असते. या अनुषंगाने महत्त्वाच्या असलेल्या बी टेक अभ्यासक्रमाच्या सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय शाखा कोणत्या? याबद्दलची माहिती आपण थोडक्यात बघू.
या आहेत सर्वाधिक लोकप्रिय बीटेक अभ्यासक्रमाच्या लोकप्रिय शाखा
1- संगणक विज्ञान अभियांत्रिकी– या शाखेमध्ये विद्यार्थ्यांना संगणक सॉफ्टवेअरचा विकास तसेच चाचणी आणि मूल्यमापनाचे काम इत्यादी शिकवले जाते व हा कोर्स पूर्ण केल्यानंतर वार्षिक चार लाखापासून ते पंधरा लाखापर्यंत पॅकेज मिळू शकते.
2- यांत्रिक अभियांत्रिकी– मेकॅनिकल इंजिनिअर म्हणजेच यांत्रिक अभियंते मशीन आणि उपकरणे डिझाईन तसेच ते डेव्हलप करणे आणि त्यांची चाचणी इत्यादी कामे करतात. यांत्रिक अभियांत्रिकी कोर्स केल्यानंतर वार्षिक साडेतीन लाख ते बारा लाखापर्यंत पॅकेज मिळू शकते.
3- इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग– इलेक्ट्रिकल इंजिनीयर हे इलेक्ट्रिकल सिस्टमची रचना आणि व्यवस्थापन करण्याचे महत्त्वपूर्ण काम करतात. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केलेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक साडेतीन लाखापासून ते बारा लाखापर्यंत पॅकेज मिळते.
4- इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजीनियरिंग– या शाखेतील विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन सिस्टम बद्दल माहिती दिली जाते व शिकवले जाते. या क्षेत्रातील पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक साडेतीन ते बारा लाख रुपये पॅकेज मिळते.
5- एरोस्पेस इंजिनिअरिंग– एरोस्पेस इंजिनियर हे विमान आणि अंतराळ यानांची रचना करण्याचे महत्त्वपूर्ण काम करतात. या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना पाच लाखापासून ते वीस लाखापर्यंत वार्षिक पॅकेज मिळते.
6- जैवतंत्रज्ञानातील बीटेक– जैवतंत्रज्ञान इंजिनियर्स म्हणजेच अभियंते हे जैविक प्रणालींचा अभ्यास करतात व या क्षेत्रात पदवी संपादन केलेल्यांना वार्षिक तीन ते दहा लाखापर्यंत पॅकेज मिळते.
7- आयटीमध्ये बीटेक म्हणजेच माहिती तंत्रज्ञानातील बीटेक– आयटी इंजिनिअर सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर सिस्टम डिझाईन करण्याचे महत्त्वपूर्ण काम करतात व या क्षेत्रात पदवी मिळवलेल्यांना वार्षिक चार ते पंधरा लाखापर्यंत पॅकेज मिळते.
8- मटेरियल सायन्स इंजीनियरिंग– मटेरियल सायन्स इंजिनियर स्टडी मटेरियल इत्यादी बद्दल तज्ञ असतात व त्यांना वार्षिक तीन लाखापासून ते दहा लाख रुपये पर्यंत पॅकेज मिळते.
9- अणू अभियांत्रिकी– अणू अभियंते अनुभट्याची रचना करण्याचे महत्त्वपूर्ण काम करतात व या क्षेत्रातील पदवीधर विद्यार्थ्यांना पाच ते वीस लाख रुपयांपर्यंत वार्षिक पॅकेज मिळते.