EPFO Rule: आता पीएफ खात्यातून 15 ते 20 दिवस नाही तर 3 दिवसात काढता येतात 1 लाख! वाचा ईपीएफओचा नवीन नियम

दावे सेटल होण्यासाठी 15 ते 20 दिवसांचा देखील कालावधी लागायचा. परंतु आता कर्मचारी निर्वाह निधी संघटनेच्या माध्यमातून या संदर्भातले अनेक नियमांमध्ये बदल करण्यात आलेला आहे  व त्यामुळे नक्कीच कर्मचाऱ्यांच्या या येणाऱ्या समस्या कमी झाल्या आहेत.

Published on -

EPFO Rule:- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओ ही कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाची संघटना असून कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्याचे नियमन करण्याचे महत्त्वपूर्ण काम या संघटनेच्या माध्यमातून पार पाडले जाते. नोकरीच्या करत असताना कर्मचाऱ्यांच्या पगारामधून प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीएफ साठी प्रत्येक महिन्याला पगारातून कपात होते व ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या पीएफ खात्यात जमा होत असते हे आपल्याला माहिती आहे.

अशाप्रकारे पीएफ खात्यात जमा झालेल्या रकमेतून बऱ्याचदा एखाद्या आर्थिक गरजे वेळी कर्मचारी पैसे काढतात. परंतु अशाप्रकारे पैसे काढण्यामध्ये कर्मचाऱ्यांना अगोदर अनेक प्रकारच्या समस्या यायच्या.

अगदी यामध्ये दावे सेटल होण्यासाठी 15 ते 20 दिवसांचा देखील कालावधी लागायचा. परंतु आता कर्मचारी निर्वाह निधी संघटनेच्या माध्यमातून या संदर्भातले अनेक नियमांमध्ये बदल करण्यात आलेला आहे  व त्यामुळे नक्कीच कर्मचाऱ्यांच्या या येणाऱ्या समस्या कमी झाल्या आहेत.

 ईपीएफओने केले नियमात बदल

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या माध्यमातून अनेक नियमांमध्ये काही बदल करण्यात आलेले असून यामुळे कर्मचाऱ्यांना येणाऱ्या काही समस्या कमी झाल्या आहेत. यामध्ये शिक्षण तसेच वैद्यकीय, लग्नकार्य व गृहनिर्माण हेतूसाठी जे काही आगाऊ दावे कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून दाखल केले जायचे ते दावे निकाली काढण्यासाठी आता ऑटो मोड सेटलमेंटची सुविधा प्रदान केली आहे.

या सुविधेचा लाभ ज्या पीएफ खातेधारकांचे उत्पन्न सहा कोटींपेक्षा जास्त आहे त्यांना मिळणार आहे. आपत्कालीन  परिस्थितीमध्ये लोकांना पैसे पटकन उपलब्ध करून देण्यासाठी ही सुविधा आणण्यात आलेली आहे. या अगोदर जर तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यातून पैसे काढायचे असतील तर दावा करण्यापूर्वी 15 ते 20 दिवस या लागायचे.

परंतु आता हे काम अगदी तीन ते चार दिवसात सहजपणे पूर्ण होते. अगोदर अशा दाव्यांमध्ये संबंधित सदस्याचे पात्रता तसेच कागदपत्रे, ईपीएफ खात्याची केवायसी स्टेटस व बँक खाते इत्यादी तपशील तपासायला खूप वेळ लागायचा. परंतु आता या ऑटो मोड म्हणजे स्वयंचलित प्रणालीमुळे हे काम अगदी सोपे झाले आहे.

 कुणाला काढता येतात अशा पद्धतीने पैसे?

आपत्कालीन परिस्थितीमध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या क्लेम सेटलमेंट साठी ऑटो मोड सुविधा एप्रिल 2020 मध्ये सुरू करण्यात आलेली होती व तेव्हा या माध्यमातून आजारपणातच पैसे काढता येत होते.

परंतु आता यामध्ये वाढ करण्यात आली असून तुम्ही आजारपणा व्यतिरिक्त शिक्षण, लग्नकार्य आणि घराच्या खरेदीसाठी देखील पीएफ खात्यातून पैसे काढू शकतात. इतकेच नाहीतर घरामध्ये बहीण आणि भावाचे लग्न असेल तरी आपल्याला पीएफ खात्यातून आता पैसे काढता येतात.

 अशा पद्धतीने खातेधारक किती रक्कम काढू शकतो?

ईपीएफओ खात्यातून खातेधारकांना एक लाख रुपये पर्यंत आगाऊ रक्कम काढता येणे आता शक्य आहे. अगोदर ही मर्यादा 50 हजार रुपये इतकी होती व आता ती एक लाख पर्यंत वाढवण्यात आलेली आहे.

आता तुम्ही एकदा पैसे काढण्यासाठी चा दावा दाखल केल्यानंतर तीन दिवसात पैसे तुमच्या खात्यावर पाठवले जातील. याकरिता केवायसी तसेच दाव्याच्या विनंतीची पात्रता व बँक खात्याचा तपशील देणे गरजेचे असणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!