Fact Of Bats:- पृथ्वीतलावर असंख्य असे प्राणी आणि कीटकांचे वास्तव्य असून आपल्याला सांगता येणार नाही इतके प्राणी आणि वेगवेगळ्या प्रकारचे कीटक अस्तित्वात आहेत. यातील जर काही कीटक किंवा प्राण्यांचे वैशिष्ट्ये पाहिले तर ते वेगवेगळ्या स्वरूपाचे असून यातील काही प्राणी त्यांच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांमुळे खास आहेत.
प्राण्यांमध्ये काही हिंस्र प्राणीदेखील असतात. अशा पद्धतीने आपल्याला असंख्य अशी वैशिष्ट्ये प्राण्यांची सांगता येतील. यातीलच जर आपण वटवाघुळ याचा विचार केला तर आपल्याला त्यांच्याबद्दल खास वैशिष्ट्ये सांगता येईल ते म्हणजे ते झाडावर उलटे लटकलेले असतात व त्यासोबतच रात्रीच्या वेळी जास्त प्रमाणात उडताना दिसतात.

जर आपण वटवाघळांचे वैशिष्ट्य पाहिले तर त्यांचे वास्तव्य हे जसे वाळवंटात आहे तसेच बर्फाळ प्रदेशात देखील आहे. वटवाघळामध्ये अनेक वैशिष्ट्य असून त्याबद्दलचेच महत्त्वाची माहिती आपण या लेखात बघणार आहोत.
वटवाघळांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य
वटवाघुळांबद्दल असं म्हटलं जातं की, जेव्हा या पृथ्वीतलावर डायनासोर अस्तित्वात होते त्यांच्या आधीपासून वटवाघुळ या पृथ्वीतलावर अस्तित्वात आहेत. ते थंड प्रदेशात देखील राहतात आणि सगळ्यात उच्च तापमान असलेल्या वाळवंटात देखील राहू शकतात.
वटवाघळांमधील जर मेक्सिकन वटवाघुळ या जातीचे वैशिष्ट्ये पाहिले तर ही जात उंच उडू शकते व त्यातीलच भुरक्या रंगाचे जे काही वटवाघळ असतात ते तेव्हा झोपलेले असतात तेव्हा आपल्याला असं वाटतं की ते श्वास घेत नाहीत. तसेच इतर जीव किंवा प्राण्यांच्या तुलनेमध्ये मासे वटवाघुळांना खूप लवकर दिसतात.
कारण यामध्ये जे वटवाघुळ मासे पकडणाऱ्या वर्गात येतात त्यांच्यामध्ये एक खास सेंसर असते त्यामुळेच त्यांना मासे लवकर दिसण्यास मदत होते. आपण जे काही वटवाघुळ पाहतो ते प्रामुख्याने काळ्या रंगाचे आपल्याला दिसून येतात. परंतु या व्यतिरिक्त वटवाघळांच्या काही जाती या पांढऱ्या रंगाच्या देखील आहेत व त्यांचे नाक पिवळे असते. यामध्ये प्रामुख्याने होंडुरंन या नावाच्या वटवाघुळाचा समावेश करता येईल.
वटवाघुळ झाडावर उलटे का लटकतात?
आपल्याला माहित आहेच की इतर पक्षांप्रमाणे वटवाघूळ जमिनीवरून उडू शकत नाहीत. कारण त्यांच्या पंखांची रचनाच अशी असते की त्यामुळे त्यांना उंच झेप घेता येत नाही आणि त्यांच्या मागच्या बाजूचे पाय अतिशय लहान व विकसित असल्यामुळे त्यांना धावून वेग पकडता येणे अशक्य होते.
जेव्हा ते उलटे लटकलेले असतात तेव्हाच त्यांना सहजपणे उडता येणे शक्य होते. बऱ्याचदा जर आपण एखाद्या किल्ला किंवा गुहेमध्ये गेलो तर अशा अंधाऱ्या गुहेमध्ये त्यांचे वास्तव्य सामान्यपणे आढळून येते. जेव्हा ते उलटे लटकलेले असतात किंवा झोपलेले असतात तेव्हा ते खाली का पडत नाही?
हा देखील प्रश्न आपल्या मनात येत असतो. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांच्या पायांची रचना अशी असते व त्यांच्या पायाचे पंजे हे त्यांचे वजन उचलण्यास मदत करत असतात. म्हणजेच एकंदरीत वटवाघुळांची रचना ही वातावरणाच्या हिशोबाने होत असते.काही वटवाघुळांचे पंख लांब असतात.
तसेच ते काळे, पांढरे आणि लाल रंगाचे देखील असतात. थायलंड या देशांमध्ये आढळणाऱ्या भौरा या वटवाघुळाचे वजन सगळ्यात कमी असते. त्यासोबतच इंडोनेशिया या देशांमध्ये जे वटवाघुळ आढळून येतात
त्यांचे पंख चक्क सहा फुटापर्यंत पसरवू शकतात. तसेच लॅटिन अमेरिकेमध्ये जे वटवाघुळ आढळून येतात त्यातील 70% वटवाघुळ पिवळ रक्त पितात तर कॅनडामध्ये जे काही वटवाघळं आढळून येतात ते प्रामुख्याने कीटक खात असतात.
अशा पद्धतीने जर आपण पाहिले तर वटवाघुळ यांचे विविध जाती किंवा प्रकार आणि त्यांचे वेगवेगळे वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्या पंखांची आणि पायांची रचनामुळेच ते झाडांना उलटे लटकतात.