Farmer Success Story: बीडच्या पवार बंधूंनी तर कमालच केली! केली ‘या’ मिरचीची लागवड आणि एकरी मिळवला 3 लाख रुपयांचा नफा

Ajay Patil
Published:
farmer success story

Farmer Success Story:- पारंपरिक पिकांऐवजी आणि पारंपारिक शेती पद्धत काळाच्या ओघात मागे पडली असून तंत्रज्ञानाच्या मदतीने आता शेतकरी वेगवेगळे प्रकारचे पिके घेऊन कमीत कमी क्षेत्रामध्ये देखील लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवताना आपल्याला दिसून येत आहे. तसेच तंत्रज्ञानाची मदत शेतकऱ्यांना आता मोठ्या प्रमाणावर होताना दिसून येत असल्याने त्याचा देखील सकारात्मक परिणाम हा शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीवर दिसून येत आहे.

आधुनिकतेच्या बळावर आता अनेक तरुण शेतकरी शेतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर यशस्वी होत आहेत. आत्ताची पिकपद्धती संपूर्ण बदलली असून मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या प्रकारची भाजीपाला व फळ पिकांची लागवड शेतकरी करतात व त्याला तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने कमीत कमी क्षेत्रात भरघोस उत्पादन देखील मिळते.

याच अनुषंगाने जर आपण बीड जिल्ह्यातील चाकरवाडी येथील अमोल आणि मिथुन पवार हे दोन भाऊ पाहिले तर यांची शेती देखील आधुनिक पद्धतीचे असून दोघेही भाऊ प्रयोगशील शेतकरी आहेत. या दोन्ही भावांनी मिरची लागवडीच्या माध्यमातून लाखो रुपयांचा नफा मिळवला आहे.

नेमकी त्यांनी कोणत्या मिरचीची लागवड केली व कसे या माध्यमातून चांगला नफा मिळवता? याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत. पवार बंधूंनी मिरची पिकातून मिळवला एकरी तीन लाखांचा नफा याबाबत सविस्तर वृत्त असे की, बीड जिल्ह्यात असलेल्या चाकरवाडी या गावचे अमोल आणि मिथुन पवार या दोन भावांनी मिरची लागवड करण्याचा निर्णय घेतला

व त्याकरिता रेड पेपरीका जातीची निवड केली. परंतु या अगोदर त्यांनी विविध कृषी प्रदर्शने तसेच इतर ठिकाणहून याबद्दलची संपूर्ण माहिती गोळा केली 2021 यावर्षी रेड पेपरीका या मिरचीची लागवड केली. 2021 पासून त्यांनी या मिरची लागवडीमध्ये सातत्य ठेवले आहे व ते चांगले उत्पन्न या माध्यमातून मिळवत आहेत.

तसेच त्यांचे हे यश पाहून इतर शेतकरी देखील त्यांच्या मार्गदर्शनाखाली या मिरचीची लागवड करत असल्याचे दिसून येत आहे. कसे आहे या मिरचीचे अर्थकारण? साधारणपणे पाच महिन्यांचे हे पीक असून ऑक्टोबर महिन्यामध्ये जर रेड पेपरिका मिरचीची लागवड केली तर साधारणपणे जानेवारी,

फेब्रुवारी आणि मार्च असे तीन महिन्यात तीन तोडे निघतात आणि त्यानंतर मात्र सुकलेली म्हणजेच वाळलेली लाल मिरची कंपन्यांकडून ठरलेल्या दरानुसार खरेदी केली जाते. जर आपण या मिरची उत्पादनाचा खर्च पाहिला तर तो लागवडीपासून ते काढणीपर्यंत एकरी 80 हजार रुपयांपर्यंत येतो.

संपूर्ण खर्चमध्ये बियाण्यापासून तर रोप निर्मिती, लागवडीसाठी शेतीची तयारी करण्यापासून तर बेड तयार करणे, मल्चिंग पेपर अंथरणे व ठिबक सिंचन इत्यादी गोष्टींचा अंतर्भाव होतो. विशेष म्हणजे कंपनीच्या माध्यमातून नेहमीच आठ दिवसांनी या मिरचीची पाहणी देखील केली जाते.

कंपनीचे कर्मचारी या पाहणी दरम्यान आवश्यक अशा उपाययोजना देखील सुचवतात तसेच फवारणी कोणती करावी याबद्दलची माहिती देखील दिली जाते. फवारणीमध्ये साधारणपणे कीटकनाशक तसेच बुरशीनाशक व इतर खतांची फवारणी केली जाते. हा संपूर्ण खर्च 80 हजार रुपये एकरी पर्यंत जातो.

जर आपण रेड पेपरिका मिरचीचे बाजार भाव पाहिले तर उत्तम दर्जाच्या मिरचीला 295 रुपये किलो आणि दुय्यम दर्जाच्या मिरचीला 270 रुपये किलो पर्यंत दर मिळतो. एकरी तीन ते साडेतीन लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न एक एकरमध्ये मिळू शकते. सगळा खर्च वजा केला तर एका एकरमध्ये अडीच ते तीन लाख रुपयांचा निव्वळ नफा या मिरची लागवडीतून मिळतो असं देखील पवार बंधू सांगतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe