आपल्याला माहित आहे की आपण जेव्हा महामार्गावरून प्रवास करत असतो तेव्हा आपल्याला टोलनाक्यांवर टोल द्यावा लागतो व तेव्हाच आपल्याला पुढे जाता येते. परंतु बऱ्याचदा टोलनाक्यावर वाहनांच्या रांगाचरांगा लागलेल्या आपल्याला दिसून येतात. या समस्येवर उपाय म्हणून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टोल घेतला जातो व यामुळे आता टोलनाक्यांवर जे काही गर्दी होते त्याचे प्रमाण कमालीचे घटलेले आहे.
कारण यामध्ये फास्टटॅग खूप महत्त्वाचे ठरले व यामुळे टोल नाक्यावरील गर्दी कमी होण्यास मदत झाली. फास्ट टॅग हे खूप फायद्याचे आहे परंतु यासंबंधी एक महत्त्वाचे काम तुम्हाला 31 जानेवारी 2024 म्हणजेच उद्यापर्यंत पूर्ण करणे गरजेचे आहे. नाहीतर तुम्ही तुमच्या वाहनावर लावलेले फास्टटॅग निष्क्रिय करण्यात येणार आहे.
फास्टटॅग ब्लॅकलिस्ट होऊ नये म्हणून काय करावे?
याबाबत सविस्तर वृत्त असे की, 31 जानेवारी 2024 पर्यंत तुम्ही जर केवायसी ची प्रक्रिया पूर्ण केली नाही तर तुमच्या वाहनांवर लावलेले फास्ट टॅग निष्क्रिय म्हणजेच ब्लॅक लिस्ट करण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्हाला उद्या शेवटची मुदत असल्यामुळे यासाठीची आवश्यक केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.
परंतु नेमकी ही केवायसीची प्रक्रिया पूर्ण कशी करावी याबाबत बऱ्याच लोकांना अजून देखील माहिती नसल्यामुळे जर हे काम पूर्ण राहिले तर मात्र तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. याकरिता तुम्हाला केवायसी पूर्ण करणे गरजेचे आहे व त्यासाठी तुम्हाला पुढील काही गोष्टींचा अवलंब करावा लागेल व त्याकरिता….
1- सर्वप्रथम तुम्हाला https://fasttag.ihmcl.com या वेब पोर्टल वर जावे लागेल व आपला जो काही रजिस्टर मोबाईल नंबर आणि पासवर्ड आहे त्या आधारे आपल्या अकाउंटवर लॉगिन करावे लागेल.
2- त्यानंतर सेंड ओटीपी वर क्लिक करून जो ओटीपी येईल तो सबमिट करून तुमच्या फास्ट टॅग व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
3- लॉगिन केल्यानंतर डॅशबोर्ड वर दिसत असलेल्या माय प्रोफाइल वर क्लिक करा आणि त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन वेळी दिलेली सर्व माहिती तुम्हाला दिसेल.
4- केवायसी पूर्ण करण्यासाठी याच माय प्रोफाईल्स विभागांमध्ये केवायसी या पर्यायावर जावे.
5- त्यानंतर आवश्यक असलेले ओळखपत्र तसेच पत्त्या संबंधित माहिती भरावी.
6- तसेच तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो आणि पत्त्यासाठी लागणारा पुरावा अपलोड केल्यानंतर तुमची फास्ट टॅगची केवायसी प्रक्रिया पूर्ण होते.
अशा पद्धतीने तुम्ही फास्टटॅग केवायसी प्रक्रिया पूर्ण करून तुमचे फास्टटॅग ब्लॅकलिस्ट होण्यापासून वाचवू शकतात.