LIC Saral Pension Plan : LIC च्या ‘या’ योजनेत एकदाच गुंतवा पैसे अन् आयुष्यभर मिळवा पेन्शन !

Content Team
Published:
LIC Saral Pension Plan

 

LIC Saral Pension Plan : एलआयसी कडून अनेक योजना राबवल्या जातात, लोकांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी या योजना राबवल्या जात आहेत, यापैकी एक म्हणजे सरल पेन्शन योजना, भविष्याच्या दृष्टीने ही एक उत्तम योजना आहे. आज आपण या योजनेबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.

लोकांच्या वृद्धापकाळात त्यांचे उत्पन्न पूर्णपणे बंद होते, अशास्थितीत जर तुम्ही एखादी चांगली पेन्शन योजना शोधत असाल तर ही एक चांगली योजना आहे, या योजनेत पैसे गुंतवून तुम्ही नियमित पेन्शन मिळवू शकता. LIC आपल्या ग्राहकांसाठी एकापेक्षा जास्त पेन्शन योजना चालवत आहे, त्यापैकी LIC सरल पेन्शन योजना एक आहे

LIC सरल पेन्शन योजनेमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार पेन्शनची व्यवस्था करू शकता, जसे की मासिक पेन्शन किमान 1,000, त्रैमासिक पेन्शन किमान 3,000, सहामाही पेन्शन किमान 6,000 आणि वार्षिक पेन्शन किमान 12,000 रूपये, तुम्ही या योजनेत एकरकमी रक्कम गुंतवू शकता.

सध्या असे अनेक लोक आहेत, ज्यांच्याकडे लाखो रुपये आहेत, ते हे पैसे गुंतवण्याचा किंवा वृद्धापकाळात उपयोगी पडेल अशा काही योजनेत गुंतवण्याचा विचार करत असतात. अशा व्यक्तींसाठी ही योजना उत्तम आहे.

या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही 42 वर्षांचे असाल आणि तुम्ही 30 लाख रुपयांची ॲन्युइटी खरेदी करत असाल, तर तुम्ही 12,388 रुपये मासिक पेन्शनसाठी पात्र आहात.

एलआयसी सरल पेन्शन योजनेची ही खास वैशिष्ट्ये !

-LIC ची सरल पेन्शन योजना ही एक नॉन-लिंक्ड, सिंगल प्रीमियम, वैयक्तिक तत्काळ वार्षिकी योजना आहे.

-यामध्ये पैसे गुंतवून तुम्ही पेन्शनची व्यवस्था करू शकता.

-या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी किमान वय 40 वर्षे आणि कमाल वय 80 वर्षे आहे.

-एलआयसीची ही योजना घेताना गुंतवणूकदाराला एकरकमी प्रीमियम भरावा लागतो.

-यामध्ये आयुष्यभर पेन्शन मिळते.

-योजना योग्य नसल्यास, तुम्ही ही पॉलिसी सुरू झाल्यापासून 6 महिन्यांनंतर कधीही सरेंडर करू शकता.

-या LIC योजनेअंतर्गत तुम्ही कर्जासाठी अर्ज करू शकता.

-आपत्कालीन स्थितीत तुम्ही या आजाराच्या उपचारासाठी येथे जमा केलेले पैसेही काढू शकता.