7 KW Solar Panel:- सौर ऊर्जेचा वापर आता काळाची गरज असून येणाऱ्या कालावधीत मोठ्या प्रमाणावर सौर ऊर्जेचा वापर केला जाईल. तसेच सौर ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून देखील अनेक योजना राबविण्यात येत असून या योजनांच्या माध्यमातून तुम्ही जर तुमच्या घराच्या छतावर सौर पॅनल बसवले तर त्याला अनुदान देण्यात येते व एवढेच नाही तर पीएम कुसुम योजनेच्या माध्यमातून शेतात सौर पंप बसवण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान मिळते.
सध्या सौर पॅनलचा वापर घरापासून तर ऑफिस तसेच शेती व इतर अनेक क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. सोलर पॅनलच्या माध्यमातून तयार होणारी वीज आपल्या घरगुती तसेच शेती व कार्यालयीन वापराकरिता वापरता येते व त्यामुळे वीज बिलाचा बोजा कमी होऊ शकतो.
एवढेच नाही तर या सोलर पॅनल च्या माध्यमातून तयार होणारी अतिरिक्त वीज विकून पैसा देखील कमावता येतो. त्यामुळे तुम्ही जर सात किलो वॅटचे सौर पॅनल बसवले तर तुमच्या सर्व विजेच्या गरजा भागवता येऊन तुम्ही विजेची विक्री देखील करू शकता.
सात किलोव्हॅटचे सौर पॅनल व त्याचे फायदे
जर तुमच्या घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये दररोज 35 युनिटपर्यंत विजेचा वापर होत असेल किंवा विजेचा भार पडत असेल तर तुम्हाला सात किलोवॅटचे सोलर पॅनल फायद्याचे ठरते. तुम्ही तुमच्या गरजेनुसार ऑन ग्रीड, ऑफ ग्रिड सोलर पॅनलचा प्रकार बसवू शकतात. सात किलोवॅट क्षमतेचे सोलर पॅनल तुम्ही घर, शाळा तसेच कॉलेज, शोरूम, दुकाने आणि कार्यालय इत्यादी ठिकाणी इन्स्टॉल करू शकतात. सात किलो वॅट क्षमतेच्या सौर पॅनलमुळे तुम्ही सर्व विद्युत उपकरणे सहज वापरू शकतात.
किती आहे सात किलोवॅट सौर पॅनलची किंमत?
बाजारामध्ये अनेक ब्रँडचे सौर पॅनल सध्या उपलब्ध आहेत. यामध्ये प्रामुख्याने..
1-पॉली क्रिस्टलाइन सोलर पॅनल या प्रकारच्या सोलर पॅनलचा वापर बहुतेक सोलर सिस्टममध्ये केलेला असतो. या सोलर पॅनलची किंमत सर्वात कमी असते व हे पारंपारिक तंत्रज्ञानाचे सोलर पॅनल असते. या प्रकारच्या सात किलोवॅट क्षमतेच्या सोलर पॅनलची किंमत सुमारे दोन लाख दहा हजार रुपयापर्यंत असू शकते.
2-मोनोक्रिस्टलाइन सौर पॅनल– या प्रकारच्या सौर पॅनलची कार्यक्षमता खूप जास्त असते व याची किंमत सुमारे दोन लाख 40 हजार ते दोन लाख 80 हजार रुपयापर्यंत असू शकते. या प्रकारच्या सौर पॅनलचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे तुम्ही कमी जागेत देखील इन्स्टॉल करू शकतात.
3- बाय फेशियल सोलर पॅनल– हा सर्वात आधुनिक सौर पॅनलचा प्रकार असून याचा वापर करून दोन्ही बाजूने वीज तयार केली जाते. या प्रकारच्या सोलर पॅनलची किंमत अंदाजे दोन लाख 80 हजार ते तीन लाख वीस हजार रुपयापर्यंत असू शकते.
किती मिळेल अनुदान?
केंद्र सरकारच्या माध्यमातून सोलर पॅनल बसवण्यासाठी नागरिकांना अनुदान देण्यात येत आहे. त्यामुळे तुम्हाला कमीत कमी खर्चामध्ये सोलर पॅनल बसवता येणे शक्य आहे. जर सरकारच्या माध्यमातून विविध योजना अंतर्गत मिळणारे अनुदान पाहिले तर…
पीएम सूर्यघर मोफत वीज योजना– या योजनेची सुरुवात या वर्षापासून करण्यात आली असून यामध्ये जर तुम्ही तीन किलोवॅट ते दहा किलोवॅट क्षमतेची ऑन ग्रिड सोलर सिस्टम बसवली तर त्यावर 78 हजार रुपयापर्यंत अनुदान मिळू शकते.
कुसुम सोलर पॅनल योजना– ही देखील एक महत्त्वाची योजना असून या योजनेच्या माध्यमातून शेतात सौर पंप बसवण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान मिळते. सौर कृषी पंपाकरिता बसवण्यात येणाऱ्या सौर पॅनलवर शेतकऱ्यांना 60 टक्क्यांपर्यंत सबसिडी दिली जाते.