जेव्हा आपण घर बांधतो तेव्हा घराच्या आजूबाजूला किंवा घराच्या बाल्कनीत आपण अनेकविध झाडांची लागवड करतो. यामागे आपला उद्देश असतो की घराच्या आजूबाजूचे आणि घरातील वातावरण शांत आणि आनंददायी रहावे आणि घरातील परिसर हा सुंदर दिसावा. काही काही घरांच्या आजूबाजूला प्रशस्त असा बगीचा देखील असतो व या बगीचामध्ये देखील अनेक प्रकारच्या वनस्पतींची लागवड केली जाते.
यामध्ये काही वेलवर्गीय वनस्पती असतात तर काही फुलझाडे असतात. त्यामुळे अशा पद्धतींच्या वनस्पती किंवा सजावटींच्या झाडांमुळे घराचे सौंदर्य खुलून दिसते. परंतु जर आपण वास्तुशास्त्रानुसार बघितले तर यातील काही झाडे खूप छान दिसतात. परंतु ते वास्तुशास्त्रानुसार अशुभ समजले जातात किंवा त्यांना अशुभ मानले जाते.
वास्तुशास्त्रानुसार बघितले तर घरामध्ये लावलेली काही झाडे हे सकारात्मक ऊर्जा प्रसारित करण्यासाठी फायद्याचे ठरतात व यामुळे घरात सुख समृद्धी येते. परंतु बऱ्याचदा नकळत आपल्याकडून अशी झाडे लावले जातात की ते दिसायला खूप सुंदर असतात व त्यामुळे घराच्या सौंदर्यात देखील भर पडते.
परंतु या झाडांमुळे मात्र घरात नकारात्मकता येते व कौटुंबिक परिस्थितीमध्ये देखील काही समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे या लेखामध्ये आपण वास्तुशास्त्रानुसार घरात कोणते झाड लावणे योग्य नाही याबाबतची महत्वपूर्ण माहिती बघणार आहोत.
घरात किंवा घराजवळ चुकून देखील लावू नये ही झाडे
1- निवडुंग– बऱ्याच घराच्या कुंड्यांमध्ये किंवा बाहेरच्या बगीचा मध्ये आपल्याला निवडुंगाचे रोपटे लावलेली दिसून येते. परंतु वास्तुशास्त्रानुसार बघितले तर या झाडामुळे घराच्या प्रगतीमध्ये किंवा तुमच्या प्रगतीत बाधा येऊ शकते. वास्तुशास्त्रानुसार निवडुंग या झाडाला शुभ मानले जात नाही. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये निवडुंग किंवा काटेरी कुठल्याही पद्धतीचे झाड लावू नये. अशा पद्धतीच्या झाडांमुळे घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते आणि कुटुंबात तणाव देखील वाढतात.
2- मेहंदीचे झाड किंवा रोप– बऱ्याच घरांत कुंड्यांमध्ये किंवा बगीचा मध्ये आपल्याला मेहंदीचे रोप लावलेले दिसून येते. मेहंदी म्हटले म्हणजे लग्नासारख्या शुभकार्यात देखील याचा वापर केला जातो. परंतु वास्तुमध्ये मेहंदीची वनस्पती ही चांगली मानली जात नाही. असे मानले जाते की या वनस्पतीमध्ये काही वाईट शक्तींचा वास असतो आणि घरात ही वनस्पती लावल्यामुळे नकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो.
3- बोन्साय वनस्पती– बोन्साय वनस्पतीचे रोप घरी ठेवणे देखील चांगले मानले जात नाही. जर आपण वास्तुशास्त्रातील तज्ञांचे मत पाहिले तर त्यांच्या मतानुसार ही वनस्पती घरात लावल्यामुळे प्रगती थांबते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये घरामध्ये बोन्साय वनस्पती लावू नये.