मागेल त्याला शेततळे ! वर्षभरात १४ हजार शेततळी, एकट्या अहमदनगरमध्ये ३ हजार १८९ शेततळ्यांची निर्मिती,पहा जिल्हावाईज यादी

Pragati
Published:
shetatali

महाराष्ट्रामध्ये कृषी विभागामार्फत ‘मागेल त्याला शेततळे’ (मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना) ही योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये शेतकऱ्यांना शेततळे बांधण्यासाठी अनुदान दिले जाते. या योजनेतंर्गत महाराष्ट्रात वैयक्तिक १३ हजार ५०० शेततळ्यांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. प

रंतु राज्यात या उद्दिष्टापेक्षाही जास्त शेततळी निर्माण झाली आहेत. राज्यात तब्बल १४ हजार २२ शेततळी तयार झाली आहेत. यामध्ये एकट्या अहमदनगर जिल्ह्यात ३ हजार १८९ शेततळी तयार झाली आहेत. अहमदनगर पाठोपाठ नाशिक, सोलापूर, सांगली, सोलापूर आघाडीवर आहे.

‘महाडीबीटी’ मार्फत शेतकरी शेततळ्यासाठी अर्ज करतात. याद्वारे तब्बल २ लाख १४ हजार ९४३ शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. यातून मग सोडतीद्वारे वैयक्तिक शेततळ्याच्या लाभार्थ्यांची निवड झाली. यामध्ये २ हजार ४४८ अर्ज शासनाने बाद केल्याची माहिती समजली आहे.

१ लाख ६३ हजार ४०८ शेतकऱ्यांनी वेळेत कागदपत्रे सादर केली नसल्याची माहिती समजली आहे. शेततळ्यासंदर्भात जवळपास ३३ हजार ९३४ शेतकऱ्यांची प्रक्रिया पूर्ण झाली असून १४ हजार २२ शेतकऱ्यांनी मार्च २०२४ अखेर कामे पूर्ण केलीत. यामधील १३ हजार ४६ शेतकऱ्यांना आतापर्यंत अनुदान मिळालेय. यात अहमदनगर जिल्हा अव्वल असल्याचे दिसते.

जिल्हानिहाय शेततळी
ठाणे जिल्ह्यात ८६ शेततळी झाली आहेत. पालघर जिल्ह्यात ८५ शेततळी झाली आहेत. रायगड जिल्ह्यात ९८ शेततळी झाली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात ५४ शेततळी झाली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात २२ शेततळी झाली आहेत. नाशिक जिल्ह्यात २२१९ शेततळी झाली आहेत. धुळे जिल्ह्यात १५४ शेततळी झाली आहेत. जळगाव जिल्ह्यात २३६ शेततळी झाली आहेत. नंदुरबार जिल्ह्यात ९२ शेततळी झाली आहेत. नगर जिल्ह्यात ३१८९ शेततळी झाली आहेत.

पुणे जिल्ह्यात ९१८ शेततळी झाली आहेत. सोलापूर जिल्ह्यात १५५७ शेततळी झाली आहेत. सातारा जिल्ह्यात २४८ शेततळी झाली आहेत. सांगली जिल्ह्यात १३२८ (शेततळी झाली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात १६८ शेततळी झाली आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ७२९ शेततळी झाली आहेत. जालना जिल्ह्यात ७३५ शेततळी झाली आहेत. बीड जिल्ह्यात १९९ शेततळी झाली आहेत. लातूर जिल्ह्यात १०६ शेततळी झाली आहेत. धाराशिव जिल्ह्यात २०० शेततळी झाली आहेत.

नांदेड जिल्ह्यात ९२ शेततळी झाली आहेत. परभणी जिल्ह्यात ११० शेततळी झाली आहेत. हिंगोली जिल्ह्यात ४९ शेततळी झाली आहेत. बुलडाणा जिल्ह्यात १७३ शेततळी झाली आहेत. अकोला जिल्ह्यात ९६ शेततळी झाली आहेत. वाशीम जिल्ह्यात ४१ शेततळी झाली आहेत. अमरावती जिल्ह्यात ७४ शेततळी झाली आहेत.

यवतमाळ जिल्ह्यात १७ शेततळी झाली आहेत. वर्धा जिल्ह्यात १७ शेततळी झाली आहेत. नागपूर जिल्ह्यात ४० शेततळी झाली आहेत. भंडारा जिल्ह्यात ३९ शेततळी झाली आहेत. गोंदिया जिल्ह्यात १२२ शेततळी झाली आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात ५५ शेततळी झाली आहेत. गडचिरोली जिल्ह्यात ६८८ शेततळी झाली आहेत.

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe