भारतामध्ये अनेक स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून बजेट सेगमेंट मधील अनेक उत्तम वैशिष्ट्ये असलेले स्मार्टफोन सध्या लॉन्च करण्यात येत आहेत. यामध्ये सॅमसंग तसेच मोटोरोला व इतर कंपन्यांचा समावेश आहे. त्यासोबतच जर आपण टेक कंपनी इन्फीनिक्स कंपनीच्या दृष्टिकोनातून बघितले तर
ही कंपनी देखील आता 21 जून रोजी बजेट सेगमेंट मधील नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार असून या स्मार्टफोनमध्ये अनेक महत्त्वाची वैशिष्ट्ये देण्यात आलेली आहे. उदाहरणच घ्यायचे ठरले तर यामध्ये 108 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आणि आठ जीबी रॅमसह 256 जीबी स्टोरेज मिळणार आहे.
21 जून रोजी लॉन्च होणार इन्फीनिक्स नोट 40 5G स्मार्टफोन
याबाबत सविस्तर वृत्त असे की, महत्त्वाच्या असलेल्या टेक कंपनी इन्फीनिक्स 21 जून रोजी बजेट सेगमेंट मधील नवीन स्मार्टफोन इनफिनिक्स नोट 40 5G स्मार्टफोन लॉन्च करणार असून या कंपनीने या फोनमध्ये 6.78 इंच फुल एचडी +डिस्प्ले, 108 मेगापिक्सल मुख्य कॅमेरा आणि आठ जीबी रॅम सह 256 जीबी स्टोरेज दिले आहे. कंपनीच्या माध्यमातून हा स्मार्टफोन याआधी जागतिक मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आलेला आहे.
काय आहेत या स्मार्टफोनचे वैशिष्ट्ये?
1- कसा असेल डिस्प्ले?- या स्मार्टफोन मध्ये कंपनीने 120Hz फ्रेश रेटसह 6.78 इंच फुल एचडी+AMOLED डिस्प्ले दिला असून त्याचा कमाल ब्राईटनेस 1300 nits आणि रिझोल्युशन 1800×2436 इतके आहे.
2- कसा आहे कॅमेरा?- या स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफी आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग करिता स्मार्टफोनच्या मागील पॅनलवर ट्रिपल कॅमेरा देण्यात आलेला आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये 108 मेगापिक्सल+ दोन मेगापिक्सल+ दोन मेगापिक्सल कॅमेरा दिला असून त्यासोबत सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग करिता 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.
3- बॅटरी कशी आहे?- या स्मार्टफोनमध्ये कंपनीने 5000mAh बॅटरी दिली असून ज्यामध्ये चार्जिंग साठी 45W वायर्ड आणि 20W वायरलेस चार्जर सपोर्ट असेल.
4- ओएएस आणि प्रोसेसर कसे आहे?- उत्तम कामगिरी करिता या स्मार्टफोनमध्ये मीडिया टेक हिलीओ G99 चीप सेट आहे व तो अँड्रॉइड 14 ऑपरेटिंग सिस्टम वर चालतो.
5- रॅम आणि स्टोरेज कसे आहे-? या स्मार्टफोनमध्ये आठ जीबी रॅमसह २५६ जीबी स्टोरेज असेल व याबाबत काही मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की कंपनीने या स्मार्टफोनमध्ये आठ जीबी रॅम सोबत 512 जीबी स्टोरेजचा पर्याय देखील देण्याची शक्यता आहे.
किती आहे इन्फीनिक्स नोट 40 स्मार्टफोनची किंमत?
जर आपण मीडिया रिपोर्टनुसार बघितले तर या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 19999 रुपये असण्याची शक्यता आहे.