Gold-Silver Price:- गेल्या काही दिवसांपासून किंवा काही महिन्यांपासून आपण बघितले तर सोने आणि चांदीच्या दरामध्ये प्रचंड प्रमाणात दरवाढ झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे. इतकेच नाही तर दररोज सोने आणि चांदीच्या दरामध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहे. दररोज सोन्या चांदीच्या दरांमध्ये बदल झाल्याचे आपल्याला दिसून येते.
यामध्ये कधी कधी थोडीशी घसरण पाहायला मिळते तर कधी कधी दरवाढ होते. आज जर आपण सोन्याचे दर पाहिले तर यामध्ये थोडीशी वाढ झाल्याचे आपल्याला दिसून आले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना सोने खरेदी करणे जिकिरीचे होऊन बसले आहे. या अनुषंगाने या लेखामध्ये आपण आज सोने-चांदीचे चालू दर काय आहेत याबद्दलचे महत्त्वपूर्ण माहिती घेऊ.
काय आहेत सोने चांदीचे आजचे बाजार भाव?
जर आपण आज सोमवारचे सोन्याचे आणि चांदीचे दर पाहिले तर यामध्ये किंचितशी वाढ दिसून आली आहे. दहा ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर आज 72 हजार 80 रुपये असून मागील ट्रेडमध्ये सोन्याचे दर 72 हजार 70 रुपये इतके होते. चांदीचे दर आज 89530 रुपये प्रति किलो आहे व मागील ट्रेडमध्ये चांदी 89530 रुपये प्रति किलो होती. म्हणजेच चांदीच्या दरामध्ये कुठलाही बदल झालेला नाही.
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरातील आजचे सोन्याचे दर( बुलियन मार्केट वेबसाईट नुसार)
1- मुंबई शहर– मुंबई या ठिकाणी आज 22 कॅरेट सोन्याच्या दहा ग्रॅमची किंमत 65 हजार 954 इतकी आहे. तर 24 कॅरेट सोन्याच्या दहा ग्रॅम ची किंमत 71 हजार 950 रुपये आहे.
2- पुणे शहर– पुण्याला आज प्रतिदहा ग्राम 22 कॅरेट सोन्याचे दर हे 65 हजार 954 रुपये आहे तर 24 कॅरेट सोन्याचे दर 71 हजार 950 रुपये आहेत.
3- नागपूर शहर– नागपूर या ठिकाणी आज 22 कॅरेट सोन्याचे प्रती दहा ग्रॅमचे दर 65 हजार 954 असून 24 कॅरेट सोन्याचे दर 71 हजार 950 रुपये इतके आहेत.
4- नाशिक शहर– नाशिक या ठिकाणी आज प्रतिदहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे दर 65 हजार 954 रुपये असून 24 कॅरेट दहा ग्राम सोन्याचे दर 71 हजार 950 रुपये इतके आहेत.
काय असतो 24 कॅरेट आणि 22 कॅरेट मध्ये फरक?
24 कॅरेट सोने हे 99.99% शुद्ध असते आणि 22 कॅरेट अंदाजे 91% पर्यंत शुद्ध असते. 22 कॅरेट सोन्यामध्ये तांबे, जस्त आणि चांदी यासारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात.