FD News : भारतात गुंतवणुकीसाठी असंख्य पर्याय आहेत. गुंतवणूकदार आपल्या सोयीने आपल्या आवडत्या ठिकाणी गुंतवणूक करण्याला प्राधान्य देतात. यामध्ये एफडी हा देखील एक सर्वोत्कृष्ट पर्याय आहे. एफडीमध्ये फार आधीपासून गुंतवणूक करण्याचे चलन आहे.
दरम्यान एफडी अर्थातच फिक्स डिपॉझिटमध्ये जर तुमचीही गुंतवणूक करण्याची इच्छा असेल, आपला कष्टाचा पैसा वाया जाऊ नये म्हणून तुम्हीही सुरक्षित गुंतवणुकीसाठी एफडी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच कामाची आणि अतिशय मोलाची ठरणार आहे.

कारण की, आज आपण अशा 13 बँकांची माहिती जाणून घेणार आहोत ज्या की एफडीवर सर्वोच्च व्याजदर ऑफर करत आहेत. एफडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याचे कारण म्हणजे आता एफडी करणाऱ्यांना बँकेकडून चांगले व्याज ऑफर केले जात आहे.
यामुळे एकेकाळी सोन्यात गुंतवणूक करणाऱ्या महिला देखील आता एफडी करू लागल्या आहेत. एफडीमध्ये केलेली गुंतवणूक ही एकतर पूर्णपणे सुरक्षित असते आणि आता यावर चांगला रिटर्न देखील मिळत असल्याने येथे गुंतवणूक करण्याला आता विशेष पसंती दाखवली जात आहे.
FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँका
RBL बँक : ही बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फिक्स डिपॉझिट वर अर्थातच मुदत ठेवीवर चांगले व्याज देत आहे. ही बँक एफडीसाठी अधिक व्याजदर देणाऱ्या बँकांच्या यादीत येते. या बँकेकडून आपल्या ग्राहकांना 546 दिवसांपासून ते 24 महिन्यांपर्यंतच्या ठेवींवर 8.10% व्याज ऑफर केले जात आहे.
DCB बँक : ही देखील बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना आठ टक्क्यांपर्यंतचे व्याज देत आहे. ही बँक ग्राहकांना 25 महिने ते 26 महिन्यांच्या ठेवींवर 8% व्याज देत आहे. हे बँकेकडून एफडीसाठी दिले जाणारे सर्वाधिक व्याज आहे.
इंडसइंड बँक : या बँकेकडून FD वर 7.75% व्याज दिले जात आहे. हा व्याजदर 1 वर्ष ते 1 वर्ष 6 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या एफडी साठी लागू आहे.
IDFC फर्स्ट बँक : ही बँक देखील आपल्या ग्राहकांना 549 दिवसांपासून ते 2 वर्षांपर्यंतच्या ठेवींवर 7.75% व्याज दर देत आहे.
येस बँक : या बँकेकडून 18 महिने ते 24 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवींवर चांगले व्याज ऑफर केले जात आहे. या कालावधीच्या एफडीसाठी येस बँक 7.75% व्याज दर देत आहे.
पंजाब नॅशनल बँक : ही बँक ४०० दिवसांपर्यंतच्या ठेवींवर सर्वोच्च व्याजदर पुरवत आहे. या कालावधीच्या एफडीसाठी पंजाब नॅशनल बँकेकडून ७.२५% एवढं व्याजदर दिले जात आहे.
बँक ऑफ बडोदा : ही बँक 2 वर्षांपेक्षा जास्त आणि 3 वर्षांपर्यंतच्या ठेवींवर 7.25% व्याज दर देत असल्याची माहिती समोर आली आहे.
पंजाब अँड सिंध बँक : पंजाब अँड सिंध बँकेकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफ डी वर चांगली ऑफर दिली जात आहे. ४४४ दिवसांसाठी ही बँक ७.४० टक्के व्याजदर देत आहे.
कोटक महिंद्रा बँक : प्रायव्हेट सेक्टर मधील ही बँक देखील आपल्या ग्राहकांना एफडीसाठी चांगले व्याज देत आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोटक महिंद्रा बँकेकडून 390 दिवस आणि 23 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 2.75% ते 7.40% पर्यंतचे व्याज उपलब्ध करून दिले जात आहे.
HDFC बँक : एचडीएफसी बँक ही देशातील सर्वात सुरक्षित बँकेच्या यादीत येते. ही एक प्रायव्हेट बँक असून प्रायव्हेट सेक्टर मध्ये सर्वात मोठी बँक म्हणून या बँकेची ओळख आहे. ही प्रायव्हेट बँक आपल्या ग्राहकांना 18 महिने आणि 21 महिन्यांपर्यंतच्या एफडीसाठी 7.25 टक्के व्याज देत आहे.
ICICI बँक : ही देखील देशातील एक प्रमुख प्रायव्हेट सेक्टर बँक आहे. सदर बँकेच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांसाठी 15 महिने आणि 18 महिन्यांपर्यंतच्या कालावधीच्या एफडीवर 7.20 टक्के एवढे व्याजदर दिले जात आहे. ICICI बँक 18 महिने ते 2 वर्षांसाठी 7.20 टक्के व्याजदर देत आहे.
ॲक्सिस बँक : ही देखील प्रायव्हेट सेक्टरमधील बँक आहे. ही बँक 17 महिने आणि 18 महिन्यांच्या FD साठी 7.20 टक्के व्याजदर देत आहे.
SBI : एसबीआय अर्थात स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील एक प्रमुख पीएसबी आहे. पीएसबी अर्थातच पब्लिक सेक्टर बँक म्हणून या बँकेचा संपूर्ण जगात गौरव होतो. ही भारतातील सर्वात मोठी पीएसबी आहे. 2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर सदर पीएसबी बँकेकडून 7 टक्के व्याज दिले जात आहे.