Women Success Story :- शेतीला जोडधंदा म्हणून बऱ्याच वर्षापासून शेतकरी पशुपालन व्यवसाय करत आले असून सोबत आता कुक्कुटपालन, शेळीपालन, बटेर पालन, वराह पालनासारखे व्यवसाय करू लागले आहेत.
तसेच बरेच शेतकरी आता शेततळ्यामध्ये मत्स्यशेती म्हणजेच मत्स्यपालन करून देखील मोठ्या प्रमाणावर कमाई करत आहेत. ज्याप्रमाणे शेतीमध्ये उच्च तंत्रज्ञान आले अगदी त्याचप्रमाणे शेतीची निगडित असलेल्या जोडधंदयामध्ये देखील आता आधुनिक तंत्रज्ञानाचा शिरकाव झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक उत्पन्न मिळवणे शेतकऱ्यांना शक्य झाले आहे.

या अनुषंगाने मासे पालन व्यवसायाच्या दृष्टिकोनाने बघितले तर यामध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान आल्यामुळे मत्स्यपालनातून देखील शेतकऱ्यांना आता अधिकचे उत्पन्न मिळवण्यामध्ये मदत झाली आहे.
याच अनुषंगाने जर आपण उत्तर प्रदेश राज्यातील देवरिया जिल्ह्यामध्ये असलेल्या पिपरापट्टी या गावच्या महिला शेतकरी मनोरमा सिंह यांची यशोगाथा पाहिली तर त्यांनी मासेपालन व्यवसायातून आर्थिक समृद्धी मिळवली आहे.
मत्स्यपालनातून मिळवली आर्थिक समृद्धी
याबाबत सविस्तर वृत्त असे की, उत्तर प्रदेश राज्यातील देवरिया जिल्ह्यात असलेल्या पिपरा पट्टी या गावच्या मनोरमा सिंह या प्रगतीशील शेतकरी असून साधारणपणे 2021 मध्ये त्यांनी तब्बल पाच एकर जमिनीमध्ये साध्या पद्धतीने मासे पालन व्यवसायाला सुरुवात केलेली होती व या व्यवसायामध्ये त्या एक आदर्श महिला शेतकरी म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.
सातत्याने गेल्या तीन ते चार वर्षापासून या व्यवसायामध्ये असल्यामुळे त्यांना या व्यवसायातील बारकावे कळले व त्यांनी मागील तीन वर्षापासून बायोफ्लॉक या मत्स्यपालनाच्या आधुनिक पद्धतीचा अवलंब केला व त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक प्राप्ती त्यांना व्हायला लागली. जर आपण त्यांचे फक्त सहा महिन्याचे मासे पालनातून मिळणारे उत्पन्न पाहिले तर ते तब्बल आठ लाख रुपये इतके आहे.
काय आहे नेमके बायोफ्लॉक तंत्रज्ञान?
हे तंत्रज्ञान मासे पालन व्यवसायासाठी खूप महत्त्वाचे असून यामध्ये मासे पालन व्यवसाय करताना बायोफ्लॉक नावाचा जिवाणूचा वापर केला जातो. हे तंत्रज्ञान वापरल्यामुळे मासे पालन करताना माशांना सिमेंट किंवा मोठ्या प्लास्टिकच्या टाक्यांमध्ये वाढवले जाते. म्हणजेच त्यांचे संगोपन केले जाते व वाढीकरिता त्यांना सामान्यपणे जे खाद्य असते ते दिले जाते.
या खाद्याचा वापर मासे खाण्यासाठी करतात व मलस्वरूपामध्ये पाण्यात विस्टेच्या माध्यमातून परत 75 टक्के खाद्य पुन्हा पाण्यात टाकतात. तेव्हा बायोफ्लॉक जिवाणूंचे काम सुरू होते. हे जिवाणू माशांची पाण्यातील जी काही विष्टा असते त्याचे प्रोटीनमध्ये रूपांतर करण्याचे महत्त्वपूर्ण काम करतात व त्याला मासे पुन्हा खातात. म्हणजे या तंत्रज्ञानाचा वापर करून जे खाद्य तयार होते ते खाद्य खाल्ल्यामुळे माशांची वाढ खूप वेगाने होते.
मनोरमा सिंह कोणत्या माशांच्या जातींचे संगोपन करतात?
मनोरमा सिंह यांनी सरकारी अनुदानाचा लाभ घेतला व त्यानंतर मासे पालन व्यवसायाला सुरुवात केली. अनुदानामुळे सुरुवातीचा व्यवसायातील बराच खर्च त्यांचा वाचला. या तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांनी शेतामध्ये 35-35 फुटांचे छोटे तळ्यासारखे कृत्रिम तलाव तयार केलेले असून यामध्ये ते तीन वर्षापासून फंगीसियस आणि तीलपिया या प्रजातींच्या माशांचे पालन करतात.
या दोन्ही माशांच्या प्रजातीपासून त्यांना सहा महिन्यांमध्ये आठ लाखापर्यंत उत्पन्न मिळते व एका वर्षाला 15 ते 16 लाखांची कमाई ते सहजपणे या माध्यमातून करत आहेत. तसेच त्यांनी आता शेती विकत घेऊन मासेपालन व्यवसायामध्ये वाढ केली असून फंगेसियस व तीलपिया या माशांच्या प्रजाती सोबतच देशी मांगुर व सिंघी या माशांच्या प्रजातींचे देखील पालन करण्याचे त्यांनी आता नियोजन केलेले आहे.