3 लाखात घ्या बजाजची ‘ही’ 3 व्हीलर आणि सुरू करा स्वतःचा भाजीपाला किंवा दूध व्यवसाय! वाचा या 3 व्हिलरची वैशिष्ट्ये आणि किंमत

तुम्हाला देखील दूध व्यवसाय किंवा भाजीपाला बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्यासाठी तीनचाकी वाहन खरेदी  करायचे असेल तर तुम्ही बजाज मॅक्झिमा सी हे तीन चाकी वाहन खरेदी करू शकतात. ही बजाज कंपनीची थ्री व्हीलर स्वस्त तर आहेस शिवाय सीएनजी इंधनावर चालणाऱ्या पावरफुल इंजिनने सुसज्ज आहे.

Published on -

भारतीय व्यावसायिक वाहन बाजारपेठ बघितले तर यामध्ये अनेक कंपन्यांची वाहने असून ग्राहक हे त्यांचा बजेट आणि आवडीनुसार वाहनाची निवड करू शकतात. आपल्याला माहित आहे की,जास्त करून तीनचाकी वाहनांचा वापर हा व्यवसायिक दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणावर केला जातो.

अशी वाहने दुधाची वाहतूक तसेच भाजीपाला वाहतुकीसाठी खूप फायद्याचे ठरतात व शेतकरी वर्गासाठी तीन चाकी वाहनाचे महत्त्व अधिक आहे.

या अनुषंगाने तुम्हाला देखील दूध व्यवसाय किंवा भाजीपाला बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्यासाठी तीनचाकी वाहन खरेदी  करायचे असेल तर तुम्ही बजाज मॅक्झिमा सी हे तीन चाकी वाहन खरेदी करू शकतात. ही बजाज कंपनीची थ्री व्हीलर स्वस्त तर आहेस शिवाय सीएनजी इंधनावर चालणाऱ्या पावरफुल इंजिनने सुसज्ज आहे.

 बजाज मॅक्सीमा सी 3 व्हिलरची वैशिष्ट्ये

बजाज मॅक्झिमा सी तीन व्हिलरमध्ये तुम्हाला सुपिरिअर चार स्ट्रोक एअर कुल्ड DTS-i तंत्रज्ञान तसेच 236 cc क्षमतेचे सिंगल सिलेंडर मध्ये बीएस सहा इंजिन देण्यात आले आहे. जे दहा एचपी पावर आणि 15.9 एनएम टॉर्क जनरेट करते.

या गाडीमध्ये चाळीस लिटर क्षमतेची इंधन टाकी दिली असून ही तीन चाकी 33 ते 35 किलोमीटर पर लिटरचे उत्कृष्ट मायलेज देते.

बजाज व्हायब्रेशनने या लोडिंग थ्री व्हीलरचा वेग 50 किलोमीटर प्रतितास ठेवला आहे व या तीन व्हिलरची पेलोड क्षमता 619 किलोग्रॅम असून कंपनीने ही लोडिंग थ्री विलर 2125 एमएम व्हिलबेस मध्ये तयार केली असून तिचा ग्राउंड क्लिअरन्स 195 एमएम ठेवण्यात आला आहे.

 बजाज मॅक्झिमा सी 3 व्हिलरची वैशिष्ट्ये

या थ्री व्हीलरमध्ये तुम्हाला चांगली पकड असलेल्या हँडल बार पाहायला मिळेल जो नियंत्रित करणे अगदी सोपे आहे. बजाज कंपनीची ही तीन चाकी चार फॉरवर्ड+ एक रिव्हर्स गिअरसह गिअरबॉक्ससह येतो. बजाजच्या या थ्री व्हीलरमध्ये वेट, मल्टिप्लेट क्लच आणि मॅन्युअल प्रकारचे ट्रान्समिशन दिले आहे.

बजाज कंपनीची ही लोडिंग थ्री व्हीलर ड्रायव्हर + एक पॅसेंजर सीट क्षमतेसह येते व या तीन चाकीला हायड्रोलिक ड्रम ब्रेक देण्यात आले आहे. जे टायर्स वर मजबूत पकड ठेवण्यासाठी सक्षम आहेत व चालकाच्या सुविधेसाठी बजाज कंपनीने या लोडिंग तीन चाकीमध्ये पार्किंग ब्रेक देखील दिले आहेत.

 किती आहे बजाज मॅक्सीमा सी 3 व्हीलरची किंमत?

भारतात बजाज मॅक्सीमा सी तीन व्हीलरची एक्स शोरूम किंमत दोन लाख 83 हजार ते दोन लाख 84 हजार रुपये इतकी ठेवण्यात आलेली आहे. आरटीओ नोंदणी आणि रोड टॅक्समुळे बजाज मॅक्सीमा सी 3 व्हीलरची ऑन रोड किंमत काही राज्यांमध्ये बदलू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News