Goat Breed: बेरोजगार युवकांनी जर केले ‘या’ प्रजातीच्या शेळीचे पालन तर कमवतील लाखोत पैसे, कमी वेळेत व्हाल लखपती

Published on -

Goat Breed:-शेळीपालन व्यवसाय हा कमी खर्चात आणि कमीत कमी जागेत करता येणारा व्यवसाय असल्यामुळे व अल्पावधीत लाखोत नफा मिळवता येईल ही संधी या व्यवसायात असल्याने बेरोजगार तरुणांनी शेळीपालन व्यवसायाकडे वळणे ही काळाची गरज आहे व आता अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण व्यावसायिक दृष्टिकोनातून व तंत्रज्ञानाचा वापर करून शेळीपालन व्यवसाय करताना आपल्याला दिसून येत आहेत.

शेळीपालन व्यवसायाच्या यशामध्ये जितके महत्त्व व्यवस्थापनाला आहे तितकेच महत्त्व तुम्ही कोणत्या प्रजातीची शेळीची निवड पालनासाठी केली आहे याला देखील आहे.

भारतामध्ये अनेक प्रकारच्या शेळीच्या प्रजाती आहेत व त्यातील काही महत्त्वाच्या प्रजाती या शेळीपालनात कमी वेळेत चांगला नफा देऊ शकतात. त्यामुळे या मुद्द्याला धरून आपण या लेखात अशाच एका शेळीच्या महत्त्वपूर्ण प्रजातीची माहिती घेणार आहोत.

सोनपरी जातीची शेळी शेळीपालनात ठरेल सोन्याची अंडी देणारी

भारतात असलेल्या शेळींच्या प्रजातीपैकी सोनपरी ही शेळीची जातीचे पालन भारतात मोठ्या प्रमाणावर केले जाते. खासकरून मांस उत्पादनासाठी सोनपरी शेळीचे पालन फायद्याचे ठरते. ही शेळी बारबेरी आणि ब्लॅक बंगाल या जातींमधून क्रॉस ब्रीडिंग केलेली आहे. त्यामुळे या दोन्ही प्रकारच्या शेळींचे गुणधर्म सोनपरी या जातीच्या शेळीमध्ये दिसून येतात.

या शेळीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या जातीच्या शेळीचा रंग हा तपकिरी असतो व डोक्यापासून तर शेपटीपर्यंत पाठीवर एक काळी  रेषा असते. इतकेच नाही तर या शेळीच्या मानेवर काळे वर्तुळ असून तिची शेपटी मागच्या बाजूला वळलेली असते. तुम्हाला जर ही शेळी ओळखायची असेल तर ती तिच्या शेपटी वरून तुम्ही ओळखू शकतात व तिच्या तपकिरी रंगामुळे देखील ती विशेष प्रकारे ओळखले जाते.

विशेष म्हणजे सोनपरी शेळीचे पालन करण्यासाठी तुम्हाला व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून खूप काही व्यवस्था किंवा नियोजन करण्याची गरज नसते. इतर सामान्य प्रजातींच्या शेळ्यांप्रमाणे तुम्ही अगदी घरी देखील तिचे पालन सहजपणे करू शकतात.

परंतु तुम्ही जर योग्य व्यवस्थापन व काळजी घेतली तर या शेळी पासून तुम्हाला भरपूर प्रमाणावर आर्थिक फायदा होऊ शकतो. या प्रजातीच्या शेळीचे वजन साधारणपणे 35 ते 40 किलो असते. त्यामुळे या वैशिष्ट्यपूर्ण अशा शेळीचे पालन करून तुम्ही कमी खर्चामध्ये व कमी कालावधीत लाखो रुपये कमवू शकतात.

 एका वेताला देऊ शकते चार पिल्ले

सोनपरी जातीच्या शेळीचे एक महत्त्वाचे आणि फायदेशीर वैशिष्ट्य म्हणजे या जातीची शेळी एका वेतामध्ये जवळपास चार पिलांना देखील जन्म देण्यासाठी सक्षम असल्याचे म्हटले जाते. तसेच या प्रजातीच्या शेळीचे मांस अतिशय चविष्ट असल्याने बाजारपेठेतून देखील त्याला प्रचंड अशी मागणी असते. त्यामुळे सोनपरी जातीची शेळी ही शेळीपालनासाठी खूप फायदेशीर अशी प्रजात असून कमीत कमी खर्चामध्ये तुम्हाला चांगला नफा या शेळीच्या पालनातून मिळू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe