राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज ! ‘या’ कर्मचाऱ्यांच्या पगारात झाली मोठी वाढ, जीआर निघाला, किती वाढला पगार ?

Published on -

महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे राज्यातील काही कर्मचाऱ्यांचा पगार वाढवण्यात आला आहे. काल अर्थातच 22 जुलैला या संदर्भातील शासन निर्णय अर्थातच जीआर जारी झाला आहे.

जसं की आपणास ठाऊकच आहे की, गेल्या वर्षी 2023 मध्ये राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने प्राथमिक शिक्षण सेवक, माध्यमिक शिक्षण सेवक आणि उच्च माध्यमिक शिक्षण सेवक यांच्या पगारात मोठी वाढ केली होती. 7 फेब्रुवारी 2023 ला जारी झालेल्या शासन निर्णयानुसार शालेय शिक्षण विभागाने प्राथमिक शिक्षण सेवक, माध्यमिक शिक्षण सेवक आणि उच्च माध्यमिक शिक्षण सेवक यांना अनुक्रमे 16 हजार, 18 हजार आणि वीस हजार रुपये एवढे सुधारित वेतन देण्याचा निर्णय घेतला होता.

दरम्यान, शालेय शिक्षण विभागाच्या याच निर्णयाच्या धर्तीवर आदिवासी विकास विभाग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या प्राथमिक शिक्षण सेवक, माध्यमिक शिक्षण सेवक आणि उच्च माध्यमिक शिक्षण सेवक यांचा देखील पगार वाढला पाहिजे अशी मागणी संबंधितांच्या माध्यमातून गेल्या एका वर्षभरापासून सातत्याने उपस्थित केली जात होती.

आता संबंधितांच्या याचं मागणीवर सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. आदिवासी विकास विभाग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या या संबंधित शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा मोठा निर्णय कालच्या शासन निर्णयानुसार घेण्यात आला आहे. काल जारी झालेल्या शासन निर्णयानुसार, आदिवासी विकास विभाग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या प्राथमिक शिक्षण सेवक, माध्यमिक शिक्षण सेवक आणि उच्च माध्यमिक शिक्षण सेवक यांना शालेय शिक्षण विभागाच्या धर्तीवर अनुक्रमे सोळा हजार, अठरा हजार आणि वीस हजार रुपये एवढे मानधन दिले जाणार आहे.

विशेष बाब अशी की, ही वाढ एक जानेवारी 2023 पासून लागू करण्यात आली आहे. म्हणजेच संबंधित शिक्षण सेवकांना याची थकबाकी देखील मिळणार आहे. यामुळे नक्कीच संबंधित शिक्षण सेवकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून संबंधितांच्या माध्यमातून आदिवासी विकास विभागाच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe