महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादकांची होणार चांदी ! सुगंधी लाल द्राक्षाचे नवीन वाण विकसित; आंतरराष्ट्रीय बाजारात असणार मोठी मागणी, पहा

Published on -

Grape Farming : महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादकांसाठी एक गुड न्यूज समोर येत आहे. राज्यात गेल्या काही वर्षांपासून उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने फळबाग लागवडीचा प्रयोग वाढला आहे. यामध्ये प्रामुख्याने द्राक्ष शेती मोठ्या प्रमाणात केली जात आहे. राज्यातील नासिक, अहमदनगर समवेतच पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात प्रामुख्याने द्राक्ष लागवड पाहायला मिळते.

नाशिक जिल्हा तर द्राक्ष उत्पादनासाठी संपूर्ण भारतात ओळखला जातो. जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादन पाहता नाशिक जिल्ह्याला द्राक्ष पंढरी म्हणून ओळखतात आणि नासिक शहर हे वाईन सिटी म्हणून संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. दरम्यान आता राज्यातील द्राक्ष उत्पादकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

ती म्हणजे राज्यातील द्राक्ष उत्पादकांसाठी द्राक्षाचे नवीन वाण विकसित झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाने हे नवीन वाण तयार केलं आहे. मांजरी येथील प्रयोगशाळेच्या प्रक्षेत्रावर सुगंधी लाल रंगाच्या द्राक्षाचे नवे वाण तयार करण्यात आले आहे. या लाल रंग असलेल्या द्राक्षाच्या जातीची स्वत:चाच एक सुंगध आहे. हे वाण रंग चव आणि वजन तसेच टिकाऊ क्षमतेसाठी विशेष ओळखले जाणार आहे.

मांजरी येथील प्रक्षेत्रावर या जातीची एकूण 40 झाडे आहेत. या तीन ते चार वर्षांपासून या जातीवर संशोधनाचे कार्य सुरू होते. वास्तविक हे वाण जागतिक बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन विकसित झाले आहे. जागतिक बाजारातील मापदंडानुसार हे वाण तयार करण्यास महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघास मोठं यश लाभल आहे. यामुळे भविष्यात राज्यातील द्राक्ष उत्पादकांचा मोठा फायदा होणार असल्याचा दावा केला जात आहे. विशेष बाब अशी की मांजरी येथील प्रक्षेत्रा व्यतिरिक्त या वाणाची राज्यातील इतरही भागात लागवड झाली आहे.

बागायतदार संघाच्या राज्यातील इतर काही प्रयोगशील शेतकऱ्यांना या वाणाची चाचणी घेण्यास सांगितले. आता या लोकांनी देखील या वाणाबाबत सकारात्मक अभिप्राय कळवला आहे. पुणे, उरुळी कांचन आणि नासिक या भागात या वाणाची बागायतदार संघाच्या शेतकऱ्यांकडून लागवड झाली आहे. चाचणी दरम्यान प्राप्त झालेली सूचना अभिप्राय यांचा विचार करून यामध्ये अजून सुधारणा घडवून आणण्याची आवश्यकता आहे का याची देखील खातरजमा केली जाणार आहे. वास्तविक महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात द्राक्षाचे उत्पादन होत असले तरीदेखील राज्याच्या एकूण द्राक्ष उत्पादनापैकी मात्र 8% इतकं द्राक्षाचे उत्पादन हे निर्यात होतं.

साहजिकचं निर्यातक्षम मालाची आपल्या राज्यात कमतरता आहे. अशा परिस्थितीत ये नव्याने तयार झालेल्या वाण निर्यातक्षम राहणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. या सुधारित वाणाच्या द्राक्ष लागवडीतून निर्यातक्षम द्राक्ष उत्पादित होतील अशी आशा संघाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे. सध्याच्या क्रीमसन जातीपेक्षाही ही नव्याने विकसित करण्यात आलेली जात सुधारित राहणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. जागतिक बाजारात देखील याला मोठी मागणी राहील आणि सुवासिक वाण असल्याने देशांतर्गत बाजारात देखील या वाणाला मोठी मागणी राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

विशेष बाब अशी की नासिक जिल्ह्यातील तळेगाव वनी या ठिकाणी संघाच्या प्रक्षेत्रावर या जातीची 1000 द्राक्षाची झाडे लावण्यात आली आहेत. पुढील हंगामापासून ही द्राक्षाचीं झाडे देखील शेतकऱ्यांना पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहेत. या जातीचे अद्याप नामकरण करण्यात आलेले नाही. मात्र लवकरच नामकरण होणार असून द्राक्ष उत्पादक बागायतारांना देखील ही नवीन जात लवकरच उपलब्ध होणार आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe