हवामान पुन्हा बिघडलं ; आज अन उद्या राज्यात जोरदार पाऊस होणार, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पाऊस हजेरी लावणार ? वाचा

हवामान विभागाने आज कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि रायगड तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर तसेच मराठवाड्यातील धाराशिव, लातूर आणि नांदेड आणि विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदीया जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसणार असा अंदाज देण्यात आला आहे.

Published on -

Havaman Andaj 2024 : मान्सून परतल्यानंतर महाराष्ट्रात पावसाने जोरदार दणका दिला. मान्सूनोत्तर पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र आता गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. पावसाने विश्रांती घेतली असल्याने रब्बी हंगामातील पीक पेरणीला वेग आलाय.

अशातच गेल्या दोन दिवसांमध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्रातील हवामानात बिघाड पाहायला मिळतोय. राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याचा अंदाज समोर आला आहे.

महाराष्ट्रातील कमाल आणि किमान तापमानात गत काही दिवसांपासून जोरदार चढ-उतार सुरू असून अशातच राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.

हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे आज आणि उद्या मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण तसेच विदर्भातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. या अनुषंगाने या सदर भागातील संबंधित जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्याकडून अलर्ट सुद्धा जारी करण्यात आला आहे.

हवामान विभागाने आज कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि रायगड तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर तसेच मराठवाड्यातील धाराशिव, लातूर आणि नांदेड आणि विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदीया जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसणार असा अंदाज देण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर या सदरील जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त आज राज्यातील ठाणे, नाशिक, नगर, बीड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात सुद्धा काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

दरम्यान भारतीय हवामान खात्याने उद्या अर्थातच एकतीस ऑक्टोबरला कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि रायगड तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर तसेच मराठवाड्यातील धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला आहे.

महत्त्वाचे म्हणजे या सदरील जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्याकडून उद्यासाठी येल्लो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच उद्या ठाणे, नगर, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.

यामुळे भारतीय हवामान खात्याचा हा अंदाज लक्षात घेऊनच शेतकऱ्यांनी आपल्या शेतीच्या कामांचे नियोजन आखावे असा सल्ला यावेळी जाणकारांनी दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe