Maharashtra Rain:- गेल्या आठवड्यामध्ये संपूर्ण राज्यांमध्ये पावसाने उघडीप दिली होती व वातावरणामध्ये अचानक कमाल तापमानात वाढ झालेली होती. परंतु राज्य मध्ये परत एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली असून राज्याच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस बरसत असल्याची स्थिती आहे.
बऱ्याच भागामध्ये वीजांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावलेली आहे. साधारणपणे 25 ऑगस्ट पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विजाच्या गडगडाटासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
सध्या भारत महासागर विषुवृत्तीय परी क्षेत्रामध्ये असलेली एम.जे.ओ ची उपस्थिती आणि सध्या होत असलेली कमाल तापमानातील वाढ या सगळ्या परिस्थितीमुळे येणारा संपूर्ण आठवड्यात म्हणजेच 25 ऑगस्ट पर्यंत दुपारनंतर उष्णता संवहनी प्रक्रियेतून विजा व गडगडाटासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
वाचा या आठवड्यात कोणत्या तारखेला कोणत्या जिल्ह्यात होईल जोरदार ते अतिजोरदार पाऊस?
1- 20 ऑगस्ट– 20 ऑगस्टला नंदुरबार, धुळे तसेच जळगाव, नासिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली तसेच कोल्हापूर आणि सोलापूर
2- 21 ऑगस्ट– मुंबई तसेच संपूर्ण कोकण व विदर्भ असे एकूण 18 जिल्हे
3- 22 व 23 ऑगस्ट–नंदुरबार, धुळे तसेच जळगाव व नासिक, कोल्हापूर व मुंबई सह संपूर्ण कोकण व विदर्भ
4- 24 ऑगस्ट– जळगाव, नंदुरबार, धुळे, छत्रपती संभाजी नगर, हिंगोली तसेच परभणी, जालना, कोल्हापूर व मुंबईसह संपूर्ण कोकण व विदर्भ
5- 25 ऑगस्ट– मराठवाडा वगळता महाराष्ट्रातील संपूर्ण 28 जिल्हे ( परंतु 25 ऑगस्टला मराठवाड्यात मात्र मध्यम पाऊस होईल.)
तसेच या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील ज्या ज्या ठिकाणी पाऊस होईल त्या ठिकाणच्या सर्व धरण क्षेत्रातील पाण्याच्या आवकेत पुन्हा वेगाने वाढ होऊ शकते अशी शक्यता ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवलेली आहे.