High Court Recruitment : चौथी पास तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ज्या तरुणांना सरकारी नोकरीची इच्छा असेल अशा तरुणांसाठी तर ही आनंदाची पर्वणीच आहे. खरं पाहता मुंबई उच्च न्यायालया अंतर्गत येणाऱ्या औरंगाबाद खंडपीठात चौथी पास उमेदवारांसाठी एक भरती आयोजित झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून औरंगाबाद खंडपीठात रिक्त असलेल्या काही पदांची भरती होणार आहे.
विशेष बाब म्हणजे यासाठीची अधिसूचना औरंगाबाद खंडपीठाच्या माध्यमातून नुकतीच निर्गमित झाली आहे. अशा परिस्थितीत आज आपण नेमक्या कोणत्या पदासाठी भरती होईल, यासाठी काय पात्रता राहील, अर्ज कसा करायचा, अर्ज करण्याची अंतिम दिनांक, आवश्यक पात्रता यासारख्या सर्व बाबीची माहिती थोडक्यात जाणून घेणार आहोत.
हे पण वाचा :- पुणे रिंगरोडबाबत मोठी बातमी; मे महिन्यात होणार ‘हे’ महत्वाचं काम, पहा….
कोणत्या पदासाठी होणार भरती?
मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत औरंगाबाद खंडपीठात स्वयंपाकी या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
किती रिक्त जागांसाठी होणार भरती?
अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार स्वयंपाकी म्हणजेच कुक या पदाच्या तीन रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता?
स्वयंपाकी या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा किमान चौथी पास असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा आणि इतर पात्रता?
या पदासाठी जरी चौथी पास उमेदवार अर्ज करू शकणार असला तरी देखील सदर उमेदवाराला स्वयंपाकाचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे. तसेच सदर उमेदवार हा मराठी आणि हिंदी या भाषांचे ज्ञान असणारा असणे गरजेचे आहे. याशिवाय, उमेदवाराला मांसाहारी जेवण उत्तम पद्धतीने बनवता येणे आवश्यक आहे. या पदासाठी 18 ते 38 वर्ष वयोगटातील उमेदवार पात्र राहणार आहेत.
नोकरी कुठे करावी लागणार?
मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत येणाऱ्या औरंगाबाद खंडपीठात या रिक्त जागा निघाल्या असून ज्या उमेदवारांची निवड होणार आहे त्यांना औरंगाबाद खंडपीठात नोकरी करावी लागणार आहे.
हे पण वाचा :- अहमदनगरच्या शेतकऱ्याचा नवीन प्रयोग ! चक्क पिवळ्या कलिंगडची केली लागवड, कमवलेत लाखों; पहा ही यशोगाथा
किती पगार मिळणार?
अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार निवड झालेल्या उमेदवाराला 16600 ते 52 हजार 400 दरम्यान वेतन दिल जाणार आहे.
अर्ज कसा करावा लागणार?
यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. मात्र अर्ज हा विहित नमुन्यामध्ये लिहिलेला आणि अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरलेली असणे गरजेचे आहे. अर्जाचा विहित नमुना डाऊनलोड करण्यासाठी आपण https://drive.google.com/file/d/1J-_BR0W3OlRxV5arz8a8iikJp08U-X8t/view या लिंक वर जाऊन अर्जाचा नमुना पाहू शकता. तसेच या नमुन्याची प्रिंट आऊट घेऊन आपण इच्छुक असल्यास हा अर्ज भरून, प्रबंधक (प्रशासक), मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद, जालना रोड, औरंगाबाद – ४३१००९ या पत्त्यावर आपला अर्ज सादर करू शकता. अर्ज सादर करण्यापूर्वी मात्र एकदा अधिसूचना वाचणे अपेक्षित आहे.
हे पण वाचा :- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! सरकार लवकरच घेणार ‘हा’ मोठा निर्णय; पगारात होणार तब्बल 8000 ची वाढ
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक कोणती?
या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 2 मे 2023 पर्यंत आपला अर्ज विहित नमुन्यात भरून वर नमूद करण्यात आलेल्या पत्त्यावर सादर करायचा आहे.
जाहिरात कुठे पाहणार?
जर आपण या पदासाठी पात्र असाल आणि अर्ज करू इच्छित असाल तर आपण या भरतीबाबत आवश्यक सर्व माहिती जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम जाहिरात वाचा. यासाठी आपण https://drive.google.com/file/d/1AVpe3G6zl_WCHJRvxgZfntsNSt9Dzf5M/view या लिंक वर जाऊन भरतीची जाहिरात सविस्तर पाहू शकता.