पोस्ट ऑफिसच्या एफडीमध्ये 5 लाखाचे कसे होतील 15 लाख? जाणून घ्या गुंतवणुकीची महत्त्वाची प्लॅनिंग

फिक्स डिपॉझिट म्हणजेच एफडी हा गुंतवणुकीचा सर्वात लोकप्रिय आणि विश्वासार्ह प्रकार असून गुंतवणूक सुरक्षित राहण्याच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणावर फिक्स डिपॉझिट योजनांना पसंती दिली जाते. दुसरे महत्त्वाचे म्हणजे चांगला परतावा मिळण्याची हमी महिन्याकरता देखील एफडी हा एक उत्तम पर्याय आहे.

Ajay Patil
Published:

Investment In FD:- फिक्स डिपॉझिट म्हणजेच एफडी हा गुंतवणुकीचा सर्वात लोकप्रिय आणि विश्वासार्ह प्रकार असून गुंतवणूक सुरक्षित राहण्याच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणावर फिक्स डिपॉझिट योजनांना पसंती दिली जाते. दुसरे महत्त्वाचे म्हणजे चांगला परतावा मिळण्याची हमी महिन्याकरता देखील एफडी हा एक उत्तम पर्याय आहे.

तसेच यामध्ये निश्चित व्याजदर मिळतो व त्यामुळे काही योजनांच्या माध्यमातून पैसा दुप्पट आणि थेट तिप्पट देखील होऊ शकतो. परंतु यासाठी गुंतवणुकीचे काही नियम किंवा काही शिस्त तुम्हाला पाळणे खूप गरजेचे असते.

फिक्स डिपॉझिट योजनांच्या बाबतीत जर बघितले तर प्रत्येक बँकेच्या माध्यमातून आकर्षक अशा एफडी योजना राबवल्या जातात व तशीच योजना पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून देखील राबवली जाते.

यामध्ये जर तुम्ही नियमितपणे आणि शिस्तबद्ध रीतीने जर दीर्घकालासाठी गुंतवणूक केली तर तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळवू शकतात. पोस्ट ऑफिस किंवा बँकेत एफडी करून चांगले व्याज मिळवण्यासाठी तुम्ही एफडी करणे गरजेचे आहे. त्यामुळे या लेखात तुम्ही एफडी केली तर ती रक्कम तीन पट कशी करू शकतात हे आपण समजून घेऊ.

एफडी योजनेत पाच लाख रुपये गुंतवले तर 15 लाख कसे होतील?
फिक्स डिपॉझिटच्या मदतीने तुम्ही पाच लाख रुपयांचे थेट पंधरा लाख रुपये करू शकतात व त्याकरिता पोस्ट ऑफिस किंवा बँकेमध्ये एफडी करणे गरजेचे आहे. यामध्ये तुम्हाला ज्या ठिकाणी चांगले व्याज मिळत आहे त्या ठिकाणी तुम्ही एफडी करणे महत्त्वाचे ठरते.

तुम्हाला जर एफडीमध्ये पाच वर्षासाठी गुंतवणूक करायची आहे आणि त्या पाच वर्षाच्या एफडीवर तुम्हाला 7.5 टक्क्यांनी परतावा मिळत आहे असे जर गृहीत धरले व तुम्हाला जर तिप्पट परतावा गुंतवणुकीवर मिळवायचा असेल तर तुम्ही केलेल्या पाच वर्षाच्या एफडी करिता तिचा कालावधी म्हणजेच पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर ती एफडी तोडायची नसते.

तर एफडी तोडण्याऐवजी ती एक्सटेंड करायची म्हणजेच तिची मुदत वाढवणे गरजेचे आहे.अशाप्रकारे तुम्ही दोन वेळा तुमच्या एफडीची मुदत म्हणजेच एफडी एक्सटेंड केली तर तुम्ही गुंतवलेल्या रकमेपेक्षा तिप्पट रक्कम तुम्हाला मिळते.

म्हणजेच पाच वर्षाच्या एफडीचा म्हणजे तुम्ही दोनदा पाच-पाच वर्षाकरिता जर कालावधी वाढवला तर तुम्हाला तिप्पट रक्कम या माध्यमातून मिळते. उदाहरणच घ्यायचे झाले तर तुम्ही जर पाच लाख रुपयांची एफडी पाच वर्षांसाठी केली व 7.5 टक्क्यांच्या हिशोबाने जर पाच वर्षात तुम्हाला एकूण परतावा हा व्याज आणि मुद्दल असे मिळून सात लाख 24 हजार 974 रुपये होतात.

त्यानंतर तुम्ही परत पाच वर्षासाठी एफडीची मुदत एक्सटेंड केली म्हणजेच वाढवली तर तुम्ही गुंतवलेल्या पाच लाख रुपयांवर तुम्ही वाढवलेल्या पाच वर्षात तुम्हाला पाच लाख 51 हजार 175 रुपये व्याज मिळते व हीच पाच लाख रुपयांची एफडी आणखी पाच वर्षांकरिता वाढवली तर तुम्हाला पाच लाखांवर तब्बल दहा लाख 24 हजार 149 रुपये व्याज मिळते.

म्हणजे तुम्हाला पाच लाख रुपये गुंतवून 15 वर्षात तुमचे गुंतवलेले पाच लाख आणि त्यावर पंधरा वर्षात मिळालेले दहा लाख 24 हजार 149 रुपये व्याज असे मिळून तुम्हाला एकत्रितरित्या 15 लाख 24 हजार 149 रुपये मिळतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe