पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक करून सर्वाधिक व्याज मिळवायचे आहे का? वाचा कोणत्या योजनेत किती मिळते व्याज?

Ajay Patil
Published:
post office scheme

कष्टाने कमावलेल्या पैशाची गुंतवणूक करताना प्रत्येक गुंतवणूकदार हा त्या पैशांची सुरक्षितता आणि चांगला परतावा या दृष्टिकोनातून विचार करत असते व त्यानुसारच विविध प्रकारचे पर्याय निवडून त्यामध्ये गुंतवणूक केली जाते. साधारणपणे बँक आणि पोस्ट ऑफिसच्या अनेक योजनांमध्ये प्रामुख्याने गुंतवणूक करण्याला गुंतवणूकदार प्राधान्य देताना आपल्याला दिसून येतात.

कारण या दोन्ही ठिकाणी केलेली गुंतवणूक ही सुरक्षित राहतेच परंतु हमी परतावा देखील मिळतो. यामध्ये जर आपण पोस्ट ऑफिसच्या योजना पहिल्या तर यामध्ये अनेक छोट्या बचत योजना असून त्यामध्ये बँकांपेक्षा चांगले व्याज दिले जात आहे. आपल्याला माहित आहे की केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रत्येक तिमाहीमध्ये पोस्ट ऑफिसच्या या योजनांच्या व्याजदरांमध्ये सुधारणा केली जाते.

परंतु 2024-25 च्या या आर्थिक वर्षामध्ये जुलै ते सप्टेंबर या दुसऱ्या तिमाहीमध्ये पोस्ट ऑफिसच्या या योजनांच्या व्याजदरामध्ये कुठल्याही प्रकारचे बदल करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे तुम्हाला देखील या महिन्याच्या आत बाहेर पोस्ट ऑफिसच्या योजनेमध्ये गुंतवणूक करायचा प्लॅन असेल तर तुम्हाला कोणत्या योजनेवर किती व्याज मिळते हे माहीत असणे तितकेच गरजेचे आहे. त्याकरताच आपण पोस्ट ऑफिसच्या योजनांवर मिळणाऱ्या व्याजाची माहिती या लेखात बघणार आहोत.

1- पोस्ट ऑफिस बचत खाते सध्या मिळणारा व्याजदर चार टक्के

2- पोस्ट ऑफिसमध्ये एक वर्षाची मुदत ठेव मिळणारा व्याजदर 6.9%

3- पोस्ट ऑफिसमध्ये दोन वर्षाची मुदत ठेव मिळणारा व्याजदर 7.0%

4- पोस्ट ऑफिसमध्ये तीन वर्षाची मुदत ठेव मिळणारा व्याजदर 7.1%

5- पोस्ट ऑफिसमध्ये पाच वर्षाची मुदत ठेव मिळणाऱ्या व्याजदर 7.5%

6- पोस्ट ऑफिसमध्ये पाच वर्ष आवर्ती ठेव म्हणजेच आरडी खाते मिळणारा व्याजदर 6.7%

7- ज्येष्ठ नागरिक बचत योजना मिळणारा व्याजदर 8.2%

8- मासिक उत्पन्न योजना मिळणारा व्याजदर 7.4%

9- सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना सध्या मिळणारा व्याजदर 7.1%

10- सुकन्या समृद्धी खाते मिळणाऱ्या व्याजदर 8.2%

11- राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना मिळणारा व्याजदर 7.7%

12- किसान विकास पत्र योजना मिळणारा व्याजदर 7.5%

13- महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनामिळणारा व्याजदर 7.5%

 टीप यातील काही योजनांचा लाभ तुम्हाला बँकेत देखील घेता येऊ शकतो तर काही योजना फक्त पोस्ट ऑफिस मध्येच तुम्हाला मिळतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe