Black Wheat Sowing :- भारतातील रब्बी हंगामाचा विचार केला तर भारतामध्ये प्रामुख्याने रब्बी हंगामात गहू आणि हरभरा ही पिके प्रामुख्याने घेतली जातात. गव्हाच्या उत्पादनाच्या बाबतीमध्ये भारत जगात अव्वल स्थानी आहे.
तसे पाहायला गेले तर गहू हे रब्बी हंगामातील प्रमुख पीक देखील आहे आणि शेतकऱ्यांसाठी आर्थिक दृष्टिकोनातून देखील या पिकाला खूप महत्त्व आहे. जर आपण सध्या गव्हाचा बाजारपेठेतील दर पाहिला तर चांगल्यापैकी बाजारामध्ये गव्हाला दर आहेत.
परंतु गव्हाच्या बाबतीमध्ये काळा गहू तुम्ही पाहिला असेल. जर तुम्ही काळ्या गव्हाची लागवड केली तर निश्चितच या माध्यमातून चांगला आर्थिक नफा मिळवू शकतात. भारतातील अनेक भागांमध्ये काळ्या गव्हाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते.
प्रामुख्याने मध्य प्रदेश, हरियाणा तसेच राजस्थान व उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये काळ्या गव्हाची लागवड केली जाते. चांगला आर्थिक नफा मिळण्याच्या दृष्टिकोनातून या गावाची लागवड शेतकऱ्यांसाठी का फायद्याचे आहे याची माहिती या लेखात घेऊ.
आरोग्यासाठी आहे उत्तम
बाजारपेठेमध्ये सामान्य गव्हाच्या तुलनेमध्ये काळ्या गव्हाला बाजार भाव जास्त मिळतो. कारण यामध्ये सामान्य गव्हापेक्षा 60% जास्त लोहाचे प्रमाण असते. महत्त्वाचे म्हणजे या गव्हाचा जो काही काळा रंग हा त्यामध्ये असलेल्या अँथोसायनिन नावाचे जे काही रंगद्रव्य आहे त्यामुळे त्याचा रंग काळा असतो.
तसेच या प्रकारच्या गव्हामध्ये अँटिऑक्सिडंट घटक देखील मोठ्या प्रमाणावर असतात. आरोग्याच्या दृष्टिकोनातून या गव्हाचा फायदा जास्त असल्यामुळे याला प्रमुख मागणी असते.
काळ्या गव्हाची लागवड केव्हा करतात?
तुम्हाला देखील काळ्या गव्हाची लागवड करायची असेल तर तुम्ही 30 नोव्हेंबर पर्यंत या रब्बी हंगामात करू शकतात. सरीवर जर तुम्हाला या गव्हाची लागवड करायची असेल तर साधारणपणे एका एकर करीता 40 ते 50 किलो बियाण्याची आवश्यकता भासते.
पेरणी केल्यानंतर चांगले उत्पन्न यावे याकरिता चार ते पाच पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. त्यानंतर साधारणपणे तीन आठवड्यांनी पहिले पाणी द्यावे व कळ्या म्हणजेच ओंब्या लागण्याच्या वेळी पाण्याचे नियोजन व्यवस्थित करावे. कृषी शास्त्रज्ञांच्या मते या गव्हाच्या झाडांचे दाणे जेव्हा काळ्या होतात आणि दाण्यांमध्ये वीस ते पंचवीस टक्के ओलावा शिल्लक राहतो तेव्हा त्याची काळजी करावी.
बाजारपेठेमध्ये या गव्हाला किती मिळतो दर?
या गव्हाच्या लागवडीतून शेतकरी चांगला नफा मिळवू शकतात. सामान्य गव्हापेक्षा या गव्हाला जास्त दर मिळतो. काळ्या गव्हाला बाजारामध्ये 8000 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतो. त्यामुळे इतर गव्हाच्या तुलनेत या गव्हाला जास्त दर असतो व शेतकऱ्याला नक्कीच या गव्हाच्या लागवडीतून बंपर नफा मिळतो.