पुणे, सोलापूर, कोल्हापूर, नांदेड, नागपूर वासियांसाठी महत्वाची बातमी! 31 मार्चपर्यंत ‘या’ रेल्वे गाड्या राहणार बंद, काय राहणार कारण?, पहा

Published on -

Indian Railway News : रेल्वे ही देशातील दळणवळण व्यवस्थाचा एक महत्त्वाचा भाग आहे. रस्ते मार्गाप्रमाणेच लोहमार्गावर देखील देशात मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. विशेष म्हणजे अलीकडे लोहमार्ग विस्तारण्यासाठी भारतीय रेल्वेच्या माध्यमातून जलद गतीने प्रयत्न सुरू आहेत. वंदे भारत एक्सप्रेस भारतीय रेल्वेच्या ताब्यात आल्यानंतर रेल्वेचा चेहरा मोहरा देखील बदलला आहे.

दरम्यान सोलापूर रेल्वे विभागातून एक मोठी माहिती हाती आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार विभागातील दौंड-मनमाड लोहमार्गावर बेलापूर-चितळी-पुणतांबा या स्थानकांदरम्यान दुहेरीकरणासाठी ब्लॉक घेतला जाणार असून यासाठी अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच काही गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये मोठा बदल झाला आहे. यामुळे दौंड मनमाड लोहमार्गावरील बेलापूर चितळी पुणतांबा या स्थानकादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी याची काळजी घेणे गरजेचे राहणार आहे.

हे पण वाचा :- इंजिनिअरिंगच्या शिक्षणाला ठोकला रामराम! तरुणाने सुरु केली ‘या’ जातीची पेरूची शेती; अन मिळवले लाखोंची कमाई

यामुळे या स्थानकादरम्यान प्रवास करण्यापूर्वी कोणत्या गाड्या रद्द झाल्या आहेत तसेच कोणत्या गाड्यांचे वेळापत्रक बदल झाले आहे याबाबत प्रवाशांनी माहिती करून घेणे गरजेचे राहणार आहे. चला तर मग याबाबत सविस्तर जाणून घेऊया. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, या मार्गावरील निजामाबाद-पुणे ही गाडी 31 मार्चपर्यंत रद्द करण्यात आली आहे. निजामाबाद पुणे या गाडीवर हजारो प्रवासी प्रवास करत असतात, यामुळे या प्रवाशांना इतर पर्यायी मार्गाचा आता अवलंब करावा लागणार आहे.

26 मार्चला कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र, नागपूर-पुणे, नांदेड-पुणे या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 27 मार्च 2023 रोजी कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र, नांदेड-पुणे-नांदेड, नागपूर-पुणे, पुणे-नागपूर या गाड्या रद्द झाल्या आहेत. पुणे-नागपूर एक्स्प्रेस, गोंदिया-कोल्हापूर, पुणे -नांदेड एक्स्प्रेस या गाड्या 28 मार्च 2023 रोजी रद्द राहणार आहेत. तसेच गोंदिया-कोल्हापूर ही गाडी 29 मार्च 2023 रोजी रद्द होणार आहे.

हे पण वाचा :- Soybean Market : सोयाबीनची आवक विक्रमी घटली; भाव वाढीचे संकेत की अन्य कारण? पहा

यासोबतच पुणे-जबलपूर या रेल्वे गाडीच्या वेळात 20 मार्च 2023 व 27 मार्च 2023 रोजी बदल राहणार आहे. पुणे-लखनऊ एक्सप्रेसच्या टायमिंग मध्ये 21 व 28 मार्च रोजी बदल करण्यात आला आहे. शिवाय पुणे-हटिया एक्स्प्रेसच्या 26 मार्च रोजी आणि पुणे-गोरखपूर-एक्स्प्रेस 25 मार्च रोजी बदल करण्यात आला असल्याची माहिती विभागाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. याशिवाय काही गाड्यांच्या मार्गांमध्ये देखील बदल झाला आहे.

यामध्ये दानापूर-पुणे, हजरत निजामुद्दीन-वास्को गोवा एक्स्प्रेस, हजरत-निजामुद्दीन-हुबळी, जम्मू-तावी-पुणे झेलम एक्स्प्रेस, हावडा-पुणे एक्स्प्रेस, हटिया-पुणे एक्स्प्रेस, पुणे-हावडा एक्स्प्रेस, कोल्हापूर-हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस या गाड्यांचा समावेश असून यांच्या मार्गात बदल झाला आहे. मार्गामधील बदल आणि वेळेमधील बदल जाणून घेण्यासाठी प्रवाशांनी प्रवास करण्यापूर्वी रेल्वे स्थानकावर इन्क्वायरी करणे आवश्यक राहणार आहे.

हे पण वाचा :- आदमापूरच्या बाळूमामा भंडारा उत्सवातील भाकणूक; शेतीसाठी कसं राहणार हे साल, पाणी पाऊस कसा राहणार? कृष्णा डोणे वाघापूरकर…

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News