रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; रेल्वे स्टेशनवर विक्रेत्यांनी MRP पेक्षा अधिक किंमत आकारली तर ‘या’ ठिकाणी करा तक्रार, वाचा….

Indian Railway News : देशात ग्राहकांच्या हितासाठी वेगवेगळे नियम आणि कायदे अस्तित्वात आले आहेत. ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी शासनाच्या माध्यमातून वेगवेगळे कायदे तयार करण्यात आले आहेत. यामध्ये संबंध देशात एमआरपी पेक्षा जास्त किमतीत वस्तू विक्री करणे हा गुन्हा आहे.

एमआरपी अर्थातच मॅक्सिमम रिटेल प्राईस किंवा कमाल किरकोळ किंमतीपेक्षा अधिक दरात जर कुणी विक्रेता किंवा दुकानदार वस्तूंची विक्री करत असेल तर हा कायद्याने गुन्हा ठरतो. मात्र असे असले तरी अजूनही देशातील अनेक ठिकाणी एमआरपी पेक्षा अधिक दरात वस्तूंची विक्री होते.

परंतु ग्राहकांना याची तक्रार कुठे करायची याबाबत फारशी माहिती नसते यामुळे विक्रेत्यांचा मुजोरीपणा हा वाढत चालला आहे. विशेषतः रेल्वे स्टेशनवर, प्लॅटफॉर्मवर हा प्रकार अधिक पहावयास मिळतो. खरं पाहता रेल्वे प्रवासी प्रवासादरम्यान अधिक घाईत असतात.

हे पण वाचा :- मुंबई, ठाणे, कल्याणवासियांना रेल्वेच मोठ गिफ्ट ! ‘या’ मार्गावर सुरू झाली नवीन सुपरफास्ट ट्रेन; गाडीला कुठं राहणार थांबा? पहा…

ट्रेन सुटू नये यामुळे रेल्वे प्रवासी घाईघाईने वस्तूंची खरेदी करतात. अनेकदा रेल्वे प्रवाशांना एमआरपी पेक्षा अधिक दरात फूड स्टॉल वरून वस्तू विकत घ्याव्या लागतात.

एमआरपी पेक्षा अधिक दरात फूड स्टॉल चालक वस्तूंची विक्री करतोय हे रेल्वे प्रवाशांना माहीत असले तरी पुढील प्रवास करायचा असतो यामुळे रेल्वे प्रवासी दुकानदारासोबत वाद घालण्या ऐवजी पैसे देऊन निघून जातात.

मात्र जर तुम्हाला रेल्वे स्टेशनवर फूड स्टॉल चालकांकडून अधिकच्या दरात वस्तूंची विक्री करण्यात आली तर तुम्ही याची तक्रार करू शकता. तुम्ही तक्रार दाखल केल्यानंतर संबंधित विक्रेत्यावर रेल्वे कडून कारवाई केली जाणार आहे.

तक्रार करण्यासाठी मात्र रेल्वे प्रवाशांना एमआरपी पेक्षा अधिक दरात विक्री करणाऱ्या फूड स्टॉलचे नाव, ऑपरेटरचे नाव, स्टेशनचे नाव, प्लॅटफॉर्म क्रमांक, स्टॉल क्रमांक आणि वेळ इत्यादी माहिती जवळ ठेवणे आवश्यक आहे.

हे पण वाचा :- राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! जुनी पेन्शन योजनाही लागू होईल अन सेवानिवृत्तीचे वय देखील 65 वर्षे होणार, अभ्यास समिती घेणार निर्णय?

तक्रार कुठे करायची?

जर रेल्वे स्टेशन किंवा ट्रेनमध्ये MRP पेक्षा जास्त किमतीत वस्तू विक्री होत असेल तर आपण संबंधित दुकानदार, फूड स्टॉल किंवा विक्रेत्याविरुद्ध रेल्वे हेल्पलाइन क्रमांक 139 वर तक्रार दाखल करू शकतात.

किंवा तुम्ही रेल मदद मोबाइल अॅपवर देखील अशा विक्रेत्यांविरोधात तक्रार नोंदवू शकता. यासोबतच आपण अशा दुकानदार किंवा विक्रेत्याविरुद्ध रेल्वे स्थानकावर उपस्थित असलेल्या रेल्वे अधिकाऱ्यांकडे देखील तक्रार करू शकणार आहात.

निश्चितच एमआरपी पेक्षा अधिक दरात वस्तू विक्री करणे हा भारतात गुन्हा असून जर रेल्वे स्टेशनवर असा प्रकार तुमच्यासोबत घडला असेल तर आपण वर नमूद केलेल्या ठिकाणी याची तक्रार करू शकता आणि अशा चुकीच्या व्यवहाराबद्दल विक्रेत्यांना कायद्याने योग्य ती शिक्षा दिली जाणार आहे.

हे पण वाचा :- शेवटी निर्णय झालाच ! पुणे रिंगरोडचे काम ‘या’ महिन्यात होणार सुरु; बाधित जमीनदारांच्या मोबदल्यात पण झाली ‘इतकी’ वाढ? पहा…..