कर्ज काढून घर घेण्यापेक्षा थोडं थांबा, ‘हा’ प्लॅनिंग करा आणि मग घ्या स्वतःची टोलेजंग इमारत! डोक्यावर कर्जही होणार नाही आणि स्वतःचे घरही होईल

अनेक बँकांच्या माध्यमातून होमलोन मिळण्याची प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि सोपी झाली असून त्यामुळे बरेच व्यक्ती कर्ज घेऊन घराचे स्वप्न पूर्ण करतात. परंतु आपल्याला माहित आहे की होम लोन हे दीर्घ कालावधीचे कर्ज असते व आपले हप्ते भरूनच नाकीनऊ येतात. कधीकधी तर अर्ध आयुष्य हप्ते भरण्यात चालले जाते.

Published on -

Home Buying Tips:- स्वतःचे घर असणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते व हे स्वप्न तसे पाहायला गेले तर रास्त आहे. परंतु प्रत्येकालाच घर घेणे शक्य होत नाही. कारण आज जर आपण घर बांधण्याची किंवा नवीन घर खरेदी करण्याची किंमत बघितली तर ती सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक आवाक्या पलीकडे गेल्याचे चित्र आहे. त्यातल्या त्यात मोठ्या शहरांमध्ये तर जवळपास घर खरेदी करणे अशक्यप्राय गोष्ट आहे.

परंतु आता अनेक बँकांच्या माध्यमातून होमलोन मिळण्याची प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि सोपी झाली असून त्यामुळे बरेच व्यक्ती कर्ज घेऊन घराचे स्वप्न पूर्ण करतात. परंतु आपल्याला माहित आहे की होम लोन हे दीर्घ कालावधीचे कर्ज असते व आपले हप्ते भरूनच नाकीनऊ येतात. कधीकधी तर अर्ध आयुष्य हप्ते भरण्यात चालले जाते.

त्यामुळे लोन घेऊन घर घेण्याच्या फंदात न पडता काही वर्ष भाड्याच्या घरात काढून जर तुम्ही पैशांची गुंतवणूक चांगल्या ठिकाणी केली तर तुम्ही काही वर्षांनी स्वतःचे घर नक्कीच खरेदी करू शकतात व तेही तुमच्या डोक्यावर कुठलाही प्रकारचे कर्जाचा भार न पडता व लाख रुपये देखील तुमच्याकडे शिल्लक राहू शकतात. फक्त तुम्हाला गुंतवणुकी संबंधीची एक प्लॅनिंग जीवनामध्ये लागू करणे गरजेचे राहिल.

होमलोन घेऊन घर खरेदी केले तर तुम्हाला घराच्या किमतीच्या दुप्पट पैसे भरावे लागतात
समजा तुम्हाला घर खरेदी करायचेच आहे व तुम्ही बँकेकडून होमलोन घ्यायला गेलात व तुम्ही घरासाठी 20 लाख रुपयांचे कर्ज घेतले आणि आपण असे समजून की या कर्जावर नऊ टक्के इतका व्याजदर बँक आकारणार आहे. हे वीस लाख रुपयाचे कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला वीस वर्षाचा कालावधी देण्यात आलेला आहे.

तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 17995 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. म्हणजेच वीस वर्षांत तुम्ही वीस लाखाच्या घरासाठी साधारणपणे 23 लाख 18 हजार 685 रुपये फक्त व्याजापोटी बँकेला देता. घरात घेतले तुम्ही वीस लाखाला आणि बँकेला परत केले 43 लाख 18 हजार 685 रुपये.

म्हणजे तुम्हाला ते घर 43 लाखापेक्षा जास्त किमतीला पडते. परंतु याकरिता जर तुम्ही गुंतवणुकीची एक नामी शक्कल लढवली तर काही वर्षांनी तुम्ही व्याजापोटी तुमचा जाणारा लाखो रुपयांचा पैसा वाचवू शकता व काही कालावधीत घर देखील घेऊ शकतात.

अशी करा तुमच्या स्वप्नातील घराची खरेदी
वीस लाख रुपयाचे होमलोन घेऊन घर खरेदी करण्यापेक्षा व त्या लोनवर ईएमआय भरण्यापेक्षा तुम्ही जर गुंतवणूक करायला सुरुवात केली तर ते फायद्याचे ठरू शकते. समजा तुम्ही गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड एसआयपीचा पर्याय जर निवडला तर तुम्ही वीस वर्षात आलिशान घर घेऊ शकतात.

समजा तुम्ही वीस लाख रुपयांचे होम लोन घेतले व त्यासाठी तुम्ही 17000 पेक्षा जास्त ईएमआय भरणार आहात. परंतु असे न करता तेच 17 ते 18 हजार रुपये तुम्ही जर वीस वर्षाच्या कालावधी करिता गुंतवले तर तुम्हाला बारा टक्क्यांचा रिटर्न प्रमाणे यामध्ये परतावा मिळतो.

समजा तुम्ही 18 हजार रुपये प्रतिमहिना याप्रमाणे एसआयपी करत गेलात तर वीस वर्षात तुम्ही एकूण 43 लाख 20 हजार रुपयांची गुंतवणूक करता व त्यावर तुम्हाला बारा टक्क्यांच्या रिटर्न प्रमाणे एक कोटी 36 लाख 64 हजार 663 रुपये व्याज मिळते.

म्हणजेच एसआयपी मध्ये तुमची एकूण वीस वर्षाची मूळ गुंतवणूक व त्यावर मिळालेले व्याज असे मिळून एकूण एक कोटी 79 लाख 84 हजार 663 रुपये तुम्हाला मिळतील. या पैशांमध्ये तुम्ही वीस वर्षात तुम्हाला हवे तसे घर घेऊ शकतात व तुमच्याकडे मोठ्या प्रमाणावर पैसा देखील शिल्लक राहू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe