Personal Loan: बँक तुमच्याकडून घेतलेल्या पर्सनल लोनवर जास्त व्याज आकारत आहे का? फक्त ‘हे’ काम करा, स्वस्त होईल तुमचे लोन

पर्सनल लोन घेतल्यानंतर मात्र त्याची परतफेड बऱ्याच जणांना खूप जड जाते. अशावेळी तुम्ही ज्या बँकेकडून पर्सनल लोन घेतले आहे व ती बँक जास्त व्याज आकारत आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही लोन बॅलन्स ट्रान्सफरचा पर्याय निवडू शकता व पर्सनल लोन परतफेडीमध्ये बऱ्याच गोष्टी सहज आणि सोप्या करू शकता.

Published on -

Personal Loan:- बऱ्याचदा नितांत आर्थिक गरज उद्भवली तर आपल्याला मोठ्या प्रमाणावर पैशांची गरज भासते. अशावेळी आपण अनेक पर्यायांचा वापर करून पैशांची व्यवस्था करायचा प्रयत्न करतो व अशावेळी पैशांची व्यवस्था करणे शक्य होत नाही. त्यामुळे बरेच व्यक्ती हे पर्सनल लोन घेण्याचा मार्ग स्वीकारतात.

बँकेच्या माध्यमातून हे पर्सनल लोन सहजासहजी मिळू शकते व हे एक आपत्कालीन कर्ज म्हणून देखील ओळखले जाते. पर्सनल लोन हे असुरक्षित प्रकारातील कर्ज असल्याने यावर व्याजदर खूप जास्त असतो.

पर्सनल लोन घेतल्यानंतर मात्र त्याची परतफेड बऱ्याच जणांना खूप जड जाते. अशावेळी तुम्ही ज्या बँकेकडून पर्सनल लोन घेतले आहे व ती बँक जास्त व्याज आकारत आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही लोन बॅलन्स ट्रान्सफरचा पर्याय निवडू शकता व पर्सनल लोन परतफेडीमध्ये बऱ्याच गोष्टी सहज आणि सोप्या करू शकता.

पर्सनल लोन बॅलन्स ट्रान्सफर अर्थात शिल्लक हस्तांतरण म्हणजे नेमके काय?

बॅलन्स ट्रान्सफर ही एक खूप फायद्याची अशी पद्धत असून ज्या माध्यमातून तुम्ही तुमचे चालू कर्ज एका बँकेतून दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करू शकतात. कर्जाच्या वाढलेल्या व्याजदरातून तुम्हाला दिलासा मिळवायचा असेल तर हा एक पर्याय खूप फायद्याचा आहे.

त्यामुळे जास्त व्याजदरापासून वाचण्याकरता बरेच व्यक्ती हा पर्याय निवडतात. तुमचा क्रेडिट स्कोर चांगला असेल तर इतर बँका तुम्हाला सध्याच्या व्याजदरापेक्षा स्वस्तात कर्ज देऊ शकतात व कमी व्याजदर मध्ये तुमचा ईएमआय देखील कमी होतो.

 बॅलन्स ट्रान्सफर म्हणजेच शिल्लक हस्तांतरणाचे फायदे काय?

बॅलन्स ट्रान्सफरचा पहिला फायदा म्हणजे चालू कर्जावरील सध्याचे व्याजदरापेक्षा तुम्हाला स्वस्त असा चांगला व्याजदर मिळू शकतो. जेणेकरून तुम्ही सध्या जो काही ईएमआय भरत आहात तो कमी होऊन त्याचा भार कमी होण्यास मदत होऊ शकते.

दुसरा फायदा जर पाहिला तर शिल्लक हस्तांतरण सुविधेचा वापर करून कर्जदार त्याच्या विद्यमान वैयक्तिक कर्जाच्या राहिलेल्या कालावधीपेक्षा जास्त कालावधीची निवड करू शकतो. आजकाल लोन परतफेडीसाठी जास्त कालावधी मिळाल्याने ईएमआय देखील लहान होतो. परंतु यामध्ये कर्जदाराला अधिकचे व्याज द्यावे लागू शकते.

तिसरा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे तुम्हाला टॉप अप कर्ज मिळू शकते. भारतातील अनेक बँका त्यांचे विद्यमान वैयक्तिक कर्ज म्हणजेच पर्सनल लोन ट्रान्सफर करणाऱ्यांना टॉप-अप वैयक्तिक कर्जाची सुविधा देखील देतात. या प्रकारचे टॉप-अप पर्सनल लोन ग्राहकांना त्यांच्या सध्याच्या कर्जावर आणि त्याहून अधिक पैसे कर्ज घेण्यास सक्षम करते.

 बॅलन्स ट्रान्सफर म्हणजे शिल्लक हस्तांतरण करण्यावेळी किती शुल्क लागते?

तुम्हाला पर्सनल लोन बॅलन्स ट्रान्सफर करण्याकरिता नवीन बँकेत कोणतेही तारण जमा करण्याची आवश्यकता भासत नाही. याकरिता तुम्हाला तुमच्या सध्याच्या बँकेला फोर क्लोजर फी आणि कर्ज हस्तांतरण शुल्क भरावे लागेल.

याशिवाय तुम्ही ज्या नवीन बँकेत तुमचे कर्ज हस्तांतरित करत आहात तेथे तुम्हाला कर्ज प्रक्रिया शुल्क आणि इतर शुल्कासह मुद्रांक शुल्क भरावे लागते. जे सामान्यतः नवीन पर्सनल लोन साठी अर्ज करतो त्यावेळी जितके आकारले जाते तेवढे आकारले जाऊ शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News