तुम्ही खरेदी केलेली इलेक्ट्रॉनिक वस्तू रियल कंपनीची आहे की बनावट? कसे ओळखाल? वाचा महत्वाची माहिती

नकली आणि खऱ्या उत्पादनांमध्ये फरक ओळखणे खूप कठीण काम आहे. कारण बऱ्याचदा मूळ आणि नकली उत्पादनांमध्ये त्यांची पॅकिंग तसेच डिझाईन हे बऱ्यापैकी सारखेच येते. थोडाफार प्रमाणात यामध्ये फरक केलेला असतो. जर बारकाईने निरीक्षण केले तर आपण या गोष्टी ओळखू शकतो.

Published on -

सध्या खाद्यपदार्थांमध्ये केली जाणारी भेसळ आरोग्याच्या दृष्टिकोनातून एक खूप मोठा गंभीर प्रश्न आहेच.परंतु त्यासोबतच तुम्ही जर बाजारामध्ये एखादे इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन घ्यायला गेलात तर त्या ठिकाणी देखील तुम्हाला खरे म्हणजेच तुम्हाला हवे असलेल्या कंपनीचे उत्पादन मिळेल की नाही याची कुठल्याही पद्धतीने शाश्वती नाही.

कारण नकली आणि खऱ्या उत्पादनांमध्ये फरक ओळखणे खूप कठीण काम आहे. कारण बऱ्याचदा मूळ आणि नकली उत्पादनांमध्ये त्यांची पॅकिंग तसेच डिझाईन हे बऱ्यापैकी सारखेच येते.

थोडाफार प्रमाणात यामध्ये फरक केलेला असतो. जर बारकाईने निरीक्षण केले तर आपण या गोष्टी ओळखू शकतो. परंतु या व्यतिरिक्त एक दुसरी पद्धत जर आपण अवलंबली  तर तुम्ही खरेदी करत असलेले इलेक्ट्रॉनिक उपकरण खऱ्या कंपनीचे आहे की नकली हे तुम्ही सहजपणे ओळखू शकणार आहात.

 बिआयएस R नंबर करेल तुम्हाला मदत

आर नंबर हे एक महत्त्वाचे मानक असून भारतीय दर्शक मानक संस्था अर्थात बीआयएस नोंदणी क्रमांक म्हणून हा नंबर ओळखला जातो. भारतामध्ये जे काही इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी उत्पादने विक्रीसाठी येतात त्या अगोदर अशा उत्पादनांसाठी अनिवार्य नोंदणी योजनेअंतर्गत येणारे जे उत्पादन आहेत त्यांच्यासाठी आर क्रमांक आवश्यक आहे.

याकरिता सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू उत्पादकांनी बीआयएस नोंदणी मिळवून बीआयएस मानक चिन्ह वापरणे आवश्यक आहे व त्यासोबतच आर नंबर देखील असतो.बीआयएस अनिवार्य नोंदणी योजनेअंतर्गत बरीच महत्त्वाची इलेक्ट्रॉनिक उपकरणे येतात.

उदाहरणच घ्यायचे झाले तर टेलिव्हिजन तसेच चार्जर, स्मार्ट स्पीकर, स्मार्टफोन तसेच प्रिंटर व मायक्रोवेव्ह ओव्हन त्यांचे उदाहरण आपल्याला घेता येईल. या सगळ्या उत्पादनांमध्ये तुम्ही आर नंबर चा वापर करून मूळ म्हणजेच खऱ्या उत्पादना मधून नकली उत्पादनाची ओळख करू शकतात. त्यासाठी तुम्हाला….

1- तुमच्या फोनमध्ये उमंग एप्लीकेशन डाउनलोड करावे लागेल.

2- उमंग एप्लीकेशन डाउनलोड केल्यानंतर या ॲप्लिकेशनच्या होम पेजवर जावे आणि त्या ठिकाणी BIS R नंबर व्हेरिफाय शोधावे.

3- सीआरएस अंतर्गत व्हेरिफाय R नंबर वर क्लिक करावे.

4- त्यानंतर उत्पादनावरील आर नंबर टाकावा. तुम्हाला आर नंबर हा उत्पादनाच्या निर्मात्याची माहिती तसेच त्या उत्पादनाची किंमत इत्यादी तपशील ज्या लेबलवर दिलेली असते त्या लेबलवर हा  नंबर मिळतो. तसेच तुम्हाला बीआयएस मानक चिन्हाखाली देखील हा नंबर मिळू शकतो.

5- आर नंबर टाकल्यानंतर व्हेरिफाय वर क्लिक करावे. त्यानंतर तुम्हाला पुढील पानावर संबंधित उत्पादनाचे उत्पादकाचे नाव तसेच देश, ब्रँड आणि इतर सर्व आवश्यक तपशील पाहायला मिळतो.

अशा पद्धतीने तुम्ही ही ट्रिक वापरून  खरेदी करत असलेले इलेक्ट्रॉनिक उपकरण हे असली आहे की नकली हे आरामात ओळखू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News