Jamin Kharedi Vikri : भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. शेती कसणे हे देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्येचे प्रमुख काम आहे. शेती व्यवसाय म्हटलं म्हणजे जमीन आलीच. अशा परिस्थितीत शेतकरी नेहमीच जमिनीचे खरेदी-विक्रीचे व्यवहार करत असतात. काही शेतकरी आपली पूर्वीची जमीन विकून दुसऱ्याकडे नवीन जमीन खरेदी करतात.
काही शेतकरी आपले क्षेत्र वाढवण्यासाठी जमीन खरेदी करतात. तर काही शेतकरी आपल्या काही वैयक्तिक अडचणीपोटी जमिनीची विक्री करतात. मात्र जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार करणे अतिशय कॉम्प्लिकेटेड म्हणजे गुंतागुंतीचे काम आहे. जमीन खरेदी विक्री करताना शेतकऱ्यांनी काही गोष्टींचे विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
अन्यथा शेतकऱ्यांसोबत फसवणुकीची घटना देखील घडू शकते. जरी कायद्याच्या अधिनस्त राहून जमिनीची खरेदी विक्री केली जात असली तरी देखील काही गोष्टीची काळजी घेणे जरुरीचे आहे. आज आपण शेतकऱ्यांनी जमीन खरेदी करताना तसेच विक्री करताना कोणत्या गोष्टींची काळजी प्रामुख्याने घेतली पाहिजे याच संदर्भात सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात आणि सोप्या भाषेत समजून घेणार आहोत.
हे पण वाचा :- खुशखबर! भारतीय नौदलात ‘या’ पदासाठी भरती; पात्रता फक्त 10वी पास अन पगार मिळणार तब्बल 63 हजार, वाचा सविस्तर
जमिनीला रस्ता आहे की नाही? :- शेत जमीन ही प्रामुख्याने शेती कचण्यासाठी घेतली जाते. अशा परिस्थितीत शेती कसण्याचे काम घरी बसून कम्प्युटरवर किंवा मोबाईलवर तर होणार नाही. यासाठी शेतात म्हणजेच वावरात जावे लागेल. आता शेतात जाण्यासाठी रस्ता लागेल. त्यामुळे कोणत्याही जमिनीची खरेदी करताना जमिनीला रस्ता आहे की नाही याची चौकशी करणे खातरजमा करणे अतिशय आवश्यक आहे. नाहीतर, लाखो रुपयांच्या जमिनीला हक्काचा रस्ता राहणार नाही आणि शेती करणे म्हणजे आव्हानात्मक बनेल. म्हणून शेतात जाण्यासाठी रस्ता आहे की नाही याची सर्वप्रथम चौकशी झाली पाहिजे. विशेष म्हणजे रस्ता हा किमान एक चार चाकी वाहन जाऊ शकेल एवढ्या रुंदीचा असणे जरुरीचे आहे. जेणेकरून शेतात ट्रॅक्टर, बैलगाडी यांसारखी वाहने जातील आणि आपल्या शेतमालाची, मजुरांची, बी-बियाणांची तसेच मजुरांची वाहतूक करणे सोयीचे होईल.
हे पण वाचा :- एमपीएससी ग्रुप बी – ग्रुप सी संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख जाहीर ! ‘या’ दिवशी होणार परीक्षा, पहा परीक्षा केंद्रांची यादी
जमिनीची चतुसीमा चेक करा :- जमीन खरेदी करण्यापूर्वी एकदा जमिनीची संपूर्ण मोजणी करणे आणि जमीन चतुर सीमा मध्ये दाखवल्याप्रमाणे भरते की नाही हे चेक करणे जरुरीचे ठरते. जमिनीच्या चतुसीमा दाखवल्याप्रमाणे असणे गरजेचे आहे. जेणेकरून, शेतकऱ्यांना दिलेल्या मोबदल्यात योग्य जमीन मिळू शकेल.
जमिनीवर बोजा तर नाही ना :- अनेकदा बोजा असलेल्या जमिनीची खरेदी विक्री होत असते. खोटा सातबारा किंवा डुप्लिकेट सातबारा दाखवून या प्रकारचे व्यवहार घडवून आणले जातात. अशा परिस्थितीत जमिनीला गहाण ठेऊन किंवा तारण ठेवून कर्ज घेतलेले नाही ना? याची चौकशी खरेदी पूर्वी झाली पाहिजे. यासाठी आपण ऑनलाइन पद्धतीने सातबारा उतारा डाऊनलोड करून पडताळणी करू शकता.
हे पण वाचा :- अरे वा ! ‘हा’ घसरलेला स्टॉक गुंतवणूकदारांना कमी दिवसात बनवणार मालामाल; मिळणार तब्बल ‘इतके’ रिटर्न्स, कोणता आहे ‘तो’ स्टॉक
न्यायालयीन खटला तर सुरू नाही ना?:- अनेकदा काही जमिनींवर भावकीतले वाद असतात. जमिनीवरून भावा-भावामधले वाद असतात. अशी प्रकरणे न्यायालयात देखील गेलेली असतात. त्यामुळे जमीन खरेदी करण्यापूर्वी जमिनीवरून काही वादविवाद न्यायालयात प्रलंबित आहेत का याबाबत चौकशी करणे जरुरीचे ठरते. यासाठी आपण तज्ञ लोकांचा सल्ला घेऊ शकतात, वकिलांचा सल्ला घेऊ शकतात.
सातबारावर असणारी नावे :- तुम्ही जी जमीन खरेदी करणार असाल त्या जमिनीच्या सातबारा वर किती नावे आहेत. ज्याची जमीन खरेदी करत आहे त्याच्याच नावावर सातबारा आहे का? सातबारावर नाव असलेल्या प्रत्येक व्यक्तीची सहमती आहे का? सातबारावर कोणाला वारसदार लावले आहे का? या बाबींची चौकशी करणे जरुरीचे ठरते. यासाठी आपण जाणकार लोकांचा एकदा सल्ला घेतला पाहिजे. जमीन खरेदीचा व्यवहार करण्यापूर्वी आजूबाजूला असलेल्या तसेच त्या गावातील इतर शेतकऱ्यांचा सल्ला आणि जमिनीबाबत आवश्यक माहिती जाणून घेतली पाहिजे.
हे पण वाचा :- पंजाब डख यांचा नवीन हवामान अंदाज ; ‘या’ जिल्ह्यात मे महिन्यातही पडणार वादळी पाऊस ! पहा काय म्हणताय डख….