पोस्टाच्या ‘या’ योजनेत फक्त 3000 जमा करा आणि 5 वर्षात मिळवा 2 लाखापेक्षा जास्त रक्कम! वाचा संपूर्ण कॅल्क्युलेशन

गुंतवणुकीची सुरक्षितता आणि परताव्याच्या दृष्टिकोनातून बघितले तर बँक आणि पोस्ट ऑफिसच्या अनेक योजनांना गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर पसंती दिली जाते. गुंतवणुकीच्या  दृष्टिकोनातून बघितले तर यामध्ये मुदत ठेव योजना या प्रथम पसंतीच्या असून त्यानंतर पोस्ट ऑफिसच्या अनेक आकर्षक अशा योजना आहेत.

यामध्ये बचत योजना तर आहेतच परंतु मुदत ठेव योजना देखील पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून राबविण्यात येतात. तुम्हाला देखील तुमच्या महिन्याच्या बजेट मधील गुंतवणूक करायची असेल

व त्यातून लाखो रुपयांचा परतावा मिळवायचा असेल पोस्ट ऑफिसची रिकरिंग डिपॉझिट स्कीम अर्थात आरडी योजना ही खूप महत्त्वपूर्ण अशी आहे. या योजनेमध्ये जर तुम्ही दर महिन्याला तीन हजार रुपये जर गुंतवले तर तुम्ही पाच वर्षांनी दोन लाखापेक्षा जास्त पैसे मिळवू शकतात.

 पोस्ट ऑफिसची आरडी योजना आहे महत्त्वाची

पोस्ट ऑफिसची रिकरींग डिपॉझिट योजना ही गुंतवणूकदारांसाठी एक आकर्षक योजना असून या योजनेच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळतो. यामध्ये तुम्ही महिन्याला जर तीन हजार रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्ही पाच वर्षांनी तब्बल दोन लाख 14 हजार 97 रुपये मिळवू शकतात.

याकरिता तुम्हाला तीन हजार रुपये प्रति महिना याप्रमाणे पाच वर्षात एक लाख 80 हजार रुपये गुंतवणूक करावी लागतील व त्यावर  6.7% व्याजदराने तुम्हाला व्याज मिळेल व ते 34 हजार 97 रुपये इतके असेल. म्हणजेच पाच वर्षानंतर या योजनेच्या मॅच्युरिटीला तुम्हाला मुद्दल आणि व्याज मिळून दोन लाख 14 हजार 97 रुपये मिळतील.

तसेच तुम्ही पाच हजार रुपयांची प्रत्येक महिन्याला गुंतवणूक केली तर तुमचे पाच वर्षात या योजनेत 3 लाख रुपये गुंतवणूक होते. या योजनेतून 6.7% व्याजदराने व्याज दिले जाते व ते पाच हजार रुपये प्रति महिना गुंतवणुकीवर 56 हजार 830 रुपये होते व व्याज आणि मुद्दल मिळून तुम्हाला पाच वर्षानंतर तीन लाख 56 हजार 830 रुपये मिळतात.

 या योजनेचे महत्त्वाची वैशिष्ट्ये

पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेमध्ये गुंतवणूकदारांना प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम गुंतवण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. केलेल्या गुंतवणुकीवर या योजनेत आकर्षक असा व्याजदर मिळतो. पोस्ट ऑफिस आरडी योजनेमध्ये सध्या 6.7% वार्षिक व्याजदर मिळत आहे.

दुसरे महत्त्वाचे म्हणजे पोस्ट ऑफिसच्या या योजनेत तुम्ही आपल्या आर्थिक कुवतीनुसार प्रत्येक महिन्याला कमीत कमी शंभर रुपयांपासून गुंतवणूक करू शकतात. तर जास्तीत जास्त दहा हजार रुपयापर्यंतचे गुंतवणूक तुम्ही करू शकता. योजनेमध्ये पाच वर्षासाठी खाते उघडले जाते.

तसेच तुम्हाला जर कालावधी वाढवायचा असेल तर तुम्ही पुढील पाच वर्षासाठी कालावधी वाढवू शकतात. विशेष म्हणजे या योजनेत तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर भारत सरकारची हमी मिळते. तसेच या योजनेत गुंतवणूक केली तर आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत आरडी मधील गुंतवणुकीवर कर सवलत मिळते.

 या योजनेत कसे उघडाल खाते?

याकरिता तुम्हाला तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागेल व त्या ठिकाणी फॉर्म भरून आवश्यक ती कागदपत्रे सादर करावे लागतील व यामध्ये प्रामुख्याने आधार तसेच पॅन कार्ड आणि फोटो लागतील. यामध्ये तुम्हाला प्रारंभिक ठेव रक्कम भरावी लागेल व पासबुक मिळवून दर महिन्याला मासिक हप्ते भरावे लागतील.