LPG Gas Connection : एलपीजी गॅस मुळे आता स्वयंपाक सोपा झाला आहे. अगदी गाव खेड्यात देखील एलपीजी गॅस चा वापर वाढला आहे. यामुळे महिला वर्गाला चुलीच्या धुरापासून मुक्ती मिळाली आहे. विशेषता, केंद्रातील मोदी सरकारने उज्वला योजना सुरू केल्यापासून घरगुती गॅस ग्राहकांची संख्या वाढलेली आहे.
दरम्यान घरगुती गॅस ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आता एलपीजी ग्राहकांना ईकेवायसी अर्थातच इलेक्ट्रॉनिक नो युवर कस्टमर करावे लागणार अशी बातमी समोर येत आहे.
तथापि, 2019 पूर्वी ज्या ग्राहकांनी कनेक्शन घेतले आहे त्यांनाच ई-केवायसी करावं लागणार अशी माहिती गॅस वितरकाकडून समोर आली आहे. सोबतच एजन्सींचे कर्मचारीही घरोघरी जाऊन स्टोव्ह आणि पाईप्स तपासणार असे सांगितले गेले आहे.
जे ग्राहक ई-केवायसी करणार नाहीत, त्यांना ३१ डिसेंबरपर्यंत केव्हायसी करावी लागणार आहे. जर या मुदतीत केवायसीची प्रक्रिया झाली नाही तर गॅस कनेक्शन रद्द केले जाणार आहे.
खरेतर, पेट्रोलियम कंपन्यांनी आता त्यांचे खरे ग्राहक ओळखण्यास सुरुवात केली आहे. यासाठी केवायसी केली जात आहे. ग्राहकांच्या सुरक्षेबाबत घरोघरी जाऊन तपासणी करण्याच्या सूचना वितरक संस्थांना देण्यात आल्या आहेत.
यामुळे आता एजन्सी ग्राहकांना जागरूक करत आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या सामान्य ग्राहकांना एलपीजी गॅस सिलेंडरवर 48 रुपये आणि उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना अतिरिक्त तीनशे रुपयांची सबसिडी मिळत आहे.
सध्या गॅस सिलेंडरची किंमत ही 903 रुपये एवढी आहे. त्यानुसार उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना फक्त सहाशे रुपये आणि सामान्य ग्राहकांना 855 रुपयांना गॅस सिलेंडर मिळतोय. मात्र बरेच वर्ष झालेत तेव्हापासून ग्राहकांचे सर्वेक्षण झालेले नाही.
यामुळे अनुदानाचा लाभ देताना देखील अडचणी येत आहेत. अशा या परिस्थितीत ईकेवायसी करून ग्राहकांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. मात्र अजूनही अनेकांनी केवायसी ची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही.
त्यामुळे लवकरात लवकर हे प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. 31 डिसेंबर ही केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करण्याची शेवटची दिनांक आहे. जर या तारखेपर्यंत कोणी केवायसी केली नाही तर त्यांचे कनेक्शन कट होईल असा देखील इशारा देण्यात आला आहे.