‘माझ्या चुकीमुळेच लोकसभा निवडणुकीत माझा पराभव झाला’ ; डॉ. सुजय विखे पाटील यांचे विधान चर्चेत

Tejas B Shelar
Published:
Sujay Vikhe Patil News

Sujay Vikhe Patil News : नुकत्याच काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत अनेक दिग्गज, मातब्बर नेत्यांचा पराभव झाला. लोकसभा निवडणुकीत अनेक मंत्री देखील पराभूत झालेत हे विशेष. अहमदनगर जिल्ह्यातही लोकसभा निवडणुकीत मोठा उलटफेर पाहायला मिळाला. गेल्या काही पंचवार्षिकी पासून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजप बाजी मारत होते.

मात्र 2024 च्या निवडणुकीत नगर दक्षिण मध्ये डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा पराभव झाला आणि निलेश लंके हे खासदार बनलेत. पारनेरच्या माजी आमदाराने सुजय विखे पाटील यांचा पराभव केला. हा पराभव विखे पाटील यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.

कारण असे की, सुजय विखे पाटील हे दुसऱ्यांदा खासदार होतील असे निवडणुकीच्या आधी म्हटले जात होते. अनेक सर्वे मधून अशीच माहिती समोर येत होती. डॉक्टर विखे यांचा विजय निश्चित आहे असे राजकारणातील जाणकारही म्हणत होते.

भारतीय जनता पक्षाचा या मतदारसंघात असणारा पगडा आणि विखे पिता पुत्र यांची स्वतःची यंत्रणा सोबतच विखे पिता पुत्र यांच्यावर केंद्र सरकारची मेहरबानी या साऱ्या गोष्टींचा सारासार विचार केला असता डॉक्टर विखे दुसऱ्यांदा खासदार बनतील असे मत राजकीय विश्लेषकांच्या माध्यमातून व्यक्त केले जात होते.

पण निवडणुकीचा निकाल लागला आणि सारं काही उलट झालं. लंके हे पहिल्यांदाच लोकसभेच्या निवडणुकीत उभे राहिलेत आणि खासदार म्हणून संसदेत मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. सुजय विखे यांच्या पराभवामागे वेगवेगळे कारणे आहेत.

राजकीय विश्लेषक विखें यांच्या पराभवाची अनेक कारणे सांगतात. दरम्यान आता विखे यांनी त्यांच्या पराभवाचे खरे कारण काय आहे हे जनतेला सांगितलय. यामुळे डॉक्टर सुजय विखे यांचे हे विधान सध्या नगरच्या राजकीय वर्तुळात चांगलेचं चर्चेस आले आहे.

माझ्या चुकीमुळेच लोकसभा निवडणुकीत माझा पराभव झाला; सुजय विखे पाटील यांचे विधान चर्चेत

डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी म्हटल्याप्रमाणे, ‘लोकसभा निवडणुकीत माझा पराभव झाला. हा पराभव माझ्या चुकीमुळे झाला. कारण, मी 25 ते 30 वर्षापूर्वीपासून साचलेली विकास कामे 3 वर्षांत मार्गी लावली. नगर शहरातील उड्डाणपूल, बायपास, करमाळा रस्ता आदीसह विविध विकासाची कामे मार्गी लावली. डॉक्टर म्हणून ही आजारं, मी कायम स्वरूपी संपवले, ते मी जर कायमस्वरूपी ठेवले असते, तर ! आता तुम्हीच ठरवा, कोणता डॉक्टर योग्य आहे.

सुजय विखे पाटील यांनी ‘अनेक लोकांना मी पडल्याचं पाहून आनंद झाला. मात्र माझा कार्यक्रम नाही झाला, तर तुमच्या पुढच्या पिढीसाठी पाहिलेले विकासाचे स्वप्न अपुरे राहिले’, असं म्हणतं जोरदार टोलेबाजी केली. तसेच, आज विरोधी माणूस सुद्धा म्हणतो की, सुजय विखेंसारखी कामे कोणीही करू शकत नाही, यासाठी योग्य डॉक्टर, योग्य आजारावर असणे गरजेचे आहे, असे म्हणतं नवनिर्वाचित खासदार लंके यांच्यावरही हल्ला चढवला.

शेतकऱ्यांची नाराजी सुजय विखे पाटील यांना जड भरली

सुजय विखे पाटील यांनी, त्यांच्या पराभवासाठी शेतकऱ्यांची नाराजी देखील कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. ते म्हटलेत की, ‘माझ्या निवडणुकी वेळेस दुधाचे सॉफ्टवेअर बंद पडले, कांद्याचे भाव 10 रुपये किलो झाले, याचा परिणाम मला भोगाव लागला आहे.’ यावेळी त्यांनी, मुळा धरणामध्ये 5 टीएमसी पाणी उरले, तरी वांबोरी चारीला पाणी सोडण्याचे काम करणार अशी ग्वाही देखील दिली आहे.

तसेच त्यांनी मुळा धरण येथे सोलर प्रोजेक्ट उभारायचा होता, पण आता तुम्ही जबाबदारीतून मुक्त केले आहे असं म्हणतं विकास कामे करणाऱ्या माणसाचा पराभव करत राहिलेत तर तुम्हाला पुढची पिढी माफ करणार नाही, असं म्हणतं आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. पुढे बोलताना त्यांनी मी राजकारणातून संन्यास घेणार नाही असं स्पष्ट करत विरोधकांना धारेवर धरले. यामुळे सध्या सुजय विखे यांच्या या वक्तव्याची नगरमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe