Maharashtra Employee News : राज्यातील विधानसभा निवडणुकीचा नुकताच निकाल जाहीर झाला आहे. विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाला असल्याने आता राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा बोनस मिळण्याचा मार्ग सुद्धा मोकळा झाला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आचारसंहिता लागू करण्यात आली होती.
या आचारसंहितामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा बोनस थकला होता. दरवर्षी दिवाळीच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांना बोनस मिळतो. गेल्यावर्षी एसटी कर्मचाऱ्यांना बोनस मिळाला होता मात्र यावर्षी आचारसंहिता लागू झाल्याने बोनसं रखडला होता.
पण आता आचारसंहिता उठली असल्याने एस.टी. कर्मचार्यांना दिवाळी बोनस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, ही रक्कम स्वतः महामंडळ देणार आहे. सरकारने बोनस देण्यासाठी नकार दिल्याने एस.टी. महामंडळ स्वतःच्या उत्पन्नातून हा खर्च करणार आहे.
यामुळे नक्कीच एस टी महामंडळ अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी तसेच अधिकाऱ्यांसाठी ही बातमी मोठी दिलासा देणारी ठरणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की एसटी महामंडळ अंतर्गत येणाऱ्या सर्व कर्मचारी व अधिकारी यांना सरसकट 6,000 रुपये इतकी रक्कम दिवाळी भेट म्हणून देण्यासाठी आचारसंहिता लागू होण्याअगोदर म्हणजेच 15 ऑक्टोबर रोजी एस.टी. प्रशासनाने 52 कोटी रुपये इतका निधी उपलब्ध करून द्यावा त्यासाठी एक प्रस्ताव रेडी केला होता.
महत्त्वाचे म्हणजे याबाबतचा प्रस्ताव शासन दरबारी वर्गही करण्यात आला होता. मात्र, सरकारकडून निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही. त्यासाठी आचारसंहितेचे कारण सांगितले गेले.
आचारसंहिता संपल्यानंतर ही रक्कम तातडीने दिली जावी, असे सरकारला एस.टी. प्रशासनाकडून कळविण्यात आले. मात्र, सरकार ही रक्कम एस.टी. महामंडळाला देऊ शकत नाही असे स्पष्टीकरण सरकारकडून समोर आले.
दरम्यान आता सरकारच्या या भूमिके नंतर एसटी महामंडळ आपल्या उत्पन्नातूनच एसटी कर्मचाऱ्यांना बोनस देणार असून या बोनसचा मार्ग आता मोकळा झाला आहे. आज पासून एसटी कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षात बोनसची रक्कम मिळणार आहे.