Ahilyanagar News:- राज्यात नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या व या निवडणुकांमध्ये महायुतीला दणदणीत असा विजय मिळाला. जवळपास राज्यातून महाविकास आघाडीची जवळपास सर्वच विभागातुन पीछेहाट झाल्याचे आपल्याला दिसून आले.
परंतु आता त्यानंतर मात्र राज्यात अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही दिवसांनी होणार असून त्याकरिता आता परत एकदा काही दिवसांनी राज्याच्या राजकारणामध्ये निवडणुकांचा धुराळा उठेल हे मात्र निश्चित आहे व साहजिकच या पार्श्वभूमीवर देखील आता एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाकडे जाण्याचे प्रमाण देखील वाढेल यात तीळमात्र शंका नाही.
अगदी याच पद्धतीने जर आपण अहिल्यानगर शहराचा विचार केला तर या ठिकाणी विधानसभा निवडणुकीमध्ये शहरात सर्वाधिक नगरसेवक व शिवसेना ठाकरे गटाची ताकद चांगल्याप्रकारे होती. परंतु असे असताना देखील अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीची उमेदवारी नाकारण्यात आल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी
व शिवसैनिक यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी होती व त्यामुळे जवळपास 15 माजी नगरसेवक त्याचवेळी पक्ष सोडण्याच्या तयारीत होते. परंतु काही कारणामुळे तेव्हा त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय थांबवला होता व आता हा निर्णय महापालिका निवडणुकीपूर्वी होईल अशी माहिती समोर आली आहे.
ठाकरे सेनेचे 15 माजी नगरसेवक सोडणार पक्ष
अहिल्यानगर शहरामध्ये बघितले तर जवळपास शिवसेना फुटीच्या अगोदर जवळपास 23 नगरसेवक होते व त्यानंतर जेव्हा शिवसेना फुटली तेव्हा अनिल शिंदे व सुभाष लोंढे या नगरसेवकांनी तेव्हा शिंदे गटाला साथ दिली होती व उर्वरित 21 नगरसेवक ठाकरे सोबत राहिले होते.
या सगळ्या पार्श्वभूमीवर या झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गट हा प्रबळ दावेदार होता.असे असताना देखील मात्र महाविकास आघाडी कडून अहिल्यानगर शहर विधानसभा मतदार संघाची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सुटली. त्यामुळे नाराज झालेले बहुतांशी नगरसेवक निवडणुकीपासून अलिप्तच राहिल्याचे दिसून आले होते.
तसेच आता निवडणूक झाली परंतु स्थानिक पातळीवर पक्षांतर्गतच कुरघोड्या सुरू झाल्याचे चित्र आहे. सगळ्या प्रकरणामुळे आता अहिल्या नगर शहरातील सुमारे 15 माजी नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला असून कोणत्या पक्षाचा आता पर्याय स्वीकारावा यावर खलबते सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
यामध्ये आता महानगरपालिका निवडणुकीची प्रभाग रचना तसेच चार सदस्य प्रभाग असेल तर संभाव्य पॅनल कसे करता येईल या सगळ्या गोष्टींवर आता विचार केला जाणार आहे व त्यावरच निर्णय घेतला जाईल अशी देखील माहिती समोर आली आहे.
यामध्ये नाराज असलेल्या ठाकरे गटाचे काही नगरसेवकांनी अगोदरच शिंदे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा केलेली होती व आता काही नगरसेवकांची भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांशी जवळीक वाढल्याचे देखील दिसून येत आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात कोणता नगरसेवक कोणत्या पक्षात जातो? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.