तरुणांसाठी आनंदाची बातमी ! राज्याच्या ‘या’ महापालिकेत निघाली मोठी भरती, थेट मुलाखतीने होणार उमेदवाराची निवड, पहा….

Maharashtra Government Job : जे तरुण नोकरीच्या शोधात असतील अशा तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. विशेषतः ज्या तरुणांना सोलापूरमध्ये नोकरीची इच्छा असेल अशा तरुणांसाठी ही आनंदाची बातमी राहणार आहे.

कारण की, सोलापूर जिल्हा परिषदेत विविध रिक्त जागांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. यासाठीची अधिसूचना म्हणजे जाहिरात नुकतीच निर्गमित झाली आहे.

विशेष म्हणजे या भरतीच्या माध्यमातून लेखी परीक्षा न घेता थेट मुलाखत द्वारे उमेदवाराची निवड होणार आहे. अशा परिस्थितीत, आज आपण सोलापूर जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या या पदभरती संदर्भात सर्व आवश्यक माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- म्हाडाची कोकण मंडळाची लॉटरी आज निघणार; घरबसल्या म्हाडाची सोडत कशी पाहणार? पहा….

कोणत्या रिक्त पदांसाठी होणार भरती?

अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार या पदभरती अंतर्गत सोलापूर जिल्हा परिषद प्राणी संग्रहालय संचालक, पशु वैद्यकीय अधिकारी, जीवशास्त्रज्ञ या रिक्त पदांची भरती करणार आहे.

किती पदांसाठी होणार भरती?

प्राणी संग्रहालय संचालक, पशु वैद्यकीय अधिकारी, जीवशास्त्रज्ञ या पदाची प्रत्येकी एक जागा म्हणजेच एकूण तीन रिक्त जागा सोलापूर जिल्हा परिषदेत भरल्या जाणार आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता?

शैक्षणिक पात्रते संदर्भात सर्व माहिती जाणून घेण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेने काढलेली अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे जरुरीचे आहे.

हे पण वाचा :- कडू कारल्याचा मधुर गोडवा ! प्रयोगशील शेतकऱ्याने 10 गुंठ्यात सुरु केली कारल्याची शेती, 2 लाखांची झाली कमाई, पहा ही यशोगाथा

किती वेतन राहणार?

सदर अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार, प्राणी संग्रहालय संचालक – 45,000/- रुपये दरमहा, पशु वैद्यकीय अधिकारी – 30,000/- रुपये दरमहा, जीवशास्त्रज्ञ – 20,000/- रुपये दरमहा एवढं वेतन सिलेक्ट झालेल्या उमेदवाराला मिळणार आहे.

मुलाखत केव्हा होणार आणि कुठे होणार

दोन दिवसानंतर म्हणजेच 12 मे 2023 रोजी ही मुलाखत घेतली जाणार आहे. मुलाखत सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर या ठिकाणी होणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना या ठिकाणी मुलाखतीसाठी जायचे आहे. 

हे पण वाचा :- मोठी बातमी ! आता मुंबईहुन ‘या’ शहरा दरम्यान सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस, खासदार उदयनराजे यांनी घेतला पुढाकार

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe