ऐन थंडीत पावसाचे थैमान ! महाराष्ट्रातील ‘या’ दहा जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता, भारतीय हवामान खात्याचा नवा अंदाज

भारतीय हवामान खात्याने आपल्या नव्या अंदाजात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता असल्याचे म्हटले आहे. या भागातील दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. आय एम डी ने आज अर्थातच 15 नोव्हेंबरला कोकणातील दक्षिण भागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागातील सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली असून या पाचही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

Tejas B Shelar
Published:
Maharashtra Havaman Andaj

Maharashtra Havaman Andaj : महाराष्ट्रातील बहुतांशी भागांमध्ये थंडीची चाहूल लागली आहे. तर राज्याच्या काही भागांमध्ये आता थंडीची तीव्रता सुद्धा वाढत आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका चांगलाच वाढलाय. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांमध्ये बोचरी थंडीचा अनुभव आता नागरिकांना येतोय. तर, राज्याच्या उर्वरित भागात सुद्धा किमान तापमानाचा पारा कमालीचा खाली आला आहे.

पण अशातच पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा भागातील दक्षिणेकडील जिल्ह्यात पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. अन या भागात आकाश ढगाळ झाले आहे. हवामान खात्याने आज राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. यातील पाच जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान खात्याने राज्यातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली?

भारतीय हवामान खात्याने आपल्या नव्या अंदाजात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता असल्याचे म्हटले आहे. या भागातील दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

आय एम डी ने आज अर्थातच 15 नोव्हेंबरला कोकणातील दक्षिण भागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागातील सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली असून या पाचही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

याशिवाय आज कोकणातील रायगड मध्ये महाराष्ट्रातील पुणे सोलापूर आणि मराठवाडा विभागातील लातूर धाराशिव या जिल्ह्यांमध्येही विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असा अंदाज आहे.

या भागात पावसाची शक्यता आहे मात्र या जिल्ह्यांना कोणताचं अलर्ट देण्यात आलेला नाही. म्हणजेच या भागांमध्ये तुरळक ठिकाणी किरकोळ स्वरूपाचा पाऊस पडणार असे दिसते. दुसरीकडे जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी सुद्धा पावसाचा नवीन अंदाज जारी केला आहे.

पंजाबरावांनी या जिल्ह्यांमध्ये वर्तवलीये पावसाची शक्यता

पंजाब रावांनी दिलेल्या माहितीनुसार 15 ते 17 नोव्हेंबर दरम्यान राज्यातील अक्कलकोट सोलापूर तासगाव इस्लामपूर सांगली श्रीगोंदा सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी कोल्हापूर पुणे या भागात पावसाची शक्यता आहे.

या काळात कर्नाटकात खूप जास्त पाऊस पडणार असेही पंजाब रावांनी म्हटले आहे. उर्वरित राज्यात मात्र फक्त ढगाळ स्वरूपाचे हवामान राहणार आहे.

तसेच 17 नोव्हेंबर नंतर महाराष्ट्रात पुन्हा थंडीला सुरुवात होईल असेही पंजाबराव यांनी म्हटले आहे. तसेच वीस तारखेला होणाऱ्या मतदानाच्या दिवशी महाराष्ट्रात पाऊस पडणार नाही हवामान कोरडे राहील असाही अंदाज पंजाब रावांनी यावेळी दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe