Maharashtra Havaman Andaj : गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीचे प्रमाण थोडेसे कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील काही भागांमध्ये कमाल आणि किमान तापमानात किंचित वाढ झाली असून याचाच परिणाम म्हणून सध्या कडाक्याची थंडी गायब झाल्याचे दिसत आहे.
दरम्यान भारतीय हवामान खात्याने येत्या काही दिवसात महाराष्ट्रातील हवामान पुन्हा बिघडणार आणि राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस हजेरी लावणार असा अंदाज दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात पुन्हा एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.
हा कमी दाबाचा पट्टा आता येत्या काही तासात पुढे सरकणार, अन पूर्व-इशान्येकडे दाब वाढणार आहे. याचाच परिणाम म्हणून देशातील काही राज्यांमध्ये मुसळधार पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे.
या वातावरणीय परिस्थितीचा परिणाम म्हणून इशान्येकडील राज्यांमध्ये जोरदार पाऊस हजेरी लावणार असा अंदाज आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ईशान्येकडील राज्यांमध्ये पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याने याचा प्रभाव आपल्या महाराष्ट्रावर सुद्धा पाहायला मिळणार आहे. राज्यात सुद्धा पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
राज्यातील तापमान कमी होऊन काही ठिकाणी ढगाळ हवामान आणि अगदीच तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या दोन दिवसांनी अर्थातच 24 आणि 25 डिसेंबर रोजी राज्यातील पूर्व आणि पश्चिम विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रात देखील या काळात ढगाळ हवामान पाहायला मिळू शकते असा एक अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि कोकणात पुढील चार-पाच दिवस किमान आणि कमाल तापमान थोडेसे अधिक राहणार आहे.
येत्या 24 तासांत किमान तापमानात हळूहळू 2-4 अंशांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचाच परिणाम म्हणून पुढील पाच दिवस बहुतांश राज्यात थंडीचा जोर कमी होणार असल्याचं सांगण्यात आलंय.
एकंदरीत 24 आणि 25 तारखेला महाराष्ट्रातील विदर्भ विभागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज असून मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान पाहायला मिळणार आहे. या अनुषंगाने विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी असा सल्ला कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांनी दिलेला आहे.
या काळात फार अधिक पाऊस पडणार नाही, अगदीच तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असून पावसाची व्याप्ती ही फक्त विदर्भ पुरती मर्यादित आहे, मात्र असे असले तरी पूर्व आणि पश्चिम विदर्भातील आणि मध्य महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असा सल्ला देण्यात आला आहे.