Maharashtra HSC Result : सीबीएसई बोर्डाचा बारावीचा आणि दहावीचा रिझल्ट जाहीर झाल्यानंतर आतुरता लागली होती ती महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या निकालाची. राज्यातील लाखो विद्यार्थी महाराष्ट्र बोर्डाचे दहावीचे आणि बारावीचे रिझल्ट केव्हा लागणार याबाबत विचारणा करत होते.
विद्यार्थ्यांसहितच पालकांना देखील रिझल्टची आतुरता लागलेली होती. विद्यार्थी आणि पालक दहावी आणि बारावीच्या रिझल्टची अगदी चातकाप्रमाणे वाट पाहत होते. दरम्यान त्या महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या निकालाची तारीख डिक्लेअर करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानें बारावीचा रिझल्ट उद्या अर्थातच 25 मे 2023 रोजी दुपारी दोन वाजता जाहीर होणार असल्याचे सांगितले आहे.
यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून बारावीच्या रिझल्टची असलेली प्रतीक्षा संपणार आहे. दरम्यान आज आपण बारावीचा रिझल्ट विद्यार्थ्यांना कुठे पाहता येणार आहे याबाबत सविस्तर अशी माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हे पण वाचा :- अहमदनगरच्या चहावाल्याचा पोरगा बनला अधिकारी ! यूपीएससी परीक्षेत संगमनेरचा मंगेश चमकला, विपरीत परिस्थितीत मिळवल यश, वाचा….
बारावीचा रिझल्ट कुठे पाहता येणार?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार उद्या बारावीचा रिझल्ट दुपारी दोन वाजता जाहीर केला जाणार आहे. हा रिझल्ट विद्यार्थ्यांना बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन पाहता येणार आहे.
https://www.mahahsscboard.in mahresult.nic.in, hscresult.mkcl.org, mahresults.org.in या संकेतस्थळापैकी कोणत्याही एका संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना आपला बारावीचा निकाल पाहता येणार आहे.
यासाठी सर्वप्रथम विद्यार्थ्यांना वर नमूद केलेल्या कोणत्याही एका वेबसाईटवर भेट द्यायची आहे. वेबसाईट ओपन झाल्यानंतर तिथे एच एस सी रिजल्ट 2023 असा पर्याय राहणार आहे.
हे पण वाचा :- देशातील ‘या’ भागात 26 मे पर्यंत वळवाचा पाऊस पडणार ! महाराष्ट्रात गारपीटीची शक्यता, भारतीय हवामान विभागाचा इशारा
या लिंक वर विद्यार्थ्यांना क्लिक करायचे आहे. यावर क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्यांना आपला आसन क्रमांक म्हणजेच सीट क्रमांक टाकावा लागणार आहे. सोबतच विद्यार्थ्यांना आपल्या आईचे नाव टाकावे लागेल. यानंतर विद्यार्थ्यांना आपला रिझल्ट ऑनलाइन पद्धतीने पाहता येणार आहे.
याशिवाय विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी एसएमएस वर देखील बारावीचा रिझल्ट बोर्डाने उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे. यासाठी विद्यार्थ्यांना 57766 या नंबरवर आपला सीट नंबर टाकून मॅसेज सेंड करायचा आहे. मग महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून त्याच मोबाईल नंबरवर निकाल एसएमएस केला जाणार आहे.
हे पण वाचा :- विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक ! शाळा सोडल्याचा दाखला नसला तरीही विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश मिळणार; पण….