खुशखबर ! राज्यातील ‘या’ 1 लाख गरीब लोकांना मिळणार हक्काच घर; कोणत्या जिल्ह्यात किती लोकांना मिळणार लाभ? पहा….

Published on -

Maharashtra News : राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी राज्य शासनाकडून कायमचं विविध उपक्रम राबवले जातात. राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी, गरिबांसाठी, कामगारांसाठी, महिलांसाठी, ज्येष्ठांसाठी तसेच दिव्यांग बांधवांसाठी विविध योजना सुरू केल्या जातात.

खरंतर मानवाच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मूलभूत गरजा आहेत. मात्र अनेकांना या मूलभूत गरजांची देखील पूर्तता करता येत नाही. या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी अनेकजण अहोरात्र काबाडकष्ट करतात तरीही त्यांना अन्न, वस्त्र आणि निवारा उपलब्ध होत नाही.

अशा परिस्थितीत या गरिबांच्या कल्याणासाठी राज्य शासन कायमचं प्रयत्न करते. दरम्यान, राज्य शासनाने राज्यातील गरीब लोकांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

हे पण वाचा :- सोयाबीन पेरणी करताय ? मग हवामान तज्ञ पंजाब डख यांनी सुचवलेल्या ‘या’ वाणाची लागवड करा, उत्पादनात होणार मोठी वाढ, वाचा….

2 जून 2023 रोजी राज्य शासनाने राज्यातील ज्या एसटी अर्थातच शेड्युल ट्राईब म्हणजे अनुसूचित जमातीच्या लोकांना राहण्यासाठी घरे नाहीत, कुडामातीच्या घरात, झोपडीमध्ये राहतात अशा पात्र लाभार्थ्यांना घरे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

या लाभार्थ्यांना शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत लाभ पुरवला जाणार आहे. विशेष बाब म्हणजे याची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्याच्या सूचना राज्य शासनाने संबंधितांना दिल्या आहेत.

राज्य शासनाने या योजनेच्या माध्यमातून राज्यातील एक लाख 7 हजार 99 लाभार्थ्यांना घर उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट/लक्ष्याॅंक ठेवले आहे. दरम्यान आता आपण जिल्हानुसार किती घरांचे उद्दिष्टे किंवा लक्ष्याॅंक ठेवण्यात आले आहे? याविषयी जाणून घेणार आहोत.

हे पण वाचा :- अहमदनगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव आणि ‘त्या’ जिल्ह्यात येत्या दोन-तीन तासात मुसळधार पाऊस पडणार ! भारतीय हवामान विभागाचा इशारा

जिल्हानिहाय घराचे उद्दिष्टे

शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील गरीब लोकांसाठी एक लाख 7 हजार 99 घर उपलब्ध होणार आहेत. यासाठी जिल्हानिहाय लक्षाॅंक/उद्दिष्टे ठेवण्यात आले आहे.

  • नाशिक जिल्ह्यासाठी 8000 घरांचे उद्दिष्टे आहे, यात कळवणसाठी पाच हजार आणि नासिकसाठी 3000 घरांचे उद्दिष्ट आहे.
  • जळगाव जिल्ह्यासाठी 5000 घरांचे उद्दिष्ट आहे.
  • आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक 12000 घरांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
  • धुळे जिल्ह्यात 5 हजार 709 घरांचे उद्दिष्ट आहे.
  • अहमदनगर जिल्ह्यात 2000 घरांचे उद्दिष्टे आहे.
  • ठाणे जिल्ह्यात दोन हजार घरांचे उद्दिष्टे आहे.
  • पालघर जिल्ह्यातील डहाणू 1275 घरांचे उद्दिष्ट आहे आणि जवाहर मध्ये 2947 घरांचे उद्दिष्ट आहे.
  • रायगड जिल्ह्यात 2639 घरांच उद्दिष्टे आहे.
  • रत्नागिरी जिल्ह्यात दोन घरांचे उद्दिष्टे आहे.
  • पुणे जिल्ह्यात 1864 घराचं उद्दिष्टे आहे.
  • कोल्हापूर आणि सातारा मध्ये प्रत्येकी दहा घरांच उद्दिष्ट आहे.
  • याशिवाय, सोलापूर 100, नांदेड 3000, हिंगोली 5000, परभणी 1000, छत्रपती संभाजी नगर 3936, धाराशिव 125, जालना 1794, लातूर 636, बीड 1179, अमरावती 7906, अकोला 600, बुलढाणा पंधराशे, वासिम 700, यवतमाळ 4500, नागपूर पाच हजार, वर्धा 500, गोंदिया पंधराशे, भंडारा 1226, चंद्रपूर 7500 आणि चिमूर 1166, गडचिरोली 2775.

हे पण वाचा :- कमी पाऊस पडला तरी सोयाबीनच्या ‘या’ वाणातून मिळणार विक्रमी उत्पादन, वाचा…

योजनेच्या अटी काय?

या योजनेअंतर्गत केवळ ग्रामीण भागातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील गरीब लोकांना लाभ मिळणार आहे.

ज्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील गरीब कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजारापेक्षा कमी आहे अशा कुटुंबाला या योजनेअंतर्गत घराचा लाभ मिळणार आहे.

28 मार्च 2013 च्या शासन निर्णयानुसार निश्चित केलेल्या प्राधान्यक्रमानुसार या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना दिला जाणार आहे.

अनुसूचित जमाती प्रवर्गातील दिव्यांग लाभार्थ्यांना पाच टक्के आरक्षण देखील आहे. यामध्ये दिव्यांग महिला लाभार्थ्यांना प्राधान्य मिळणार आहे.

हे पण वाचा :- अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर ; ‘त्या’ 4 लाख 88 हजार 603 शेतकऱ्यांना मिळणार 12 हजार रुपये ! तुम्हालाही मिळणार का लाभ? वाचा….

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe