Maharashtra Rain Panjabrao Dakh : डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल पाहायला मिळालेत. डिसेंबरच्या सुरुवातीला राज्यात थंडीचे प्रमाण कमी होते. नंतरच्या काळात राज्यातील थंडीचे प्रमाण वाढले. मात्र मध्यंतरी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आणि एका चक्रीवादळाची निर्मिती झाली.
त्याचा परिणाम म्हणून देशाच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस झाला आणि काही ठिकाणी गारपीट झाली. यामुळे सर्वसामान्य जनजीवन अगदीच विस्कळीत झाले होते. महाराष्ट्रातही याचा प्रभाव पाहायला मिळाला.
राज्यातील अनेक भागांमध्ये त्या काळात हलका ते मध्यम पाऊस झाला. यानंतर पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आणि यामुळे राज्यात पुन्हा पाऊस झाला. डिसेंबरच्या दुसऱ्या पंधरवाड्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची नोंद करण्यात आली.
आता गेल्या तीन-चार दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामान मात्र पूर्णपणे कोरडे झाले आहे. अजून थंडीची तीव्रता वाढलेली नाही मात्र येत्या काही दिवसात थंडीची तीव्रता वाढणार आहे. दरम्यान उद्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे.
यामुळे नवीन वर्षात महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार, जानेवारी 2025 मध्ये राज्यात पुन्हा पाऊस होणार का असे काही प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहेत. आता याच बाबत पंजाब रावांनी मोठी माहिती दिली आहे.
काय म्हणतात पंजाबराव?
नवीन वर्षाची सुरुवात ही कडाक्याच्या थंडीने होणार आहे. जानेवारी 2025 चे स्वागत थंडीनं होईल अशी माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे. 1 जानेवारीपासून महाराष्ट्रातील हवामान पूर्वपदावर येणार आहे, कुठेच पाऊस पडणार नाहीये अशी माहिती त्यांनी दिली आहे.
आज राज्यात कडाक्याच्या थडीचा अंदाज डखांनी वर्तवला होता. तसेच उद्यापासून राज्यात थंडीचा जोर असाच वाढत जाणार असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. त्यामुळं नागरिकांनी वाढत्या थंडीमुळं योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे.
राज्यात जवळपास 15 जानेवारी पर्यंत हवामान कोरडे राहणार आहे. 1 जानेवारी ते 15 जानेवारी म्हणजेच नवीन वर्षाचा पहिला पंधरवाडाभर राज्यातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे आणि या काळात कडाक्याची थंडी अनुभवायला मिळणार आहे.
या काळात कुठेच ढगाळ हवामान किंवा पाऊस पाहायला मिळणार नाही. हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी देखील 3 जानेवारी ते सात जानेवारी दरम्यान जोरदार थंडी राहणार असा अंदाज दिला आहे.
मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर विदर्भात या काळात थंडीचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे. खरं पाहता या काळात संपूर्ण महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढेल मात्र या सांगितलेल्या विभागांमध्ये थंडीची तीव्रता अधिक राहण्याची शक्यता आहे.