सगळे प्रयत्न करून झाले परंतु पिवळे दात काही केल्या सफेद होत नाहीत? ‘अशा पद्धती’ने घरीच तयार करा दंतमंजन, मोत्यासारखे चमकतील दात

Published on -

पिवळ्या दातांची समस्या ही बऱ्याच जणांना असते व यामुळे आपल्याला चारचौघात जायला किंवा मोकळेपणाने  हसायला देखील लाज वाटते. खरं पाहिला गेले तर दात पिवळे होण्याची समस्या ही आपण स्वतःहुन ओढवून आणलेली असते. तंबाखू तसेच गुटखा खाण्याची सवय किंवा सतत चहा किंवा कॉफी प्यायल्यामुळे खरं पाहिला गेले तर ही समस्या निर्माण होते.

जर व्यक्ती चहा किंवा कॉफी पीत असेल तर त्यामुळे दातांवर पिवळा आणि पांढरा थर जमा व्हायला लागतो व काही कालावधीनंतर या पिवळ्या थराचे प्लेक तयार होताना दिसायला लागतात व कीड देखील लागायला सुरुवात होते. दात पिवळे झाल्यामुळे चारचौघात जायला व्यक्तीला लाज वाटायला लागते व पुढे व्यवस्थित दातांची स्वच्छता केली नाही तर अनेक समस्या निर्माण व्हायला लागतात व यामध्ये पायोरियासारखी गंभीर समस्या देखील निर्माण होऊ शकते.

दात पिवळे झाल्यामुळे ते स्वच्छ व सफेद दिसावे त्याकरिता अनेक प्रकारच्या उपाययोजना करताना आपल्याला बरेच जण दिसून येतात. याकरिता वेगवेगळी उत्पादने देखील विकत घेतली जातात. या सगळ्या उपाययोजना केराच्या टोपलीत जातात व यांचा कोणत्याही प्रकारे फायदा होतो नाही. त्यामुळे आपण या लेखामध्ये दातांना चमकवण्याकरिता घरच्या घरी दंतमंजन कशा पद्धतीने तयार करावे व त्याचा काय फायदा होतो? याबद्दलची माहिती घेऊ.

 घरीच तयार करा आयुर्वेदिक दंतमंजन

यामध्ये डॉक्टर सांगतात की आयुर्वेद दंतमंजनाचा वापर केला तर दात पांढरे शुभ्र करण्यासाठी याचा फायदा होतो. अशा प्रकारे आयुर्वेद पावडरचा वापर केला तर दात स्वच्छ होण्यास मदत होते व हिरड्या देखील आरोग्यदायी व मजबूत राहतात. याकरिता तुम्ही घरच्या घरी देखील आयुर्वेदिक दंतमंजन तयार करू शकता व अशाप्रकारे दंतमंजन बनवण्यासाठी तुम्हाला…

 कडुलिंबाची पावडर दोन मोठे चमचे, बाभळीची पावडर  दोन मोठे चमचे, त्रिफळा पावडर एक मोठा चमचा, लवंगाची पावडर एक छोटा चमचा,मुलेठी पावडर एक मोठा चमचा, सैंधव मीठ  एक छोटा चमचा, बेकिंग सोडा एक छोटा चमचा आणि, पुदिना इसेन्शियल ऑइल चार ते पाच थेंब इत्यादी साहित्य तुम्हाला हे दंतमंजन बनवण्यासाठी लागेल.

 अशा पद्धतीने बनवा हे दंतमंजन

1- याकरिता सगळ्यात अगोदर सर्व पदार्थांची पावडर बारीक वाटून घ्यावी आणि तिला वाळू द्यावी. यापैकी बऱ्याच वस्तू तुम्हाला स्टोअरमध्ये किंवा ऑनलाईन देखील उपलब्ध होतील.

2- एका वाटीमध्ये कडुलिंबाची पावडर, बाबळीची पावडर तसेच त्रिफळा पावडर, लवंग पावडर, बेकिंग सोडा आणि सैंधव मीठ मिसळून घ्यावे. म्हणजे दंतमंजनाला  चव आणि इतर रोगजिवाणू नाशक गुण मिळावे याकरिता पेपरमिंट तेलाचे काही थेंब घालून हे सगळे मिश्रण व्यवस्थित मिसळून घ्यावे.

3- हे तयार मिश्रण एका घट्ट असलेल्या एअर टाईट कंटेनरमध्ये ठेवावे. कारण ते ताजे राहील हा त्यामागचा उद्देश आहे. ब्रश करताना त्या अगोदर ब्रश थोडा व्यवस्थित ओला करून घ्यावा व पावडरमध्ये बुडवावा व आपण जसा नेहमीप्रमाणे ब्रश करतो तसा दातांना ब्रश करावे.

4- दुसऱ्या पद्धतीमध्ये थोडी पावडर आपल्या हातावर ठेवावी व पावडरमध्ये पाण्याचे काही थेंब घालून नंतर मिक्स करून त्याचा वापर दातांवर ब्रश करण्यासाठी करावा.

5- यामध्ये कडुलिंबात अँटीबॅक्टरियल गुणधर्म असतात व त्यामुळे दातांवर जे काही प्लेक जमा झालेले असतात ते कमी होतात व त्यांच्या विरोधात लढण्यास मदत होते. बाभळीच्या पावडर मुळे दात मजबूत राहायला मदत होते व त्रिफळामुळे आरोग्याला देखील बरेच फायदे मिळतात

व दातदुखी पासून आराम मिळावा याकरिता आवश्यक असलेले अँटीबॅक्टरियल गुण देखील त्रिफळामध्ये असतात. मुलेठी पावडरमुळे सूज कमी होते व बॅक्टेरियांशी लढण्यास देखील मदत होते. त्यामध्ये वापरलेले सैंधव मिठामध्ये प्राकृतिक स्वच्छता असणारे गुण असतात व बेकिंग सोड्याचा वापर हा दात चमकवण्यासाठी होतो.

अशाप्रकारे घरच्या घरी तयार केलेले या दंतमंजनामुळे पिवळे दात मोत्यासारखे चमकु शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News