Mumbai Pune Old Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच राज्यात अजूनही अनेक रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे युद्ध पातळीवर सुरूच आहेत. अशातच, जुन्या मुंबई पुणे महामार्गाबाबत एक अगदीच महत्वाची अपडेट हात येत आहे. जर तुम्हीही जुन्या मुंबई पुणे महामार्गावरून प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी कामाची ठरणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जुन्या मुंबई पुणे महामार्गावर एकूण नऊ ठिकाणी उड्डाणपूल विकसित केले जाणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे याबाबतचा आराखडा सुद्धा रेडी झाला असून राज्य रस्ते विकास महामंडळाने हा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून केंद्राच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.

केंद्रीय भूपृष्ठ मंत्रालयाकडे राज्य रस्ते विकास महामंडळाकडून हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. पण गेली सात वर्षांपासून हा प्रकल्प मंत्रालयाकडे धुळखात पडून असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. या प्रकल्पाला गेल्या सात वर्षांपासून मंजुरी मिळालेली नाही. केंद्राकडून या प्रस्तावाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याने या महामार्गावरील वाहतूक कोंडी अजूनही कायमच आहे.
खरे तर राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून जुन्या मुंबई पुणे महामार्गावर विकसित केल्या जाणाऱ्यांना उड्डाणपुलामुळे या महामार्गावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. मात्र या प्रस्तावाला केंद्राकडून मंजुरी मिळत नसल्याने अजूनही हा प्रकल्प फाईल बंदच आहे.
गेल्या सात वर्षांपासून हा नऊ उड्डाणपूलांचा प्रकल्प कागदावरच असल्याने नागरिकांमध्ये या प्रकल्पाबाबत संभ्रमावस्था आहे. दरम्यान आता आपण राज्य रस्ते विकास महामंडळ आणि या महामार्गावर कोणकोणत्या ठिकाणी उड्डाणपूल विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे? याबाबत माहिती पाहणार आहोत.
या ठिकाणी विकसित होणार उड्डाणपूल
राज्य रस्ते विकास महामंडळाने महामार्गावर ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते आणि जिथे अपघात अधिक होतात अशी गर्दीचे ठिकाणी ओळखून त्या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतलाय. महत्त्वाचे म्हणजे प्राधिकरणाकडून याबाबतचा प्रस्ताव 2018 मध्ये केंद्राकडे वर्ग करण्यात आला होता.
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, खोपोली आणि लोणावळादरम्यान 16 किलोमीटर अंतरावर तीव्र वळण आणि चढ-उतार आहे. यामुळे या भागात वाहनांचा वेग मंदावतो. परिणामी वाहतूक कोंडी होते आणि या ठिकाणी वाहतूक कोंडीमुळे अपघात सुद्धा होतात.
दरम्यान हीच बाब विचारात घेऊन सात वर्षांपूर्वी राज्य रस्ते विकास महामंडळाकडून या महामार्गावर नऊ ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याची शिफारस करण्यात आली अन तज्ञ लोकांच्या सल्ल्याने याबाबतचा आराखडा रेडी केला. विशेष म्हणजे प्राधिकरणाकडून या आराखड्याचा प्रस्ताव केंद्रीय भूपृष्ठ मंत्रालयाकडे वर्ग सुद्धा करण्यात आला.
पण या प्रस्तावाला केंद्राकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसून अजूनही हा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. या प्रस्तावानुसार जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील सोमाटणे फाटा, लिंब फाटा, तळेगाव-चाकण रस्ता, एमआयडीसी वडगाव, देहूरोड वाय जंक्शन, वडगाव फाटा, निगडी फाटा ते कामशेत, कार्ला फाटा, कान्हे फाटा या गर्दीच्या ठिकाणी आणि अपघातप्रवण क्षेत्रात उड्डाणपूल बांधणे प्रस्तावित करण्यात आले आहे.
महत्त्वाचे म्हणजे यामध्ये समाविष्ट असणारा प्रत्येक उड्डाणपूल हा 300 ते 500 मीटर लांबीचा राहणार असून सात वर्षांपूर्वी या उड्डाणपुलासाठी 208 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. विशेष म्हणजे हा प्रकल्प पीपीपी म्हणजेच पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या तत्त्वावर पूर्ण करण्याचे धोरण आखण्यात आले होते. दरम्यान जर हा प्रकल्प पूर्ण झाला तर या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जवळपास पाऊण तासाचा म्हणजेच 45 मिनिटांचा वेळ वाचणार आहे.