Namo Shetkari Yojana : केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या माध्यमातून देशातील सामान्य जनतेच्या, कष्टकरी शेतमजुराच्या आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कायमच वेगवेगळ्या योजना सुरू केल्या जातात. केंद्र शासनाने 2019 मध्ये अशीच एक शेतकरी हिताची घोषणा सुरू केली आहे ज्याचे नाव आहे पीएम किसान सन्मान निधी योजना. ही योजना पीएम नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातली योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील जवळपास आठ कोटीहून अधिक शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजाराचा लाभ मिळतो.
या योजनेअंतर्गत दिले जाणारे 6000 रुपये शेतकऱ्यांना एकूण तीन हप्त्यात दिले जातात. म्हणजेच दोन हजाराचा एक हप्ता या पद्धतीने या योजनेचे स्वरूप आखण्यात आले आहे. दरम्यान केंद्र शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील एक योजना नुकतीच सुरू करण्यात आली आहे. या योजनेची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्प 2023-24 यामध्ये करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे ही शेतकरी हिताची योजना नरेंद्र मोदी यांच्या नावाने आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असे या योजनेचे नाव असून या अंतर्गत आता राज्यातील एक कोटी 15 लाख शेतकऱ्यांना अतिरिक्त वार्षिक सहा हजार रुपये मिळणार आहेत. म्हणजेच केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेअंतर्गत 6000 आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गत 6000 असे एकूण 12 हजार रुपये शेतकऱ्यांना मिळू शकणार आहेत.
या योजनेचा अद्याप शासन निर्णय काढण्यात आलेला नाही मात्र लवकरच शासन निर्णय निर्गमित होईल आणि या योजनेची कार्यपद्धती शेतकऱ्यांना कळवली जाणार आहे. दरम्यान या योजनेसाठी अर्ज करताना शेतकऱ्यांना मात्र काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे ही पी एम किसान योजनेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रेच राहणार आहेत.
हे पण वाचा :- महाराजिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडणार ! भारतीय हवामान विभागाचा इशारा
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
या योजनेसाठी नेमकी कोणते कागदपत्रे लागतील याबाबत अद्याप अधिकृत स्रोतांकडून कोणतीच माहिती हाती आलेली नाही. पण एका वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, या योजनेचा लाभ घेण्यासाठी पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, अर्जदार शेतकऱ्याचे आधार कार्ड, ग्रामपंचायतीचा रहिवासी पुरावा, उत्पन्नाचा दाखला, अर्जदार शेतकऱ्याचे जात प्रमाणपत्र, या योजनेचा लाभ हा केवळ शेतकऱ्यांना मिळणार आहे म्हणून अर्जदार शेतकऱ्याला सातबारा द्यावा लागणार आहे, अर्जदार शेतकऱ्याला रेशन कार्ड सादर करावे लागेल, तसेच बँक खाते क्रमांक, पासबुक द्यावे लागेल, तसेच आधारशी संलग्न असलेला मोबाईल क्रमांक देखील द्यावा लागणार आहे.
हे पण वाचा :- ठाणे ते बोरिवली प्रवास आता फक्त 20 मिनिटात; भूमिगत मार्गाच्या वाढीव खर्चास प्राधिकरणाची मान्यता, केव्हा सुरु होणार काम?…