Numerology Secrets : अंकशास्त्रात अंकांना विशेष महत्त्व असते. अंकशास्त्रानुसार केवळ व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्याचे भविष्य समजते. व्यक्तीच्या जन्मतारखेवरून मुळांक निघतो आणि हाच मुळांक व्यक्तीचे भविष्य सांगत असतो. उदा. ज्या व्यक्तीचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 11 तारखेला झालेला असेल त्या व्यक्तीचा मुळात हा 1+1 = दोन राहणार आहे.
म्हणजेच जन्मतारखेच्या बेरजेवरून मुलांक काढला जात असतो. मुलांक हा एक ते नऊ दरम्यान असतो. आज आपण मुळांक दोन मुळांकांच्या लोकांना 2025 हे वर्ष कसे जाणार? या लोकांना या वर्षात कोणकोणते लाभ मिळू शकतात, कोणकोणत्या क्षेत्रात हे लोक चांगले प्रगती करतील या संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत.
कसे राहणार 2025 चं वर्ष ?
अंकशास्त्रानुसार 2025 या वर्षाचा मुळांक हा 9 आहे. मुलांक 9 चा स्वामी ग्रह मंगळ आहे. मंगळ हा आक्रमक आणि वर्चस्व स्थापित करणारा ग्रह मानला जातो. मंगळ हा ग्रह धैर्य, समृद्धी, अग्नि, ऊर्जा, क्रोध यावर प्रभुत्व असणारा ग्रह मानला जातो.
मंगळ ग्रहाच्या प्रभावामुळे दोन मूळांक असणाऱ्या लोकांच्या आयुष्यात 2025 मध्ये काही सकारात्मक बदल पाहायला मिळणार आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की कोणत्याही महिन्याच्या दोन, 11, 20 आणि 29 या तारखांना जन्मलेल्या लोकांचा मूळांक हा दोन असतो.
दोन मुलांक असणाऱ्या लोकांचा स्वामीग्रह चंद्र आहे. नव्या वर्षात मंगळ ग्रहाचा प्रभाव राहणार असून मंगळ ग्रह चंद्राचा अनुकूल ग्रह मानला जातो. आता मूलांक 2 चा स्वामी ग्रह चंद्र आहे. त्यामुळे 2025 हे वर्ष मूलांक 2 च्या लोकांसाठी उत्तम ठरणार आहे.
पुढील वर्षी दोन मूळांक असणाऱ्या लोकांच्या आयुष्यात अनेक बदल पाहायला मिळणार आहेत. या लोकांना प्रत्येकच क्षेत्रात चांगली प्रगती साधता येणार आहे. नवीन वर्षात मूलांक 2 असलेल्या लोकांच्या जीवनावर एकीकडे मंगळाच्या ऊर्जेचा प्रभाव असेल तर दुसरीकडे चंद्राच्या कोमलतेचाही प्रभाव असेल.
नवीन वर्षात या लोकांच्या आयुष्यात काही सकारात्मक बदल होणार आहेत तर काही नकारात्मक बदल देखील पाहायला मिळू शकतात. नवीन वर्षात या लोकांना उत्पन्नाचे नवीन स्रोत सापडतील आणि यामुळे यांची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे.
व्यापारी वर्गासाठी आणि नोकरदारांसाठी पुढील वर्ष विशेष लाभाचे ठरणार आहे. या लोकांना 2025 मध्ये भरपूर पैसा मिळेल. नोकरीमध्ये चांगल्या संधी मिळतील आणि अचानक यश आणि आर्थिक लाभाचे संकेत आहेत.
या मुळांकाच्या लोकांना लेखन, अभिनय, नृत्य, पर्यटन, प्रवास, प्राणी, व्यवसाय, धान्य, फळे, फुले, दूध, दही, तेल उत्पादने, औषधोपचार, दंतचिकित्सा इत्यादींशी संबंधित कार्यक्षेत्रात चांगले यश मिळणार आहे.
मात्र नव्या वर्षात या मुळांकाच्या लोकांनी वाद विवाद टाळले पाहिजेत आणि आपला राग आवरला पाहिजे. एवढ्या गोष्टीची काळजी घेतली तर हे संपूर्ण वर्ष या राशीच्या लोकांसाठी फायद्याचे राहील.