दिवसेंदिवस तंत्रज्ञानाची आणि विज्ञानाची प्रगती होत गेली तसे तसे जुन्या चालरीती तसेच परंपरा, जुने खेळ, घरामध्ये असलेला संवाद इतकेच काय तर नातेसंबंधांमध्ये असलेले सौहार्दपणाचे वातावरण देखील आता कमी झाले. गेल्या पंधरा ते वीस वर्षाचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जे काही आपले अक्षय तृतीया किंवा दिवाळी सारखे सण ज्या उत्साहात साजरी केले जायचे किंवा ज्या परंपरा पाळल्या जायच्या ते आता खूप कमी झाले असून अगोदर असलेल्या परंपरा या सणांना देखील आता पाळल्या जात नाही.
त्यामुळे आपले पारंपारिक सण आणि उत्सव देखील निरस होत चालल्याचे चित्र आहे. सध्या सोशल मीडियाचा जमाना अवतरला असून मोबाईल हे एक जीवनावश्यक असे साधन होऊन बसले आहे. तासंतास मोबाईल मध्ये डोके घालून बसल्याने घरामधील नवरा बायको असो की पालक आणि पाल्य त्यांच्यामध्ये देखील संवाद हरवला असून अनेक विपरीत परिणाम यामुळे पाहायला मिळत आहेत.
त्या अनुषंगाने आता तीशीत किंवा पस्तीशीत असलेल्या तरुणांनी जर त्यांच्या वयाच्या गेल्या पंधरा ते वीस वर्षाचा विचार केला तर आताची पिढी आणि तेव्हाची पिढी यामध्ये बऱ्याच गोष्टीतून फरक दिसून येतो. तेव्हा नक्कीच वाटते की ते दिवस परत यायला हवेत. या दृष्टिकोनातून या लेखांमध्ये आपण गेल्या पंधरा वर्षापूर्वी अशा बऱ्याच गोष्टी होत्या ज्या आपल्या जीवनाच्या अविभाज्य भाग होत्या. ते आपण समजून घेणार आहोत.
पंधरा वर्षांपूर्वी असलेल्या महत्त्वाच्या गोष्टी
1- आता आहे म्युझिक ॲप तेव्हा होत्या ऑडिओ कॅसेट– जर आता आपण पाहिले तर मोबाईल मध्ये अनेक म्युझिक ॲप असून गाणे ऐकण्यासाठी मोबाईल मधील यूट्यूब जरी क्लिक केले तरी हवे ते गाणे आता ऐकता येतात. परंतु गेल्या पंधरा वर्षाचा विचार केला तर तेव्हा गाणे ऐकण्यासाठी घरात एक टेपरेकॉर्डर असायचा व त्यामध्ये ऑडिओ कॅसेट टाकून तरच गाणे ऐकता यायचे. असे होते तरी देखील यामध्ये एक वेगळाच आनंद होता.
2- घरासमोर ॲटलास कंपनीची सायकल वाढवायची घराची शान– आता घरासमोर विचार केला तर अनेक कंपनीच्या दुचाकी आपल्याला उभ्या दिसतात. तरी देखील लोकांमध्ये समाधानी दिसून येत नाही. परंतु या तुलनेत गेल्या पंधरा वर्षाचा विचार केला तर घरासमोर एक ॲटलास कंपनीची सायकल जरी उभी राहिले तरी त्या घराची एक शान वाढायची. एका सायकलमुळे तेव्हाच्या पिढीमध्ये खूप मोठे समाधान होते.
3- फेसबुक माहितीही नव्हते परंतु कॉमिक बुक वाचण्यात मिळायचा आनंद– आत्ताच्या पिढीचा विचार केला तर प्रामुख्याने फेसबुक आणि इतर अनेक सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात. गेल्या पंधरा वर्षाचा विचार केला तर फेसबुक हे माहितीही नव्हते. परंतु आताच्या पिढीला फेसबुक च्या माध्यमातून जितका आनंद मिळत नसेल तेवढा आनंद पंधरा वर्षांपूर्वी एखादे कॉमिक बुक वाचण्यात येत असे.
4- अँटेना असलेल्या टीव्ही पाहण्यात होती मजा– आताचा विचार केला तर घरामध्ये डिश टीव्ही, केबल असते. त्यामुळे हवे तेव्हा हवा तो प्रोग्राम आपल्याला बघता येतो. परंतु गेल्या पंधरा वर्षाचा विचार केला तर तेव्हा डिश वगैरे काही नव्हते. घराच्या छतावर असलेला अँटेना आणि त्या माध्यमातून टेलिव्हिजन कार्यक्रम बघणे यामध्ये खूप मोठा आनंद होता. बऱ्याचदा सिग्नल गेल्यामुळे घराच्या छतावर चढून आणि अँटेना फिरवून आपला एखादा आवडता कार्यक्रम चुकू नये याकरता धावपळ करण्यात वेगळीच मजा होती.
5- लँडलाईन फोन वापरण्यात होती मजा– आता अनेक प्रकारचे मोबाईल फोन आल्यामुळे आपल्याला मोबाईलचे महत्व किंवा दुरसंवादाचे महत्त्व राहिले नाही. परंतु गेल्या पंधरा वर्षांपूर्वी फक्त लँडलाईन फोन होते. या फोन वरच्या साह्याने दूरच्या एखाद्या व्यक्तीने संवाद साधने किंवा बोलणे यामध्ये खूप अप्रूप वाटायचे. ग्रामीण भागात तर बऱ्याचदा गल्लीमध्ये एखादा लँडलाइन फोन राहायचा. याच फोनचा नंबर गल्लीतील बऱ्याच जणांनी त्यांच्या नातेवाईकांना दिलेला राहायचा. त्यामुळे गल्लीतील बऱ्याच व्यक्तींचे नातेवाईकांचे फोन एकाच घरी यायचे. त्यामध्ये देखील एक वेगळा आनंद होता.
6- पुस्तकांना लावलेले कव्हर होते महत्त्वाचे– शाळा सुरू झाल्यानंतर पुस्तकांच्या दुकानातून नवीन पुस्तके व शाळेत पुस्तके मिळाले की या पुस्तकांना कव्हर लावण्यात खूप मोठा आनंद त्यावेळेस असायचा. बऱ्याचदा पुस्तकांच्या कव्हर वरून विद्यार्थी किती टापटीप किंवा हुशार आहे हे ठरवले जायचे. नव्या पुस्तकांना कव्हर लावून शाळेत जाणे यामध्ये खूप मोठा आनंद होता.
7- कबड्डी आणि क्रिकेट सारख्या खेळात होता आनंद– आताचा विचार केला तर लहान मुले देखील मोबाईल मधील असलेल्या व्हिडिओ गेम्स मध्ये तासंतास हरवून जातात. परंतु गेल्या पंधरा वर्षांपूर्वीचा विचार केला तर तेव्हाची पिढी विटी दांडू असो की लगोरी, कबड्डी असो की खो खो यासारखे खेळ मोठ्या प्रमाणात खेळत. ही खेळ खेळण्यांमध्ये वेगळाच आनंद होता.
8- खाकी पॅन्ट आणि पांढरा शर्ट या शाळेतील गणवेश घालण्यात होती मजा– आता विचार केला तर अगदी नर्सरीत जाणाऱ्या मुलांना देखील वेगवेगळ्या प्रकारचे रंगीबेरंगी आणि आकर्षक असे गणवेश असतात. परंतु गेल्या पंधरा वर्षाचा विचार केला तर बहुतेक ग्रामीण भागामध्ये पहिली ते दहावीपर्यंत खाकी पॅन्ट आणि पांढरा शर्ट हाच युनिफॉर्म असायचा. हा युनिफॉर्म घालून मस्तपैकी शर्टींग करून शाळेत जाणे यात खूप मजा होती.