Panjab Dakh Havaman Andaj : जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक नवीन अंदाज दिला आहे. यामध्ये पंजाबरावांनी आज अर्थातच 3 ऑक्टोबर पासून ते 7 ऑक्टोबर दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये भाग बदलत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
तसेच काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान, आता आपण पंजाबरावांचा हा नवीन अंदाज नेमका कसा आहे? याबाबत माहिती जाणून घेणार आहोत.
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात बरसणार मुसळधार पाऊस?
पंजाब रावांनी सांगितल्याप्रमाणे, 3 ऑक्टोबर पासून ते 7 ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रातील काही भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. म्हणजेच या काळात राज्यात भाग बदलत जोरदार पाऊस पडणार आहे. सर्वत्र पडणार नाही मात्र भाग बदलत जोरदार पाऊस पडणार आहे.
डख यांनी सांगितल्याप्रमाणे, राज्यातील नाशिक, छत्रपती संभाजी नगर, जळगाव, परभणी, जालना, वाशिम, हिंगोली या भागात भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे.
तसेच नांदेड, लातूर, धाराशिव, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर,कोकण किनारपट्टी, अहमदनगर, पुणे, संगमनेर, श्रीरामपूर, शेवगाव पाथर्डी या भागांमध्ये देखील सात तारखेपर्यंत भाग बदलत जोराचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
या काळात मात्र विदर्भात पावसाचे प्रमाण फारच कमी राहणार आहे. विदर्भात या काळात कुठेच मुसळधार पाऊस पडणार नाही असे पंजाब रावांनी आपल्या नवीन बुलेटिन मध्ये स्पष्ट केले आहे.
तथापि 3 ऑक्टोबर पासून ते 7 ऑक्टोबर पर्यंत विदर्भ विभागातील अकोला, वर्धा, नागपुर, अमरावती, भंडारा, गोंदिया,बुलढाणा या भागात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अर्थातच या भागात कुठेच मोठा पाऊस पडणार नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी फारशी चिंता करण्याची गरज नसल्याचे मत पंजाब रावांनी व्यक्त केले आहे.
मात्र ज्या ठिकाणी भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तेथील शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची काळजी घेणे अपेक्षित आहे. काढणी केलेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवणे आवश्यक आहे.
कारण की या कालावधीत रात्रीच्या वेळेस पाऊस पडण्याची शक्यता आहे. खरंतर गेल्या काही दिवसांपासून राज्यात ऑक्टोबर हिट चा तडाका पाहायला मिळत आहे. ऑक्टोबर हिट मुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे.
मात्र आता राज्यातील काही भागांमध्ये भाग बदलत का होईना पण मुसळधार पाऊस पडणार असा अंदाज समोर आला आहे. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात अल्हाददायक वातावरणाची अनुभूती येणार आहे. राज्यातील नागरिकांना ऑक्टोबर हीट पासून यामुळे दिलासा मिळू शकतो.