Panjabrao Dakh Latest Weather Prediction : हवामान अंदाजासाठी पंजाब डख हे नाव अलीकडे शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय बनले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात या नावाची एका प्रकारची सणसणीच पाहायला मिळते. हा अवलिया आपला हवामान अंदाज एका मिनिटात लाखो शेतकऱ्यांना व्हाट्सअपच्या आणि youtube च्या माध्यमातून सांगत असतो.
दरम्यान अलीकडे त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन, वेगवेगळ्या कार्यक्रमात हवामानाचा अंदाज सांगण्याचे देखील कार्य सुरू केले आहे. दरम्यान त्यांनी यंदाच्या मान्सून बाबत एक मोठी माहिती दिली आहे. सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील बोरगाव येथे कृष्णा उद्योग समूहाने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

हे पण वाचा :- मोठी बातमी ! 30 अन 31 मार्चला होणार दानाफान, ‘या’ भागात पुन्हा गारपीटीची शक्यता; हवामान विभागाचा गंभीर इशारा
शेतीवर हवामान बदलाचा होणारा परिणाम व हवामानावर आधारित शेती या आशयाचा शेतकरी मेळावा या उद्योग समूहाने आयोजित केला होता. या मेळाव्यासाठी पंजाब डखं यांना बोलावण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान बोलतांना त्यांनी यंदाच्या मान्सून बाबत मोठी माहिती दिली आहे. यावेळी डख यांनी एक मोठ भाकीत देखील केल आहे. पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी आठ जूनला मान्सून महाराष्ट्रात येणार आहे. मात्र यावेळी फक्त मान्सूनचे आगमन होईल आणि 22 जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पोहचेल. 27 ते 30 जून पर्यंत शेतकऱ्यांच्या पेरण्या होतील असं देखील डख यांनी नमूद केल आहे.
हे पण वाचा :- कौतुकास्पद ! सुरू केली कलिंगड अन मिरचीची आंतरपीक शेती; एका एकरात झाली 6 लाखांची कमाई, पहा ही भन्नाट यशोगाथा
तसेच ज्या शेतकऱ्यांच्या या कालावधीमध्ये पेरण्या होणार नाहीत, त्या शेतकऱ्यांच्या जुलै महिन्यातील पहिल्या पंधरवड्यात पेरण्या पूर्ण होतील असा अंदाज डख यांनी यावेळी वर्तवला आहे. यावर्षी जूनच्या तुलनेत जुलैमध्ये अधिक पाऊस राहील. जुलैच्या तुलनेत ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये अधिक पाऊस राहील असं डख यांनी नमूद केलं. 2022 सारखाच यंदाचा मान्सूनही शेतकऱ्यांसाठी चांगला राहील, अधिक पाऊस राहील असं त्यांनी सांगितले आहे. दरम्यान यंदा अधिक पावसाची शक्यता असल्याने कृष्णा नदी काठावर यावर्षीही महापूराची शक्यता असल्याचा दावा डख यांनी केला आहे. जर डख यांनी वर्तवलेला हा अंदाज खरा ठरला तर कृष्णाकाठी वसलेल्या नागरिकांना निश्चितच यंदा देखील महापुरामुळे मोठ्या संकटांचा सामना करावा लागणार आहे.
हे पण वाचा :- शेतीमध्ये बदल गरजेचाच; पारंपारिक पिकाला फाटा देऊन सुरु केली फुलशेती, बनले लाखोंचे धनी; वाचा ही यशोगाथा