Panjabrao Dakh News : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी पडत आहे. मात्र, आता राज्यातील हवामान चेंज होणार असून लवकरच अवकाळी पावसाला सुरुवात होईल असा अंदाज समोर आला आहे. खरंतर, पंजाबराव डख यांनी आजपासून अर्थातच 21 डिसेंबर पासून महाराष्ट्रात अवकाळी पावसाला सुरुवात होणार असा अंदाज दिला होता.
पण आज पंजाबरावांनी राज्यात 21 डिसेंबर पासून नाही तर 25 डिसेंबर पासून अवकाळी पावसाला सुरुवात होणारं असा नवा अंदाज जाहीर केला आहे. म्हणजेच, येत्या चार दिवसांनी राज्यात अवकाळी पावसाचे सत्र सुरू होणार आहे. 25 डिसेंबर पासून ते 28 डिसेंबर पर्यंत राज्यातील विविध भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या काळात महाराष्ट्रात भाग बदलत पाऊस पडणार असा अंदाज पंजाब रावांनी नुकताच जारी केला असून हा अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या शेतीच्या कामांचे नियोजन आखावे असा सल्ला यावेळी कृषी क्षेत्रातील जाणकारांनी दिला आहे. पंजाब रावांनी म्हटल्याप्रमाणे आज 21 डिसेंबर रोजी राज्यातील थंडी कमी होणार असून ढगाळ हवामान पाहायला मिळणार आहे.
तसेच 25 ते 28 दरम्यान राज्यात अवकाळी पाऊस पडणार असून या काळात राज्यात भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणजेच सर्व दूर पाऊस राहणार नाही, या काळात अगदीच तुरळक ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते असे पंजाबरावांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
22 डिसेंबर पासून थंडीचे प्रमाण आणखी कमी होणार आहे आणि ढगाळ हवामानाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. 22 ते 24 डिसेंबर दरम्यान राज्यातील बहुतांशी भागांमध्ये ढगाळ हवामान राहील. परंतु 25 ते 28 दरम्यान राज्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडायला सुरुवात होणार आहे.
या काळात राज्यात सर्व दूर पाऊस पडणार नाही तर तुरळक ठिकाणी भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी फारशी चिंता करण्याचे कारण नाही. पण राज्यातील थंडीचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान राज्यातील हे हवामान ज्वारी आणि वेलवर्गीय पिकांसाठी पोषक राहू शकते असाही अंदाज पंजाब रावांनी दिला आहे. खरे तर नुकत्याच काही दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता आणि यामुळे राज्यातील काही भागांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळाली.
याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील अनेक भागातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाले. दरम्यान आता पुन्हा एकदा राज्यात अवकाळी पाऊस पडणार असा अंदाज समोर आला आहे. या काळात पावसाचे प्रमाण फारसे राहणार नाही मात्र तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.