Post Office Scheme : देशातील गुंतवणूकदारांना अलीकडे गुंतवणुकीसाठी विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत. बँकेची एफडी योजना, बँकेची आरडी योजना, पोस्ट ऑफिसची एफडी आणि आरडी योजना, पोस्ट ऑफिसची बचत योजना, एलआयसीची बचत योजना अशा ठिकाणी गुंतवणूक करण्याला गुंतवणूकदार विशेष प्राधान्य देत आहेत.
पोस्ट ऑफिसच्या बचत योजनेमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या देखील खूप अधिक आहे. याचे कारण म्हणजे पोस्ट ऑफिस मधील गुंतवणूक ही पूर्णपणे सुरक्षित असते.
दरम्यान आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशा एका बचत योजनेची माहिती जाणून घेणार आहोत ज्यामध्ये गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदाराला वर्षाकाठी एक लाख 11 हजार रुपये मिळणार आहेत.
कोणती आहे ती योजना ?
आम्ही ज्या योजनेबाबत बोलत आहोत ती योजना आहे पोस्ट ऑफिसची MIS योजना. या योजनेला मंथली इनकम स्कीम म्हणून ओळखले जाते. या योजनेमध्ये जास्तीत जास्त 5 वर्षांसाठी पैसे जमा केले जातात.
या जमा केलेल्या पैशांवर पोस्ट ऑफिस 7.4% दराने व्याज देत आहे. विशेष म्हणजे या योजनेत गुंतवणूक केलेली रक्कम पूर्णपणे सुरक्षित असते. कारण की, या योजनेला सरकारची हमी असते. यात सिंगल किंवा जॉइंट अकाउंट ओपन केले जाऊ शकते.
या पोस्ट ऑफिसच्या मंथली इन्कम स्कीम मध्ये सिंगल अकाउंट ओपन केल्यास कमाल नऊ लाख रुपये आणि जॉइंट अकाउंट ओपन केल्यास कमाल 15 लाख रुपये एवढी रक्कम गुंतवली जाऊ शकते. म्हणजे या योजनेत गुंतवणूक करून संयुक्त खात्याद्वारे मोठी कमाई करता येते.
परिणामी सेवानिवृत्त लोकांसाठी ही योजना अतिशय चांगली मानली जाते. सेवानिवृत्त झाल्यानंतर पती-पत्नीने यात एकत्र गुंतवणूक केल्यास ते स्वतःसाठी मासिक उत्पन्नाची व्यवस्था करू शकतात.
कसे मिळणार एक लाख 11 हजार रुपये?
जर तुम्ही यांच्या पार्टनर समवेत येथे जॉईंट अकाउंट ओपन केले आणि या संयुक्त खात्यात 15 लाख रुपये जमा केले तर तुम्हाला 7.4 टक्के या व्याजदराने महिन्याला 9250 रुपये एवढे व्याज मिळणार आहे.
म्हणजे एका वर्षात 1,11,000 रुपये तुम्हाला व्याजाच्या स्वरूपात मिळणार आहे. या योजनेचा कालावधी हा पाच वर्ष असल्याने तुम्हाला या पाच वर्षांच्या कालावधीत व्याजातून 1,11,000 x 5 = 5,55,000 रुपये मिळतील.
जर या योजनेत सिंगल अकाउंट ओपन करून नऊ लाख रुपयांची गुंतवणूक केली गेली तर महिन्याला 5 हजार 550 रुपये एवढी खात्रीशीर इन्कम मिळणार आहे. म्हणजेच वार्षिक 66 हजार रुपयांची कमाई होणार आहे.